WhatsApp ब्लॉग
mr
आपली भाषा निवडा
  • Azərbaycanca
  • Afrikaans
  • Bahasa Indonesia
  • Bahasa Melayu
  • Català
  • Česky
  • Dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • Español
  • Français
  • Gaeilge
  • Hrvatski
  • Italiano
  • Kiswahili
  • Latviešu
  • Lietuviškai
  • Magyar
  • Nederlands
  • Norsk
  • Oʻzbekcha
  • Pilipino
  • Polski
  • Português (BR)
  • Português (PT)
  • Română
  • shqip
  • Slovenčina
  • Slovenščina
  • suomi
  • svensk
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • Български
  • Қазақ
  • Македонски
  • Pусский
  • српски
  • Українська
  • ‏עברית‏
  • العربية
  • فارسی
  • اردو
  • বাংলা
  • हिंदी
  • ગુજરાતી
  • ಕನ್ನಡ
  • मराठी
  • தமிழ்
  • తెలుగు
  • മലയാളം
  • ภาษาไทย
  • 简体中文
  • 繁體中文
  • 日本語
  • 한국어
  • WhatsApp वेब
  • फीचर्स
  • डाउनलोड
  • सुरक्षा
  • मदतपुस्तिका
  • डाउनलोड
  • फीचर्स
  • सुरक्षा
  • मदतपुस्तिका
  • संपर्क करा

WhatsApp ब्लॉग

लहान व्यवसायांसाठी कॅटलॉग आणत आहोत

लोकांना WhatsApp वरून त्यांच्या आवडत्या व्यवसायाशी संपर्कात राहायला आवडतं परंतु उत्पादनाची माहिती मिळविण्यासाठी अनेक फोटो आणि मेसेजेसची देवाणघेवाण करणं जिकिरीचं ठरतं. व्यवसाय जी उत्पादने आणि सेवा ऑफर करत आहेत ते जाणून घेणे अधिक सोपे व्हावे यासाठी आम्ही आज WhatsApp Business ॲप मध्ये कॅटलॉग फिचर आणत आहोत.

कॅटलॉग हे मोबाइलवरचे शोरूम असते ज्यामध्ये व्यवसायांना त्यांची उत्पादने मांडता येतात ज्यामुळे ग्राहकांना सर्व उत्पादने सहजपणे चाळता येतात आणि त्यांना जे हवे आहे ते चटकन शोधणे शक्य होते. पूर्वी व्यवसायांना त्यांच्या उत्पादनाचे फोटो एका पाठोपाठ एक असे पाठवावे लागत आणि वारंवार माहिती पाठवावी लागे - आता ग्राहकांना सर्व माहिती WhatsApp मधील कॅटलॉगमधून सहज मिळवता येईल. यामुळे व्यावसायिक जास्त प्रोफेशनल दिसतात तसेच ग्राहकांचे चॅट मधील स्वारस्य टिकून राहण्यामध्ये व त्यांची वेबसाईट बघण्याची उस्तवार टाळणे शक्य होते.

जसे की, इंडोनेशिया मधील टिकाऊ औषधी वनस्पती आणि मसाल्याच्या Agradaya या व्यवसायाचे संस्थापक अंधिका महारदिका यांना आम्ही कॅटलॉग फिचर लवकर उपलब्ध करून दिले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितले की ग्राहकांना त्यांची उत्पादने जाणून घेणे, किंमती जाणून घेणे आणि ते काय ऑफर करतात याचे फोटो पाहणे सुलभ झाले आहे - जे त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी आवश्यक आहे.

व्यावसायिक कॅटलॉगमधील प्रत्येक वस्तूसाठी किंमत, वर्णन आणि उत्पादन कोड यासारखी माहिती समाविष्ट करू शकतो. व्यवसाय आणि ग्राहक दोघांच्याही फोनवरची महत्त्वाची स्टोरेज स्पेस वाचवण्यासाठी WhatsApp ने हे कॅटलॉग फिचर विकसित केले आहे.

