WhatsApp ब्लॉग

आज, आम्ही असे वैशिष्ट्य प्रसारित करीत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना तुमचे लाईव्ह लोकेशन अर्थात सध्याचे थेट ठिकाण कळवू शकता. जर तुम्ही तुमच्या मित्रांना भेटायला जात आहात, तुमच्या आप्तेष्टांना तुमची खुशाली कळवत असाल किंवा तुम्ही प्रवासात कुठवर आला आहेत ते कळवत असाल, लाईव्ह लोकेशन हे तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले वैशिष्ट्य वापरून तुम्ही तुमचे सध्याचे ठिकाण कोणासोबत आणि किती काळ शेअर करायचे ते नियंत्रित करू शकता. तुम्ही तुमचे सध्याचे ठिकाण शेअर करणे कधीही थांबवू शकता किंवा लाईव्ह लोकेशन टायमर बंद झाल्यावर ते आपोआपच थांबेल.

हे पुढीलप्रमाणे कार्य करते. तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर किंवा गटाबरोबर लोकेशन शेअर करायचे आहे त्यांच्या बरोबरच्या गप्पा उघडा. अटॅच बटणावर टॅप केल्यानंतर तुम्हाला "स्थान" असा पर्याय दिसेल, त्यामध्ये "तुमचे सध्याचे थेट ठिकाण शेअर करा" असा पर्याय असेल. तुम्हाला किती काळ शेअर करायचे आहे ते निवडा. त्यानंतर चॅट मधील प्रत्येक व्यक्ती तुमचे लाईव्ह लोकेशन बघू शकते. जर एकाच गटातील अनेक व्यक्त्तींनी त्यांचे लोकेशन शेअर केले असेल तर ते सर्व एकाच नकाशामध्ये दिसतील.

लाईव्ह लोकेशन हे Android आणि iPhone मध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही पुढील काही आठवड्यांमध्ये ते प्रक्षेपित करू. आम्हाला अशी आशा आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल.