WhatsApp ब्लॉग

आठ वर्षांपूर्वी, फेब्रुवारी २००९ मध्ये आम्ही आमच्या कोडच्या पहिल्या ओळी लिहायला सुरुवात केली ज्याचे रूपांतर आज WhatsApp मध्ये झालेले आहे. ज्या प्रोजेक्ट मागील महत्वाची संकल्पना ही होती की तुमचे मित्रमैत्रिणी आणि इतर संपर्क यांना तुम्ही सध्या काय करत आहात ते कळत रहावे. ही आम्ही मेसेजिंग समाविष्ट करण्यापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या अॅपची पहिली आवृत्ती अशी होती :

२००९ च्या उन्हाळ्यात आम्ही जरी मेसेजिंग समाविष्ट केले तरी आम्ही अत्यंत मूलभूत असे "टेक्स्ट ओन्ली" अर्थात "केवळ मजकूर" अशा स्वरूपातच स्टेटस वैशिष्ट्य ठेवले होते. दरवर्षी जेव्हा मी आणि ब्रायन कोणकोणत्या प्रोजेक्ट्स वर अधिक काम करायचे यावर योजना आखीत असू त्यावेळी नेहमीच आम्ही आमचे मूळ "टेक्स्ट ओन्ली" फिचर अधिक नावीन्यपूर्ण पद्धतीने कसे सुधारता येईल याविषयी चर्चा करीत असू.

आम्हाला हे घोषित करताना आनंद होत आहे की योगायोगाने २४ फेब्रुवारी ला WhatsApp च्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आमचे 'स्टेटस' फिचर नव्याने पुनरुज्जीवित करीत आहोत. आजपासून आम्ही स्टेटस अपडेट हे वैशिष्ट्य प्रसारित करीत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि संपर्कांबरोबर फोटो आणि व्हिडिओ अतिशय सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने शेअर करू शकाल. आणि हो, तुमचे स्टेटस अपडेट्स देखील एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट अर्थात संपूर्ण कूटबद्धतेने सुरक्षित केलेले असतील.

जसे आठ वर्षांपूर्वी आम्ही प्रथमच WhatsApp स्थापित केले, तसेच हे नवीन आणि सुधारित वैशिष्टय, तुमचे जे मित्र WhatsApp वापरतात त्यांच्याबरोबर संपर्कात राहण्यासाठी एक मजेशीर आणि सोपा पर्याय उपलब्ध करून देईल. WhatsApp मधील आम्हा सर्वांना अशी आशा आहे की तुम्ही हे नवीन वैशिष्टय नक्कीच पसंत कराल.

यान कौम