WhatsApp Business ॲप मध्ये कॅटलॉग तयार करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. सुरु करण्यासाठी हा व्हिडिओ पहा :


आजपासून Android आणि iPhone साठी WhatsApp Business ॲप वर ब्राझील, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका या देशांमध्ये कॅटलॉग फिचर उपलब्ध होत आहे. जगभरात इतरत्र ते लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. छोट्या व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यास आणि व्यवसाय वाढविण्यास कॅटलॉग कशी मदत करतात हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

७ नोव्हेंबर २०१९

Tweet
Android साठी फिंगरप्रिंट ॲप लॉक आणत आहोत

या वर्षाच्या सुरूवातीस, WhatsApp वापरकर्त्यांना सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर प्रदान करण्यासाठी आम्ही iPhone साठी 'टच आय डी' आणि 'फेस आय डी' ही वैशिष्ट्ये आणली. आज आम्ही Android फोनसाठी देखील असे प्रमाणीकरण सादर करीत आहोत ज्यामुळे आपण आपले फिंगरप्रिंट वापरून ॲप अनलॉक करू शकता. ते सुरु करण्यासाठी, सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > फिंगरप्रिंट लॉक वर टॅप करा. "फिंगरप्रिंट वापरून अनलॉक करा" हे चालू वर सेट करा आणि तुमच्या फिंगरप्रिंटची पुष्टी करा.

३१ ऑक्टोबर, २०१९
Tweet
गटांसाठी नवीन गोपनीयता सेटिंग्ज

WhatsApp मधील गट हे कुटुंब, मित्रमैत्रिणी, सहकर्मचारी, वर्गमित्र आणि इतर कोणीही असो, त्यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वापरले जातात. जसजसे लोकांनी गटांचा वापर अधिक महत्त्वाच्या संभाषणांसाठी सुरु केला तसे त्यांनी ही संभाषणे अधिक नियंत्रित कशी ठेवता येतील याविषयी विचारणा सुरु केली. आज आम्ही नवीन 'गोपनीयता सेटिंग' व आमंत्रण प्रणाली आणली आहे ज्यामुळे तुम्हाला कोण कोण गटामध्ये जोडू शकेल हे तुम्हीच ठरवू शकता.

ते सुरु करण्यासाठी, तुमच्या ॲपच्या सेटिंग्ज मध्ये जा, त्यानंतर खाते > गोपनीयता > गट येथे जाऊन "प्रत्येकजण", "माझे संपर्क" किंवा "यांना वगळा" यापैकी एक पर्याय निवडा. "माझे संपर्क" निवडले तर जे संपर्क तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये आहेत तेच तुम्हाला गटामध्ये जोडू शकतात. "यांना वगळा" निवडले तर ॲड्रेस बुक मधील संपर्कांमधून तुम्हाला कोणी वगळायचे असल्यास ते तुम्ही ठरवू शकता.

अशा नियंत्रणामुळे, जे ॲडमीन तुम्हाला गटामध्ये जोडू शकत नाहीत त्यांनी तुम्हाला खाजगी चॅट द्वारे आमंत्रण पाठविणे गरजेचे आहे असे त्यांना सूचित केले जाईल. यामुळे तुम्हाला गटामध्ये सामील व्हायचे की नाही हे तुम्ही आमंत्रण स्वीकारून अथवा नाकारून ठरवू शकता. आमंत्रण कालबाह्य होण्यापूर्वी तुमच्याकडे तीन दिवस असतील.

या नवीन फिचर मुळे, वापरकर्त्यांना गट संदेश नियंत्रणामध्ये ठेवणे शक्य होईल. आजपासून हे गोपनीयता सेटिंग्ज काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल आणि येणार्‍या आठवड्यांमध्ये WhatsApp ची नवीनतम आवृत्ती असलेल्यांना ते संपूर्ण जगभरात उपलब्ध होईल.

अपडेट : सुरुवातीला जेव्हा आम्ही हे फिचर उपलब्ध केले होते तेव्हाच्या वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार "कोणीच नाही" या पर्यायाऐवजी "यांना वगळा" हा पर्याय आता आम्ही देत आहोत. यामुळे तुम्ही काही विशिष्ट संपर्कांना वगळायचे असल्यास तसे करू शकता किंवा "सर्व निवडा" हे देखील निवडू शकता. हा नवीन अपडेट WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरणाऱ्यांना संपूर्ण जगभरात उपलब्ध होईल.

अखेरचा अपडेट : ५ नोव्हेंबर २०१९

३ एप्रिल २०१९
Tweet
iPhone वर WhatsApp Business अ‍ॅप येत आहे

कित्येक लघु उद्योजकांनी आमच्याकडे अनेक वेळा विचारणा केली की त्यांना त्यांच्या मनपसंत डिव्हाइस वर WhatsApp Business अ‍ॅप वापरायला आवडेल.

आता ते करू शकतात.

