आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्ट केलेले रहाकम्युनिटी बनवास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • प्रायव्हसी
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्ट केलेले रहा

      तुमच्या जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचा.

    • कम्युनिटी बनवा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp बिझनेस

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

WhatsApp शी प्रॉक्सीद्वारे कनेक्ट करणे

WhatsApp वापरणार्‍या प्रत्येकास नवीन वर्षाच्या शुभेच्छा! आम्ही २०२३ वर्षाचा प्रारंभ खाजगी मजकूर किंवा कॉल करून साजरा केला असल्याने, आम्हाला याची जाणीव आहे की असे अनेक लोक आहेत ज्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या जिवलग व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही.

मदत करण्‍यासाठी, आज आम्ही जगभरात WhatsApp वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी समर्थन सुरू करत आहोत. याचा अर्थ असा आहे की लोकांचे कनेक्शन ब्लॉक झाले किंवा त्यात व्यत्यय आला तर WhatsApp चा ॲक्सेस अबाधित राखण्यासाठी आम्ही लोकांना सक्षम करत आहोत.

प्रॉक्सी निवडल्याने लोकांना मोकळेपणाने कम्युनिकेट करण्‍यात मदत करण्‍यासाठी समर्पित असलेल्या जगभरातील स्वयंसेवक आणि संस्थांनी सेट केलेल्या सर्व्हरद्वारे तुम्हाला WhatsApp शी कनेक्ट करता येते. इतरांना कनेक्ट करण्‍यात मदत करण्‍याची क्षमता तुमच्यामध्‍ये असल्यास, तुम्ही प्रॉक्सी कसे सेट करावी ते येथेतुम्ही जाणून घेऊ शकता.

प्रॉक्सीद्वारे कनेक्ट करण्‍याने WhatsApp प्रदान करते ती उच्च दर्जाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखली जाते. तुमचे वैयक्तिक मेसेज अद्यापही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतील — यामुळे याची खात्री होईल की ते तुम्ही आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्ही कम्युनिकेट करत आहात त्याच व्यक्तीमध्‍ये असतील आणि ते प्रॉक्सी सर्व्हर, WhatsApp किंवा Meta अशा कोणत्याही असलेल्या घटकास दिसणार नाहीत.

२०२३ वर्षाची आमची इच्छा ही आहे की हे इंटरनेटमधील शटडाऊन कधीही होऊ नये. आम्ही शेवटच्या महिन्यांमध्‍ये ईराणमध्‍ये पाहिलेल्या अशा व्यत्ययांमुळे लोकांचे मानवाधिकार नाकारण्‍यात आले आहेत आणि लोकांना तातडीची मदत मिळणे बंद झाले आहे. हे शटडाऊन चालू राहिले तरीदेखील, जिथे सुरक्षित आणि विश्वसनीय कम्युनिकेशनची गरज आहे तिथे लोकांना या निराकरणामुळे मदत होईल अशी आम्हाला आशा आहे.

आमच्या ॲपची नवीनतम आवृत्ती रन करणार्‍या प्रत्येकासाठी हा पर्याय आता मेनूमध्‍ये उपब्ध आहे. हे फीचर कसे वापरावे याबाबतची अधिक माहिती येथेदिली आहे.

५ जानेवारी, २०२३

ट्विट कराशेअर करा

WhatsApp वर कॉलिंगमध्ये सुधारणा केली

जगभरातील युजरसाठी गोपनीय आणि सुरक्षित मेसेजिंग आणण्यासाठी WhatsApp सर्वोत्तम म्हणून ओळखले जात असताना, अधाधिक लोक व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलसह कनेक्ट होण्याचा मार्ग म्हणून WhatsApp वापरत आहेत. त्यामुळेच आम्ही यावर्षादरम्यान WhatsApp वरील कॉल करण्यासाठी, तुमच्या प्रियजनांशी, सहकर्मचाऱ्यांशी आणि कम्युनिटीशी सुरक्षितपणे कनेक्ट होण्यासाठी काही सुधारणा लॉंच केले आहे.

