WhatsApp सुरु होऊन आता १० वर्षे झाली आहेत! गेल्या दशकामध्ये जगभरातील अनेक लोकांकडून आम्ही ऐकले आहे की ते त्यांच्या जवळच्या लोकांशी संपर्कात राहण्यासाठी, समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी, आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी WhatsApp वापरतात. अशा कहाण्यांमुळे आम्हाला अजूनच स्फूर्ती मिळते आणि हा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षातील मौल्यवान क्षणांकडे दृष्टिक्षेप टाकत आहोत.
आम्ही यापुढे देखील याच उत्साहाने WhatsApp साठी अधिकाधिक सोपे आणि प्रत्येकाला विश्वासार्ह असतील असे फिचर्स तयार करणे असेच सुरु ठेऊ. या प्रवासामध्ये आमची कायम साथ दिल्याबद्दल आम्ही जगभरातील सर्व वापरकर्त्यांचे आभार मानतो!