आज आम्ही iOS साठी WhatsApp Business अ‍ॅप आणत आहोत. Android आवृत्ती — जिचा जगभरात लाखो व्यावसायिकांनी वापर केला आहे — त्याप्रमाणेच iOS साठी WhatsApp Business अ‍ॅप हेदेखील Apple अ‍ॅप स्टोअर मधून मोफत डाउनलोड करता येईल आणि त्यामध्ये लघुउद्योजक आणि त्यांचे ग्राहक यांचा संवाद सोपा होण्यासाठीची फीचर्स उपलब्ध असतील. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल :

  • व्यावसायिक प्रोफाइल : तुमच्या व्यवसायाबद्दलची उपयुक्त माहिती जसे की व्यवसायाचे वर्णन, ई-मेल किंवा दुकानाचा पत्ता आणि वेबसाईट शेअर करू शकता.
  • मेसेजिंग साधने : उपयुक्त अशी मेसेजिंग साधने वापरून ग्राहकांना प्रत्युत्तर द्या जसे की — तात्काळ प्रत्युत्तर वापरून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना चटकन उत्तर देणे स्वागत संदेश वापरून नवीन ग्राहकांचे स्वागत करणे आणि व्यस्तता संदेश वापरून तुम्ही त्यांना कधी उत्तर देऊ शकतात ते कळवणे.
  • WhatsApp वेब : संभाषणे व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्या डेस्कटॉप वरून चॅट करा आणि ग्राहकांना फाइल पाठवा.

WhatsApp Business अ‍ॅप हे आजपासून उपलब्ध आहे आणि ते ब्राझील, जर्मनी, इंडोनेशिया, भारत, मेक्सिको, लंडन आणि अमेरिका या देशांमध्ये अ‍ॅप स्टोअर वर मोफत डाउनलोड करता येईल. हे अ‍ॅप जगभरात पुढील काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होईल.

जगभरातील लघु उद्योजक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, मग ते ब्राझील मधील ऑनलाईन स्वीट शॉप असो ज्यांनी ६० टक्के विक्री WhatsApp Business मार्फत केली किंवा बंगळुरू, भारत येथे शहरातील छोट्या घरांसाठी कंपोस्ट बिन डिझाईन करणारा लघु उद्योग असो, ते अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या लांबच्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आमच्या अ‍ॅपचा वापर करतात. अजूनही लहान उद्योगांसाठी WhatsApp Business अ‍ॅप सज्ज करण्यासाठी आणि त्यांना व्यवसायात यश मिळविण्यासाठी कशी मदत झाली हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

४ एप्रिल, २०१९
Tweet
१० वर्ष साथ दिल्याबद्दल आभारी आहोत !

WhatsApp सुरु होऊन आता १० वर्षे झाली आहेत! गेल्या दशकामध्ये जगभरातील अनेक लोकांकडून आम्ही ऐकले आहे की ते त्यांच्या जवळच्या लोकांशी संपर्कात राहण्यासाठी, समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी, आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी WhatsApp वापरतात. अशा कहाण्यांमुळे आम्हाला अजूनच स्फूर्ती मिळते आणि हा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षातील मौल्यवान क्षणांकडे दृष्टिक्षेप टाकत आहोत.

आम्ही यापुढे देखील याच उत्साहाने WhatsApp साठी अधिकाधिक सोपे आणि प्रत्येकाला विश्वासार्ह असतील असे फिचर्स तयार करणे असेच सुरु ठेऊ. या प्रवासामध्ये आमची कायम साथ दिल्याबद्दल आम्ही जगभरातील सर्व वापरकर्त्यांचे आभार मानतो!


२५ फेब्रुवारी, २०१९
Tweet
'टच आय डी' आणि 'फेस आय डी' येत आहे

WhatsApp मध्ये, खाजगी मेसेजिंगबद्दल आम्ही नेहमीच जागरूक असतो आणि म्हणूनच आज आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की हे शक्य होण्यासाठी आम्ही iPhone वरील WhatsApp मध्ये 'टच आय डी' आणि 'फेस आय डी' अर्थात 'स्पर्श ओळख' आणि 'चेहरा ओळख' घेऊन येत आहोत.

यामुळे इतर कोणी तुमचा फोन घेऊन तुमचे संदेश वाचणे शक्य होणार नाही.

