गेल्याच वर्षी आम्ही घोषित केले होते की संपूर्ण जगभरात दर महिन्याला एक अब्ज पेक्षा अधिक वापरकर्ते WhatsApp वापरतात. आज, आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की आता संपूर्ण जगभरात एक अब्ज पेक्षा अधिक वापरकर्ते दररोज स्वतःच्या मित्रपरिवार व कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी WhatsApp चा वापर करतात.
वैयक्तिक फोटो असो अथवा व्हिडिओ शेअर करणे असो किंवा व्हिडिओ कॉलिंग अथवा स्टेटस च्या मार्फत मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहणे असो WhatsApp वर संभाषण करणे हे आता अतिशय सोयीस्कर आणि अधिक खाजगी आहे. आम्ही आभारी आहोत की इतके सर्वजण एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी ही नवीन वैशिष्ट्ये स्वतःच्या स्वतंत्र शैलीने वापरतात.
या मैलाच्या दगडाचा आनंदोत्सव साजरा करताना आम्हाला आता अधिकच जबाबदारीची जाणीव होत आहे त्यासाठी WhatsApp कडून अभिप्रेत असलेल्या विश्वासार्ह, सुलभ आणि सुरक्षितते सह आम्ही नवनवीन वैशिष्ट्ये तुम्हाला प्रदान करण्यासाठी सज्ज आहोत. तुमच्या निरंतर सहकार्यासाठी आभारी आहोत.