WhatsApp ब्लॉग

संपूर्ण जगभरात अनेक लोक लघु उद्योजकांशी संपर्क साधण्यासाठी WhatsApp चा वापर करतात - मग ते भारतातील ऑनलाईन कापड व्यावसायिक असोत किंवा ब्राझील मधील ऑटो पार्ट विकणारी कंपनी असो. WhatsApp हे लोकांसाठीच तयार केलेले आहे आणि आता व्यवसाय करताना देखील समृद्ध अनुभव यावा अशी आमची इच्छा आहे. जसे की, ग्राहकांना चटकन प्रत्युत्तर देणे, वैयक्तिक संदेश आणि व्यावसायिक संदेश वेगळे करणे आणि व्यवसायांसाठी अधिकृत व्यासपीठ मिळवून देणे.

आज आम्ही सादर करीत आहोत WhatsApp Business - लघु उद्योजकांसाठी असलेले एक निःशुल्क Android अॅप. आमचे नवीन अॅप अनेक कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी संपर्कात राहण्यास मदत करेल आणि मुखत्वे आमच्या १.३ करोड ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या उद्योगाशी संपर्कात राहण्यास सोयीचे ठरेल. पुढीलप्रमाणे :

  • बिझनेस प्रोफाइल : ग्राहकांना महत्वाची माहिती प्रदान करतात जसे की व्यवसायाची माहिती, ई-मेल, स्टोअर पत्ता आणि वेबसाईट.
  • मेसेजिंग साधने : स्मार्ट मेसेजिंग साधने वापरून वेळ वाचविता येतो — तात्काळ प्रत्युत्तर हे नेहमी विचारल्या जाण्याऱ्या प्रश्नांना चटकन उत्तर देतात, स्वागत संदेश हे ग्राहकांना तुमच्या व्यवसायाची माहिती देतात, आणि व्यस्तता संदेश हे तुम्ही सध्या अनुपलब्ध असल्याचे सांगतात.
  • मेसेजिंग सांख्यिकी : काही साधी आकडेवारी, जसे की एकूण किती संदेश वाचले गेले हे जाणून एकंदर परिस्थितीचा आढावा घेता येईल.
  • WhatsApp वेब : तुमच्या डेस्कटॉप वर WhatsApp Business चे संदेश पाठविता आणि प्राप्त करता येतात.
  • खाते प्रकार : लोकांना हे समजेल की ते एखाद्या व्यावसायिकांशी चॅट करत आहेत कारण तुमचे खाते 'व्यवसाय खाते' म्हणून नोंदविले जाईल. कालांतराने जेव्हा खात्याचा फोन नंबर व्यवसायाच्या फोन नंबर बरोबर जुळेल त्यानंतर त्या व्यवसायांची 'प्रमाणित' खात्यांमध्ये गणना केली जाईल.

सामान्य लोक WhatsApp मेसेंजरचा नेहमीप्रमाणेच वापर करू शकतात — त्यासाठी काहीही नवीन डाउनलोड करण्याची गरज नाही. आणि लोक त्यांना येणारे संदेश पूर्ण पणे नियंत्रित करू शकतात जसे की व्यवसायांचा देखील नंबर ब्लॉक करता येणे, तसेच त्यांना स्पॅम म्हणून रिपोर्ट करता येणे.

भारत आणि ब्राझील मधील साधारण ८०% लघु व्यावसायिकांचे असे मत आहे की WhatsApp मुळे त्यांना ग्राहकांशी संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मदत झाली आहे (Source: Morning Consult study). आणि WhatsApp Business, जलद आणि सुलभ मार्गाने त्यांच्याशी संपर्कात राहणे अजूनच सोपे करेल.

WhatsApp Business हे आजपासून इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, यू.के आणि यू.एस येथे Google Play वर निःशुल्क उपलब्ध आहे. हे अॅप संपूर्ण जगभरात पुढील काही आठवड्यांमध्येच उपलब्ध होईल. ही फक्त सुरुवात आहे!