WhatsApp चे हे फिचर iPhone वर सुरु करण्यासाठी सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > स्क्रीन लॉक येथे टॅप करा आणि 'टच आय डी' किंवा 'फेस आय डी' सुरु करा. तुम्हाला बंद केल्यानंतर किती कालावधीनंतर तुम्हाला 'टच आय डी' आणि 'फेस आय डी' साठी विचारण्यात यावे हे तुम्ही निवडू शकता.

हे फिचर iPhone 5s अधिक किंवा iOS 9 किंवा अधिक आवृत्तींवर उपलब्ध आहे.

४ फेब्रुवारी, २०१९
Tweet
WhatsApp Business चा प्रथम वर्धापन दिन साजरा करत आहोत, वेब आणि डेस्कटॉपच्या नवीन फीचर्स सह!

गेल्यावर्षी जानेवारीमध्ये आम्ही WhatsApp Business हे अ‍ॅप आणले आणि आता पाच दशलक्ष होऊन अधिक व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी, त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच समाजसेवेसाठी संपूर्ण जगभरात याचा वापर करतात. आम्हाला आनंद आहे की आम्ही लाखो व्यवसायांना वृद्धिंगत होण्यात मदत केली आहे. उदाहरणार्थ, भारतामध्ये बेंगलोर स्थित Glassic नामक आय वेअर ब्रँड ने आम्हाला असे सांगितले की त्यांच्या नवीन विक्री मध्ये जी वाढ झाली आहे त्यामध्ये ३० टक्के वाढ ही WhatsApp Business मुळे झाली आहे.

WhatsApp Business चा प्रथम वर्धापन दिन साजरा करत असताना आम्ही हे घोषित करत आहोत की WhatsApp वेब आणि डेस्कटॉप वर प्रचलित असणारे आता काही फीचर्स येत आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल :

  • तात्काळ प्रत्युत्तर : नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हे संदेश वापरता येतात. तुमच्या कीबोर्ड वर “/” टाईप करून तात्काळ प्रत्युत्तर निवडा आणि पाठवा.
  • लेबल्स : तुमचे चॅट परत शोधणे सहज शक्य व्हावे यासाठी तुमचे संपर्क किंवा चॅट लेबल लावून व्यवस्थापित करा.
  • चॅट लिस्ट फिल्टरिंग : न वाचलेले संदेश, गट किंवा प्रसारण याद्या व्यवस्थापित करण्यासाठी चॅट फिल्टर करा.

कॉम्प्युटरवर हे फीचर्स आल्याने व्यावसायिकांचा वेळ वाचतो आणि त्यांना त्यांच्या ग्राहकांशी त्वरित संपर्क साधता येतो. WhatsApp Business वृद्धिंगत करण्यात आणि त्यामध्ये नवनवीन फीचर्स आणत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे यामुळे ग्राहकांना ज्या व्यवसायांमध्ये स्वारस्य आहे ते शोधणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे अधिकाधिक सोपे होईल.

२४ जानेवारी, २०१९
Tweet
'स्टिकर्स' येत आहेत

इमोजी असो की कॅमेरा, स्टेटस असो किंवा ऍनिमेटेड GIFs असोत, आम्ही नेहमीच मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहणे सोपे आणि मजेशीर होण्यासाठी WhatsApp मध्ये नवनवीन वैशिष्ट्ये आणत असतो. आज आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की लोंकाना त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात यासाठी स्टिकर्स हे अजून एक वैशिष्ट्य आणत आहोत.

स्मितहास्य करणारा चहाचा कप असो किंवा मोडलेले हृदय असो, स्टिकर्स अशा भावना व्यक्त करू शकतात ज्या कधीकधी शब्दात उतरवणे शक्य नसते. त्याची सुरुवात म्हणून आम्ही स्टिकर्स पॅक उपलब्ध करून देत आहोत जे WhatsApp येथील डिझायनर्स ने तयार केलेले आहेत आणि इतर कलाकारांनी केलेले स्टिकर्स सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत.

WhatsApp वर स्टिकर्स निर्माण करण्यासाठी जगभरातील इतर डिझाईनर्स आणि डेव्हलपर्स ने तयार केलेल्या स्टिकर्स पॅक ला देखील आणि सपोर्ट करीत आहोत. ते करण्यासाठी आम्ही API आणि इंटेरफेसेस सेट सामाविष्ट केलेले आहेत ज्यामुळे Android किंवा iOS वरील WhatsApp वर स्टिकर्स निर्माण करणे शक्य होईल. तुम्ही इतर कोणत्याही ॲप प्रमाणे Google Play Store किंवा Apple App Store वर हे स्टिकर्स पब्लिश करू शकता, आणि ज्या वापरकर्त्यानी ते स्टिकर्स डाऊनलोड केलेले आहेत त्यांना ते WhatsApp मधून वापरणे लगेच सुरु करता येईल. WhatsApp साठी स्वतःचे स्टिकर्स तयार करण्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास येथे वाचा.