कॉल्सवरील ग्रुप म्हणून चांगल्याप्रकारे कनेक्ट होण्यासाठी आम्ही नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत:

  • ३२ व्यक्तींचा कॉल: अगदी व्हॉईस कॉल प्रमाणे, आता तुम्ही सुमारे ३२ लोकांसबोत तुमच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करू शकता, पूर्वीपेक्षा चारपट अधिक लोकांसोबत
  • कॉल सहभागींना मेसेज करा किंवा म्यूट करा: सहभागीवर जास्त वेळ दाबल्याने व्हिडिओ किंवा ऑडिओ फीड मोठी होईल आणि कॉल चालू असताना तुम्हाला एकतर म्यूट किंवा स्वतंत्रपणे मेसेज पाठवता येईल.
  • कॉल लिंक: शेवटच्या क्षणी होणारा कॉल असो किंवा प्लॅन केलेला असो, तुम्ही कॉल लिंक शेअर करून लोकांना सहजपणे ग्रुपकॉलवर आमंत्रित करू शकता

आम्ही अधिक अखंड कॉलिंग अनुभवासाठी डिझाईनमध्ये देखील बदल केले आहेत:

  • रंगीत वेव्हफॉर्म्स: आता तुम्ही एखाद्याचा कॅमेरा बंद असताना देखील कोण बोलत आहे हे पाहू शकता
  • इन-कॉल बॅनर नोटिफिकेशन: कोणीतरी नवीन ग्रुप कॉलमध्ये केव्हा सामील झाले ते पहा
  • पिक्चर इन पिक्चर ऑन iOS: आता बीटा चाचणीमध्ये आणि नवीन वर्षात रोल आउट, कॉलवर असताना सहजपणे मल्टीटास्क करा, धन्यवाद मिनिमाईझ्ड इन-कॉल व्हिडिओ स्क्रीन

नेहमीप्रमाणे, लोकांची गोपनीयता आणि सुरक्षा संरक्षित करण्यासाठी WhatsApp वरील सर्व कॉल डिफॉल्टनुसार एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले आहेत.

आम्ही पुढील वर्षी सुधारणा करत राहू कारण तुम्ही जगात कुठेही असाल, WhatsApp वर उच्च दर्जाच्या, खाजगी कॉलिंगला आम्ही सपोर्ट करत राहू.

१४ डिसेंबर, २०२२

ट्विट कराशेअर करा

WhatsApp वरील अवतार

तुम्हाला स्वत:स व्यक्त करण्‍याचा एक नवीन आणि वैयक्तिकृत मार्ग, अवतार WhatsApp वर सादर करण्‍यात आज आम्हाला आनंद होत आहे.

तुमचा अवतार तुमची डिजिटल आवृत्ती आहे जी अब्जावधी विविध केशरचना, चेहर्‍याची वैशिष्‍ट्‍ये आणि पोशाख यांच्या मिश्रणांमधून तयार केली जाऊ शकते. WhatsApp वर आता तुम्ही तुमचा वैयक्तिकृत अवतार तुमचा प्रोफाईल फोटो या रूपात वापरू शकता किंवा अनेक भिन्न भावना आणि कृती दर्शवणार्‍या सानुकूल ३६ स्टिकरमधून एक निवडू शकता.

अवतार पाठवणे हा मित्र आणि कुटुंबासोबत भावना शेअर करण्‍याचा जलद आणि मजेदार मार्ग आहे. वास्तविक फोटो न वापरता तुमचे स्वत:चे प्रतिनिधित्व करण्‍याचा हा एक उत्तम मार्ग देखील असू शकतो त्यामुळे आणखी खाजगी असल्याची भावना जाणवू शकते.

अनेक लोकांसाठी अवतार तयार करण्‍याची ही पहिलीच वेळ असेल आणि आम्ही लायटिंग, शेडिंग, केशरचनेचे टेक्स्चर यांसह स्टाइल वाढवणे आणि बरेच काही डिलिव्हर करणे सुरू ठेवू जेणेकरून वेळोवेळी अवतारला आणखी चांगले देखील बनवता येईल.

तुम्हाला आजपासून युजरसाठी सर्वत्र सुरू होत असलेले, तुमचे अवतार तयार करण्यात आणि शेअर करण्‍यात मजा येत असेल अशी आम्ही आशा करतो.

