WhatsApp ब्लॉग

आता प्रथमच JioPhone वर संपूर्ण भारतभर WhatsApp उपलब्ध होणार आहे. लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी सोपा, विश्वासार्ह आणि सुरक्षित मार्ग प्राप्त होण्यासाठी WhatsApp ने JioPhone च्या KaiOS या ऑपरेटिंग सिस्टीम साठी या खाजगी मेसेजिंग ॲपची नवीन आवृत्ती निर्माण केली आहे.

या नवीन आवृत्तीमध्ये WhatsApp मधील उत्तम वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये जलद आणि वैश्वासार्ह मेसेजिंग आणि फोटो आणि व्हिडिओ पाठविणे याचा समावेश आहे - ते सुद्धा सर्व एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड स्वरूपात! व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करणे आणि पाठविणे हे तुम्ही कि पॅड वर एक-दोन वेळा टॅप करून अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता. सुरुवात करण्यासाठी JioPhone वापरकर्त्यांनी फक्त त्यांच्या फोन नंबरची WhatsApp वर पडताळणी करणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांना इतर WhatsApp वापरकर्त्यांबरोबर वैयक्तिक गप्पा किंवा गट गप्पा वापरून संभाषण करणे शक्य होईल.

आजपासून JioPhone ॲप स्टोअर मध्ये WhatsApp उपलब्ध होईल. ॲप स्टोअर वर किंवा डाउनलोड वर क्लिक करून लोकांना JioPhone आणि JioPhone 2 दोन्हीवर WhatsApp डाउनलोड करणे शक्य आहे.