WhatsApp ब्लॉग

आम्ही WhatsApp ला खाजगी मेसेजिंग अ‍ॅप बनवला आहे जो मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी संप्रेषण करण्याचा एक सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे आणि आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत, आम्ही जिवलगपणाची भावना जपून ठेवण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करतो जे लोकांना आवडते असल्याचे ते सांगतात.

काही वर्षांपूर्वी आम्ही WhatsApp मध्ये एक वैशिष्ट्य जोडले जे तुम्हाला एकाचवेळी एकापेक्षा अधिक चॅटना संदेश फॉरवर्ड करू देते.

आज, आम्ही फॉरवर्ड करणे मर्यादित करण्याची चाचणी लाँच करत आहोत जी WhatsApp वापरणार्‍या प्रत्येकाला लागू होईल. भारतामध्ये - जेथे लोक जगभरातील कोणत्याही अन्य देशाच्या तुलनेत अधिक संदेश, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करतात - आम्ही एकाच वेळी ५ चॅट इतक्या कमी मर्यादेचीही चाचणी करू आणि आम्ही मीडिया संदेशांच्या बाजूचे त्वरित फॉरवर्ड बटण काढून टाकू.

आम्हाला विश्वास आहे की आपण सर्वांनी या बदलांचे मुल्यांकन करणे पुढे सुरू ठेवल्यास याचा WhatsApp ज्या उद्देशाने डिझाइन केला आहे तो उद्देश कायम ठेवण्यास मदत होईल: एक खाजगी मेसेजिंग अ‍ॅप.

आम्ही तुमच्या सुरक्षा आणि गोपनीयतेशी पूर्णपणे वचनबद्ध आहोत ज्यामुळे WhatsApp एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट आहे आणि आम्ही यासारखी सारख्या वैशिष्ट्यांसह आमच्या अ‍ॅपमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सुरक्षा टीपा पृष्ठ ला भेट द्या.