७ डिसेंबर २०२२

ट्विट कराशेअर करा

WhatsApp वर शोधा, मेसेज करा आणि खरेदी करा

लोकांना WhatsApp वर एखादा बिझनेस शोधण्‍यात, मेसेज करण्‍यात किंवा तेथून एखादी वस्तू खरेदी करण्‍यात मदत करण्‍यासाठी आम्ही जे तयार करतो आहोत त्याबद्दल एक अपडेट आम्ही आज शेअर करत आहोत. आज आमचा कार्यसंघ ब्राझीलमध्‍ये आहे जिथे आम्ही संपूर्ण खरेदी अनुभव थेट WhatsApp चॅटवर आणण्‍याच्या आमच्या उद्दिष्‍टावर चर्चा करत आहोत.

एक बिझनेस शोधा

लोकांना WhatsApp वर आधीपासून असलेल्या लक्षावधी लहान बिझनेसकडून आणि हजारो ब्रॅंडकडून त्वरित मदत मिळवण्‍याचा सोयीस्कर मार्ग हवा आहे. आज आम्ही थेट WhatsApp वर बिझनेस शोधण्याची क्षमता लॉंच करत आहोत त्यामुळे लोक श्रेणीनुसार बिझनेस ब्राउझ करू शकतात – जसे की प्रवास किंवा बॅंकिंग – किंवा बिझनेसच्या नावानुसार शोधणे. यामुळे लोकांना वेबसाइइटबाहेर फोन नंबर शोधावे लागणार नाहीत किंवा त्यांच्या संपर्कांमध्‍ये नंबर टाइप करावा लागणार नाही.

आम्ही व्यवसाय शोध अशा प्रकारे तयार केला आहे की ज्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचे संरक्षण केले जाते. तुम्ही जे शोधता ते त्यावर अशा प्रकारे प्रक्रिया केली जाते ते परत तुमच्या खात्याशी लिंक केले जाऊ शकत नाही. प्रारंभ करण्‍यासाठी, आम्ही बिझनेस शोधण्‍याची क्षमता ब्राझील, इंडोनेशिया, मेक्सिको आणि युकेमध्‍ये आणत आहोत जिथे लोक आमच्या WhatsApp Business प्‍लॅटफॉर्मचा वापर करून कंपन्या शोधू शकतात. ब्राझीलमध्‍ये, शोधमुळे लोकांना लहान बिझनेसदेखील शोधण्यात मदत होईल.

मेसेज

अधिकाधिक बिझनेस WhatsApp वापरत असल्यामुळे, आमचे पहिले तत्त्व हे लोकांना त्यांच्या संभाषणावर नियंत्रण मिळवून देणे हे आहे. हे योग्य करून घेणे आमच्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांसाठी आणि बिझनेससाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे WhatsApp साठी आहे. WhatsApp मध्‍ये सामील झालेले अलीकडील काही बिझनेस लोकांना बॅंक खाते उघडण्‍यात, त्यांचे मेट्रोचे तिकीट खरेदी करण्‍यात आणि किराणासामानाची ऑर्डर देण्‍यात मदत करत आहेत.

खरेदी करा

अखेरीस आम्ही इच्छितो की लोकांना थेट त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डसोबतच्या चॅटद्वारे सुरक्षित पेमेंट करता यावे. आम्ही अलीकडे launched this experience in India आणि याची चाचणी ब्राझीलमध्‍ये अनेक पेमेंट भागीदारांसोबत होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. जे लोक आणि बिझनेस वेबसाइटवर न जाता, अन्य ॲप न उघडता किंवा प्रत्यक्षपणे पैसे न देता WhatsApp वर खरेदी आणि विक्री करू इच्छित आहेत अशा लोकांसाठी आणि बिझनेससाठी हा अखंड चेकआऊट अनुभव लक्षणीय परिवर्तन करणारा असेल.

हे नवीन अनुभव WhatsApp ला लोकांना त्यांच्या आवडीच्या बिझनेसशी कनेक्ट करण्‍याचा उत्तम मार्ग बनवण्याचा एक भाग आहेत. आम्ही तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करत आहोत.

17 नोव्हेंबर 2022

ट्विट कराशेअर करा

Communities Now Available!

As we shared earlier this year, we’ve been hard at work building Communities, a major update to how people will be able to connect on WhatsApp in the groups that matter to them. Today, we’re excited to announce we’ve started to roll out Communities on WhatsApp globally and this will be available to everyone over the next few months.

Communities like neighborhoods, parents at a school, and workplaces can now connect multiple groups together under one umbrella to organize group conversations on WhatsApp. To get started, tap on the new communities tab at the top of your chats on Android and at the bottom on iOS. From there you can start a new Community from scratch or add existing groups.