चॅट मध्ये स्टिकर्स वापरण्यासाठी, नवीन स्टिकर बटणावर टॅप करा आणि जे स्टिकर तुम्हाला पाठवायचे आहे ते निवडा. अधिक चिन्ह वापरून तुम्ही अजून स्टिकर्स पॅक समाविष्ट करू शकता.

पुढील काही आठवड्यांमध्ये Android आणि iPhone वर स्टिकर्स उपलब्ध होतील. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ते वापरताना मजा येईल!

२५ ऑक्टोबर, २०१८
Tweet
KaiOS वर चालणाऱ्या JioPhone फोन साठी WhatsApp

आता प्रथमच JioPhone वर संपूर्ण भारतभर WhatsApp उपलब्ध होणार आहे. लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी सोपा, विश्वासार्ह आणि सुरक्षित मार्ग प्राप्त होण्यासाठी WhatsApp ने JioPhone च्या KaiOS या ऑपरेटिंग सिस्टीम साठी या खाजगी मेसेजिंग ॲपची नवीन आवृत्ती निर्माण केली आहे.

या नवीन आवृत्तीमध्ये WhatsApp मधील उत्तम वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये जलद आणि वैश्वासार्ह मेसेजिंग आणि फोटो आणि व्हिडिओ पाठविणे याचा समावेश आहे - ते सुद्धा सर्व एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड स्वरूपात! व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करणे आणि पाठविणे हे तुम्ही कि पॅड वर एक-दोन वेळा टॅप करून अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता. सुरुवात करण्यासाठी JioPhone वापरकर्त्यांनी फक्त त्यांच्या फोन नंबरची WhatsApp वर पडताळणी करणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांना इतर WhatsApp वापरकर्त्यांबरोबर वैयक्तिक गप्पा किंवा गट गप्पा वापरून संभाषण करणे शक्य होईल.

आजपासून JioPhone ॲप स्टोअर मध्ये WhatsApp उपलब्ध होईल. ॲप स्टोअर वर किंवा डाउनलोड वर क्लिक करून लोकांना JioPhone आणि JioPhone 2 दोन्हीवर WhatsApp डाउनलोड करणे शक्य आहे.

१० सप्टेंबर, २०१८
Tweet
Growing our Tools for Business

As we announced last year, WhatsApp is building new tools to help people and businesses communicate with each other. Since we launched the WhatsApp Business app people have told us that it's quicker and easier to chat with a business than making a call or sending an e-mail. Today we are expanding our support for businesses that need more powerful tools to communicate with their customers.

Here's how people can connect with a business:

  • Request helpful information: When you need a shipping confirmation or boarding pass, you can give your mobile number to a business on their website, on their app, or in their store to send you information on WhatsApp.
  • Start a conversation: You may see a click-to-chat button on a website or Facebook ad to quickly message a business.
  • Get support: Some businesses may provide real-time support on WhatsApp to answer questions about their products or help you resolve an issue.

With this approach, you will continue to have full control over the messages you receive. Businesses will pay to send certain messages so they are selective and your chats don't get cluttered. In addition, messages will remain end-to-end encrypted and you can block any business with the tap of a button.

We will bring more businesses onto WhatsApp over a period of time. To do so, we will work directly with a few hundred businesses and a select number of companies that specialize in managing customer communications.

If you are interested in how a business can start using these new tools, you can learn more here. As always, we will be listening carefully to feedback as we go forward.

August 1, 2018
Tweet
पुढील पृष्ठ

WhatsApp

  • फीचर्स
  • सुरक्षा
  • डाउनलोड
  • WhatsApp वेब
  • व्यवसाय

कंपनी

  • आमच्याबद्दल
  • करियर्स
  • ब्रँड केंद्र
  • संपर्क करा
  • ब्लॉग
  • WhatsApp अनुभव

डाउनलोड

  • Mac/PC
  • Android
  • iPhone
  • Windows Phone

मदत

  • मदतपुस्तिका
  • Twitter
  • Facebook
2019 © WhatsApp Inc.
गोपनीयता आणि अटी