WhatsApp ब्लॉग

संपूर्ण जगभरात १ अब्ज होऊन अधिक लोक त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रपरिवाराशी संपर्कात राहण्यासाठी WhatsApp दररोज वापरतात आणि आजकाल अनेक लोक विविध व्यवसायांशी संपर्क करण्यासाठी देखील WhatsApp वापरतात, मग ते एखाद्या स्थानिक बेकरी मध्ये दिलेली ऑर्डर असो किंवा एखाद्या कपड्यांच्या दुकानात आलेले नवीन स्टाईलचे कपडे असोत. परंतु हे WhatsApp वर सध्या अत्यंत प्राथमिक स्वरूपात आहे. आम्ही अनेक दुकानदारांकडून हे ऐकले आहे की ते त्यांच्या शेकडो ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी ते WhatsApp दररोज वापरतात, केवळ एका स्मार्टफोन द्वारे हे शक्य होते आणि अनेकांना WhatsApp वरील हे व्यवसाय सत्यापित आहेत की नाही याबद्दल साशंकता असते. पुढील काही महिन्यांमध्ये आम्ही अशा वैशिष्ट्यांची चाचणी घेऊ जी अशा प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतील आणि लोकांना त्यांना हव्या असलेल्या व्यवसायांशी संपर्कात राहणे सोयीचे होईल. आमचे उद्दिष्ट साधे आणि सरळ आहे - आम्ही लोकांना एकमेकांशी जोडताना जे काही शिकलो आहोत त्याचा त्यांना महत्वाच्या वाटणाऱ्या व्यवसायांशी जोडताना सुद्धा उपयोग व्हावा.

आम्हाला जाणीव आहे की प्रत्येक व्यवसायाच्या काही विशिष्ट अशा गरजा असतात. उदाहरणार्थ, त्यांचे अधिकृत अस्तित्व - एक सत्यापित प्रोफाइल ज्यायोगे इतर व्यक्तींच्या मार्फत त्या व्यवसायास मान्यता मिळविणे - आणि सहजरित्या त्यांच्याशी संवाद साधणे शक्य होते. आम्ही लहान व्यावसायिकांसाठी मोफत 'WhatsApp व्यवसाय' अॅप आणि मोठ मोठ्या कंपन्या ज्या जागतिक स्तरावर विविध ग्राहकांना सेवा पुरवितात जसे की एरलाईन्स, इ-कॉमर्स साईट्स आणि बँक अशांसाठी इंटरप्राईझ सोल्युशन निर्माण करण्यासाठी नवीन अशी काही साधने तयार करीत आहोत व त्यांची चाचणी घेत आहोत. असे व्यवसाय आमची सेवा वापरून ग्राहकांना उपयुक्त अधिसूचना पाठवू शकतात जसे की विमानाची वेळ, डिलिव्हरी पोचपावती आणि इतर अपडेट्स.

व्यवसाय कोठेही असो एखाद्या गल्लीत असो किंवा जगभरात पसरलेला असो, सर्व लोकांची ही अपेक्षा असते की WhatsApp हे जलद, विश्वासार्ह आणि सुरक्षित असते. या चाचणी कालावधी मध्ये आम्ही अतिशय काळजीपूर्वक सर्व अभिप्राय ऐकत आहोत आणि जशी ही वैशिष्ट्ये अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देऊ तसे आम्ही लोकांना त्याची माहिती देत राहू. हे सर्व काटेकोर पद्धतीने होणे आणि आमच्या वापरकर्त्यांना आणि व्यावसायिकांना नवीन अनुभव प्रदान करता येण्यासाठी त्याचा सखोल विचार आमच्यातर्फे केला जाणे अत्यंत महत्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मदतपुस्तिकेतील हा लेख वाचा.