Once you’re in a community, you can easily switch between available groups to get the information you need, when you need it, and admins can send important updates to everyone in the Community

With Communities, we’re aiming to raise the bar for how organizations communicate with a level of privacy and security not found anywhere else. The alternatives available today require trusting apps or software companies with a copy of their messages - and we think they deserve the higher level of security provided by end-to-end encryption.

Today we’re also releasing three more features we think users will be excited about: the ability to create in-chat polls, 32 person video calling, and groups with up to 1024 users. Just like emoji reactions, larger file sharing, and admin delete, these features can be used in any group but will be particularly helpful for Communities.

We’ve been working with over 50 organizations in 15 countries to build Communities to meet their needs. We’re excited that the feedback we’ve heard so far is these new tools are helping groups like these better organize and achieve their goals. There’s a lot more we plan to build and we’ll keep adding features over the coming months. For now, we’re excited to get this into more people’s hands and hear your feedback too.

November 3, 2022

ट्विट कराशेअर करा

New Features for More Privacy, More Protection, More Control

At WhatsApp, Privacy is in our DNA, and we will never stop building new ways to protect your personal conversations. We believe messaging and calling should always be as private and secure as having face-to-face conversations. Kind of like if two people were talking and no one else was around.

WhatsApp protects the personal calls and messages of users with default end-to-end encryption, so no one but the intended recipient can hear or see them. But that is just one important part of protecting your privacy. Over the years, we’ve added new layers of privacy protections to give you multiple ways to secure your messages, including disappearing messages that self-destruct, end-to-end encrypted backups when you want to save your chat history, 2-step verification for added security, and the ability to block and report unwanted chats.

Today, we’re excited to bring several new privacy features that provide even more layers of protection and give you more control over your messages. This is all part of how we work to keep your conversations secure on WhatsApp.

  • Leave Groups Silently: We love our group chats but some are not forever. We’re making it possible to exit a group privately without making it a big deal to everyone. Now, instead of notifying the full group when you are leaving, only the admins will be notified. This feature will start to roll out to all users this month.
  • Choose Who Can See When You're Online: Seeing when friends or family are online helps us feel connected to one another, but we’ve all had times when we wanted to check our WhatsApp privately. For the moments you want to keep your online presence private, we’re introducing the ability to select who can and can’t see when you’re online. This will start rolling out to all users this month.
  • Screenshot Blocking For View Once Messages: View Once is already an incredibly popular way to share photos or media that don’t need to have a permanent digital record. Now we’re enabling screenshot blocking for View Once messages for an added layer of protection. We’re testing this feature now and are excited to roll it out to users soon.

To spread the word about these new layers of protection, we’re also kicking off a campaign to educate people about the new features and our continued commitment to protecting your private conversations on WhatsApp. We hope people enjoy getting to use these new features and benefit from several options that help you keep your messages secure. We look forward to your feedback on what to build next.

August 9, 2022

ट्विट कराशेअर करा

सर्व स्वरुपातील बिझनेसेससाठी WhatsApp वर सुरुवात करणे झाले अधिक सोपे

जगभरातील लोक तसेच बिझनेसेस आता आपल्या कामांसाठी WhatsApp चा अवलंब करत आहेत. कौटुंबिक व्यवसाय असो किंवा एखादी फॉर्च्यून ५०० कंपनी, सर्व स्तरांवरील बिझनेसेस आज आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी WhatsApp चा वापर करतात.

WhatsApp ने जसे सातासमुद्रापलीकडील प्रियजनांना एकमेकांशी मुक्त संवाद साधणे शक्य करून दिले, तसेच बिझनेसेसशी संवाद साधताना येणारी‍ आव्हाने आम्हाला नाहीशी करायची आहेत. याचाच अर्थ फोनवर होल्डवर ठेवले जाणे, एखाद्या न चालणार्‍या वेबसाइटवर येऊन पोहोचणे, किंवा ईमेल पाठवून तो कधी वाचला जाईल का असा प्रश्न पडणे, या समस्या आता कधीच येणार नाहीत.

आजपर्यंत आम्ही कोट्यावधी बिझनेसेसना WhatsApp च्या मदतीने प्रगती करण्यास मदत केली आहे. आपल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह मार्ग हवा असलेल्या सर्व बिझनेसेसना WhatsApp उपलब्ध करून देणे ही त्याची पुढची पायरी आहे.

