WhatsApp ब्लॉग

इमोजी असो की कॅमेरा, स्टेटस असो किंवा ऍनिमेटेड GIFs असोत, आम्ही नेहमीच मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहणे सोपे आणि मजेशीर होण्यासाठी WhatsApp मध्ये नवनवीन वैशिष्ट्ये आणत असतो. आज आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की लोंकाना त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात यासाठी स्टिकर्स हे अजून एक वैशिष्ट्य आणत आहोत.

स्मितहास्य करणारा चहाचा कप असो किंवा मोडलेले हृदय असो, स्टिकर्स अशा भावना व्यक्त करू शकतात ज्या कधीकधी शब्दात उतरवणे शक्य नसते. त्याची सुरुवात म्हणून आम्ही स्टिकर्स पॅक उपलब्ध करून देत आहोत जे WhatsApp येथील डिझायनर्स ने तयार केलेले आहेत आणि इतर कलाकारांनी केलेले स्टिकर्स सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत.

WhatsApp वर स्टिकर्स निर्माण करण्यासाठी जगभरातील इतर डिझाईनर्स आणि डेव्हलपर्स ने तयार केलेल्या स्टिकर्स पॅक ला देखील आणि सपोर्ट करीत आहोत. ते करण्यासाठी आम्ही API आणि इंटेरफेसेस सेट सामाविष्ट केलेले आहेत ज्यामुळे Android किंवा iOS वरील WhatsApp वर स्टिकर्स निर्माण करणे शक्य होईल. तुम्ही इतर कोणत्याही अॅप प्रमाणे Google Play Store किंवा Apple App Store वर हे स्टिकर्स पब्लिश करू शकता, आणि ज्या वापरकर्त्यानी ते स्टिकर्स डाऊनलोड केलेले आहेत त्यांना ते WhatsApp मधून वापरणे लगेच सुरु करता येईल. WhatsApp साठी स्वतःचे स्टिकर्स तयार करण्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास येथे वाचा.

चॅट मध्ये स्टिकर्स वापरण्यासाठी, नवीन स्टिकर बटणावर टॅप करा आणि जे स्टिकर तुम्हाला पाठवायचे आहे ते निवडा. अधिक चिन्ह वापरून तुम्ही अजून स्टिकर्स पॅक समाविष्ट करू शकता.

पुढील काही आठवड्यांमध्ये Android आणि iPhone वर स्टिकर्स उपलब्ध होतील. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ते वापरताना मजा येईल!