नवीन क्लाउड-बेस्ड API सह सर्व बिझनेसेस आणि डेव्हलपर्सना WhatsApp उपलब्ध करून देणे

Meta ने पुरवलेल्या निःशुल्क आणि सुरक्षित क्लाउड होस्टिंग सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊन जगभरातील कोणत्याही स्वरुपाच्या बिझनेसेससाठी WhatsApp उपलब्ध करून देण्याकरिता आज आम्ही महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. या नवीन API च्या साहाय्याने प्रारंभ करण्याचा कालावधी आम्ही काही महिन्यांवरून अगदी काही मिनिटांवर आणला आहे. यामुळे बिझनेसेस आणि डेव्हलपर्सना आमची सर्व्हिस चटकन आणि सुलभतेने ॲक्सेस करता येईल आणि थेट WhatsApp च्या सर्व्हिसवरती आपल्या ग्राहकांना सानुकूल अनुभव देऊ करणारी आणि अधिक जलद प्रतिसाद देता येणारी सेवा उभारणे शक्य होईल. या सर्व्हिसेसमुळे आमच्या भागीदारांचा महागड्या सर्व्हर्सवरचा खर्च कमी होईल आणि त्यांना ताबडतोब नवीन फीचर्स वापरता येतील. बिझनेसेस थेट साइन अप करू शकतील किंवा आमच्या एखाद्या बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडरसोबत काम करू शकतील.

वेगाने वाढणाऱ्या बिझनेसेससाठी WhatsApp बिझनेस ॲपमध्ये नवीन फीचर्स

गेल्या काही वर्षांत WhatsApp चा वापर करणारे लघु व्यवसाय कसे वाढतात हे आपण पाहिले आहे. अधिक टूल्स देऊन आम्ही त्यांना साहाय्य करू इच्छितो. आम्हाला असे वाटते की काही बिझनेसेसना क्लाउड-बेस्ड API वापरायला आवडेल तर बरेच जण WhatsApp Business ॲप वापरणे सुरू ठेवतील. या बिझनेसेसना त्यांची कामे काही थोडक्या लोकांपलीकडे नेऊन, त्यांचा ब्रॅंड ऑनलाइन स्वरूपात अधिक प्रभावी करण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही काही प्रगत फीचर्सवरदेखील काम करत आहोत - उदाहरणार्थ अधिकतम १० डिव्हाइसेसवरील चॅट्स एकावेळी व्यवस्थापित करता येणे, जेणेकरून बिझनेसेसना येणारे चॅट्स अधिक चांगल्या प्रकारे हाताळणे शक्य होईल. आपल्या ग्राहकांचे आपल्या ऑनलाइन उपस्थितीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही बिझनेसेसना नवीन सानुकूलित करता येणारे WhatsApp क्लिक-टू-चॅट लिंक्सदेखील पुरवू. हे सर्व अतिरिक्त आणि पर्यायी फीचर्स WhatsApp बिझनेस ॲपमधील एका नवीन प्रीमियम सर्व्हिसचा भाग म्हणून आम्ही सशुल्क उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही याची अधिक माहिती लवकरच शेअर करू.

बिझनेसेसना मदत करण्याचे हे नवीन पर्याय उपलब्ध असले तरीदेखील लोकांना बिझनेसेसशी बोलता येण्यामागची आमची मूल्ये बदललेली नाहीत. आपण कोणत्या बिझनेसेसशी बोलत आहोत याचे नियंत्रण लोकांकडेच असेल आणि त्यांनी संपर्क करण्याची विनंती केल्याशिवाय कोणतेही बिझनेसेस त्यांना मेसेज पाठवू शकणार नाहीत.

आम्हाला आशा आहे की लोकांना त्यांच्या आवडत्या बिझनेसेससोबत WhatsApp वर चॅट करण्याचा हा नवीन पर्याय आवडेल. तसेच नवीन बिझनेसेस कसे तयार होत आहेत आणि वाढत आहेत हे ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.

मे १९, २०२२

ट्विट कराशेअर करा

प्रतिक्रिया, 2GB फाईल शेअरिंग, ५१२ ग्रुप्स

स्किन टोन निवडण्याच्या पर्यायांसह उपलब्ध असलेल्या संपूर्ण इमोजी कीबोर्डमुळे WhatsApp वरील प्रतिक्रिया अधिक सुधारत आहेत. वापरकर्त्यांना आपल्या कुटुंब आणि मित्रांशी चॅट करताना व्यक्त होण्याचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यास आम्ही उत्साहित आहोत.

आम्ही मागच्या महिन्यात WhatsApp वरील कम्युनिटीजबाबतच्या आमच्या कल्पनेबद्दल घोषणा केली होती. आता आम्ही संस्था, बिझनेसेस आणि इतर सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या ग्रुप्सना सुरक्षितरीत्या संभाषण करून WhatsApp वर आपली कामे करता यावीत यासाठी कम्युनिटीजची निर्मिती करत आहोत. आम्हाला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे आणि म्हणूनच नवनवीन फीचर्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

आम्हाला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की ॲपच्या नवीनतम आवृत्तीवर आता इमोजी प्रतिक्रिया उपलब्ध आहेत. प्रतिक्रिया गंमतीशीर आणि जलद असून त्यांच्यामुळे ग्रुप्सवरील अतिरिक्त भारदेखील कमी होतो. प्रतिक्रियांमध्ये अधिक सुधारणा आणण्यासाठी भविष्यात आम्ही अभिव्यक्तींचे अधिक विस्तृत पर्याय जोडू.

त्याचबरोबर, तुम्ही आता WhatsApp मध्ये 2GB पर्यंतच्या फाइल्स पाठवू शकता, ज्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतील. ही मर्यादा पूर्वी असलेल्या 100MB या मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे लहान बिझनेसेस आणि शालेय ग्रुप्सना एकत्रित काम करणे सुकर होईल असे आम्हाला वाटते. मोठ्या फाइल्ससाठी तुम्ही वायफायचा वापर करावा असे आम्ही सुचवतो. तुम्ही फाइल अपलोड किंवा डाउनलोड करत असताना एक काउंटर दाखविला जाईल, ज्यामुळे तुमच्या ट्रान्सफरला किती वेळ लागेल हे तुम्हाला समजेल.

चॅटमध्ये अधिक लोकांना जोडता येण्याचा पर्याय असावा अशी विनंतीदेखील आमच्याकडे सतत आल्यामुळे आम्ही आता ग्रुपमध्ये ५१२ लोक जोडण्याची क्षमता हळूहळू उपलब्ध करून देणार आहोत. खाजगी आणि सुरक्षित कम्युनिटी तयार करण्यासाठी मेहनत लागते आणि आम्हाला मनापासून असे वाटते की या विविध सुधारणांच्या मदतीने लोकांना आणि ग्रुप्सना एकमेकांच्या संपर्कात राहता येईल.

आम्हाला आशा आहे की लोकांना हे नवीन अपडेट्स आवडतील. पुढील वर्षभरात असे अनेक बदल शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

शेवटचे अपडेट: जुलै ११, २०२२

मे ५, २०२२

ट्विट कराशेअर करा

WhatsApp वरील कम्युनिटीजबाबतची आमची कल्पना तुमच्यासोबत शेअर करत आहोत

आज कम्युनिटीज ही नवीन फीचरबाबतची कल्पना WhatsApp वर जोडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साल २००९ मध्ये WhatsApp लाँच झाल्यापासून, जेव्हा लोकांना एखाद्या व्यक्तीशी, मित्रांच्या ग्रुपशी किंवा कुटुंबाशी बोलायचे असेल, तेव्हा प्रत्यक्ष भेटीतील संभाषणानंतर दुसरे समाधानकारण संभाषण प्रदान करण्यात आम्ही कशी मदत करू शकू यावर लक्ष केंद्रित केले आहे. कम्युनिटीबरोबर संवाद आणि समन्वय साधण्यासाठी जे लोक WhatsApp वापरत आहेत त्यांची मतेदेखील आम्ही वारंवार जाणून घेत असतो.

शाळा, लोकल क्लब्ज आणि नफा हेतुहीन संस्था यांसारख्या संस्था आता सुरक्षितरित्या संवाद साधण्यासाठी आणि कामे करवून घेण्यासाठी WhatsApp वर अवलंबून राहतात - विशेषतः सार्वत्रिक साथीने जेव्हापासून आपल्या सर्वांना दूर असतानादेखील एकत्र काम करण्याचे अभिनव मार्ग शोधण्यास भाग पाडले, तेव्हापासून. आम्हाला ज्या विपुल प्रमाणात फीडबॅक मिळाला आहे त्यामुळे या कार्यव्यस्त संभाषणांचे व्यवस्थापन करणे लोकांसाठी अधिक सोपे व्हावे म्हणून आम्हाला बरेच काही करता येईल असे वाटते.

येथे कम्युनिटीज मोठी भूमिका बजावू शकतात. WhatsApp वरील कम्युनिटीज लोकांना त्यांच्यासाठी सुयोग्य अशा संरचनेत वेगवेगळे ग्रुप्स एका छताखाली एकत्र आणणे शक्य करतील. त्यामुळे लोकांना संपूर्ण कम्युनिटीला पाठविलेले अपडेट्स मिळवणे आणि छोट्या छोट्या ग्रुप्सना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चासत्र आयोजित करणे अधिक सोपे होऊ शकेल. कम्युनिटीजकडे ॲडमिनसाठी नवीन प्रभावी टूल्सदेखील असतील ज्यामध्ये प्रत्येकाला पाठविले जाणारे घोषणा मेसेजेस आणि कोणते ग्रुप्स समाविष्ट करायचे यावर नियंत्रण अशा गोष्टींचा समावेश असेल.

शाळेच्या मुख्याध्यापकांना कम्युनिटीजमुळे सर्व पालकांना एकत्र आणून, माहित असणे आवश्यक असे अपडेट्स शेअर करणे, तसेच विशिष्ट वर्ग, अभ्यासेतर उपक्रम किंवा स्वयंसेवकांची गरज यांसारखे ग्रुप्स स्थापन करणे अधिक सुलभ होईल.

WhatsApp वर ग्रुप्स ज्याप्रकारे कार्य करतात त्यामध्ये आम्ही अनेक सुधारणा करत आहोत - मग ते कम्युनिटीचा भाग असोत किंवा नसोत. यामुळे लोकांना गोष्टी शेअर करण्याचे नवीन मार्ग मिळण्यास मदत होईल आणि मोठ्या चॅट्सवरील अतिरिक्त भार कमी होईल असे आम्ही मानतो. कम्युनिटीज तयार होण्याआधीच लोकांना नवीन फीचर्स वापरून बघता यावेत म्हणून हे नवीन फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये सादर केले जातील.

  • प्रतिक्रिया - लोकांना चॅटमध्ये वारंवार नवीन मेसेजेस न टाकताही आपले मत त्वरित मांडता यावे म्हणून WhatsApp वर इमोजी प्रतिक्रिया सादर केल्या जात आहेत.
  • ॲडमिनद्वारे हटवणे - ग्रुप ॲडमिन्स सर्व सदस्यांच्या चॅटमधील चुकीचे किंवा आक्षेपार्ह मेसेजेस काढून टाकण्यास सक्षम असतील.
  • फाइल शेअरिंग – लोकांना प्रोजेक्टमध्ये सुलभतेने सहयोग करता यावा म्हणून २ गिगाबाइट्सपर्यंतच्या फाइल्सना सपोर्ट करण्यासाठी आम्ही फाइल शेअरिंग वाढवत आहोत.
  • अधिक मोठे व्हॉइस कॉल्स – चॅटिंग पेक्षा प्रत्यक्ष बोलणे चांगले वाटत असेल अशा लोकांना आता जास्तीत जास्त ३२ लोकांना व्हॉइस कॉल करणे आम्ही सादर करणार आहोत त्यात पूर्णपणे नवीन डिझाइनचा समावेश आहे आणि जे फक्त एका टॅपने करता येईल.

कम्युनिटीज स्वभावतःच खाजगी आहेत आणि म्हणूनच आम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने मेसेजेस सुरक्षित ठेवत राहू. हे सुरक्षा तंत्रज्ञान लोकांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एकजुटीचे संबंध असलेले ग्रुप्स - शाळा, धार्मिक मेळाव्याचे सदस्य किंवा अगदी बिझनेसेस - सर्वांनाच WhatsApp कडून प्रत्येक शब्दाचे मॉनिटरिंग न केले जाता, सुरक्षित आणि खाजगी संभाषणे करता येण्याची अपेक्षा आणि गरज आहे. कम्युनिटीजची गोपनीयता, सुरक्षितता आणि सुरक्षा आम्ही कशाप्रकारे हाताळणार आहोत याबद्दल here येथे अधिक जाणून घ्या.

इतर ॲप्स शेकडो आणि हजारो लोकांच्या चॅट्सची निर्मिती करत असताना, आम्ही जे ग्रुप्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत, त्या ग्रुप्सना सपोर्ट करण्यावर लक्ष केंद्रित करणे पसंत करत आहोत. WhatsApp वर कम्युनिटीज ही नवीन गोष्ट आहे आणि पुढील काही वर्षे त्यांना सपोर्ट करण्यासाठी नवनवीन फीचर्स सादर करण्यावर आमचे लक्ष सर्वाधिक केंद्रित झालेले असेल. कम्युनिटीज तुमच्या हातात देण्यास आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

एप्रिल १४, २०२२

ट्विट कराशेअर करा

आम्ही व्हॉइस मेसेजेस अधिक चांगले बनवत आहोत

आम्ही जेव्हा २०१३ मध्ये प्रथम व्हॉइस मेसेजेस लाँच केले, तेव्हा त्यामुळे लोकांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडू शकेल याची आम्हाला खात्री होती. डिझाईन साधे ठेवल्यामुळे, एखादा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून पाठवणे हे आम्ही मजकूर पाठवण्याइतकेच जलद आणि सोपे केले आहे. WhatsApp वर दररोज आमचे वापरकर्ते सरासरी ७०० कोटी व्हॉइस मेसेजेस पाठवतात, जे नेहमी खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात.

WhatsApp वरील व्हॉइस मेसेजचा अनुभव अधिक चांगला करणार्‍या नवीन फीचर्सची घोषणा करताना आम्हाला आज अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल:

  • चॅट बाहेरील प्लेबॅक: चॅटच्या बाहेर जाऊन व्हॉइस मेसेज ऐका जेणेकरून तुम्हाला त्याचवेळी इतर कामेदेखील करता येतील किंवा इतर मेसेजेसना प्रतिसाद देता येईल.
  • रेकॉर्डिंग पॉज/पुन्हा सुरू करा: व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना व्यत्यय आल्यास किंवा तुम्हाला अधिक विचार करण्यासाठी वेळ हवा असल्यास तुम्ही आता रेकॉर्डिंग पॉज करू शकता आणि हवे तेव्हा ते पुन्हा सुरू करू शकता.
  • वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन: हे व्हॉइस मेसेजमधील रेकॉर्डिंगला फॉलो करता यावे यासाठी तुम्हाला त्यातील आवाजाचे एक व्हिज्युअल प्रतिरुपण दर्शवते.
  • ड्राफ्टचे पूर्वविलोकन: तुमचे व्हॉइस मेसेजेस पाठवण्याआधी ते ऐकणे.
  • लक्षात ठेवता येणारे प्लेबॅक: एखादा व्हॉइस मेसेज ऐकताना तुम्ही तो पॉज केल्यास, चॅट पुन्हा उघडल्यानंतर, तुम्ही जिथे थांबलात तिथून तो पुन्हा ऐकता येणे.
  • फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसचा जलद प्लेबॅक: नियमित तसेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस जलदपणे ऐकण्यासाठी 1.5x किंवा 2x गतीने प्ले करणे.

व्हॉइस मेसेजेसमुळे अर्थपूर्ण संवाद साधणे लोकांसाठी आता जलद आणि सोपे झाले आहे. मजकुरापेक्षा आवाजाद्वारे भावना आणि उत्साह व्यक्त करणे अधिक नैसर्गिक आहे, आणि अनेक परिस्थितींमध्ये WhatsApp वर संभाषण करताना व्हॉइस मेसेजेसना अधिक पसंती दिली जात आहे. हे सर्वांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे आहे - टाइपिंग न करू इच्छिणारे तुमचे कुटुंबीय, किस्से सांगण्याची आवड असलेले तुमचे मित्र, प्रोत्साहनाची गरज असलेले तुमचे समवयस्क, किंवा जेव्हा एका धकाधकीच्या दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आवाज ऐकावासा वाटतो.

येत्या काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार्‍या या फीचर्सचा वापर वापरकर्त्यांनी करून पाहावा याकडे आम्ही उत्सुकतेने पहात आहोत.

मार्च ३०, २०२२

ट्विट कराशेअर करा
पुढील पेज
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचरब्‍लॉगस्टोरीजबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?आम्हाला संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरस
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती