
आम्हाला लोकांकडून कळले, की त्यांना WhatsApp वर नसलेल्या मित्रांना आमंत्रित करण्यासह इव्हेंट् तयार करण्यासाठी आणि समन्वयित करण्यासाठी एकमेव ठिकाण हवे आहे. तुमचे पुढील मीटअप आणखी सहजपणे प्लॅन करण्यात मदत करण्यासाठी आम्ही अपडेट रोल आउट करत आहोत.

व्यस्त ग्रुप चॅटचा अर्थ आहे, की प्लॅन्स बनवले जात आहेत, बातम्या शेअर केल्या जात आहेत आणि विनोद सुरू आहेत. पण त्याचा अर्थ असादेखील होऊ शकतो, की तुम्ही व्यस्त असताना पाहण्यासाठी भरपूर मेसेजेस आले आहेत.

आम्ही WhatsApp कॉलिंग पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित करत आहोत. अतिथी कॉलिंगसह, तुम्ही एखाद्या व्यक्तीचे WhatsApp खाते नसले, तरीही WhatsApp कॉलमध्ये सामील होण्यासाठी त्यांना आमंत्रित करू शकता.

WhatsApp वर, तुमची संभाषणे फक्त तुमची आणि तुम्ही ज्या लोकांशी बोलत आहात त्यांची असतात. म्हणूनच आम्ही डीफॉल्टनुसार एंड-टू-एंड एन्क्रिप्शन तयार केले आहे आणि म्हणूनच आम्ही तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या हातांमध्ये ठेवण्यासाठी नवीन मार्ग जोडणे सुरू ठेवत आहोत. आम्ही काम करत आहोत त्यांपैकी काही येथे आहेत.

तुमच्या जिवलग व्यक्तींच्या संपर्कात राहण्यापासून ते तुमच्या फॅन्टसी लीगशी को-ओर्डीनेट करण्यापर्यंत – ग्रुप चॅट हे WhatsApp वर उत्तम असतात. आज आम्ही त्यांना आणखी चांगले बनवत आहोत, जेणेकरून जलद निर्णय घेण्यासाठी नवीन मतचाचण्या अपडेट, सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी @all उल्लेख आणि विद्यमान ग्रुपमधून नवीन ग्रुप चॅट तयार करण्याचा सोपा मार्ग उपलब्ध होईल.

तुम्ही तुमच्या फोनवर असाल, तुमच्या डेस्कवर असाल किंवा दोन्हींदरम्यान स्विच करत असाल, WhatsApp वर कॉल करणे खाजगीरीत्या आणि सहजपणे काम करते. आज, तुम्ही कुठेही असा किंवा कोणतेही डिव्हाइस वापरत असा, ते अधिक सोपे करण्यासाठी आम्ही नवीन फीचर घेऊन आलो आहोत.

तुमची सर्वात महत्त्वाची संभाषणे आता केवळ तुमच्या फोनवरच नसतात. तुम्ही तुमच्या iPad वर सोफ्यावर बसून मित्रांबरोबर बोलता, घरी परतताना कुटुंबियांची विचारपूस करता आणि तुमचे काम व दिवस व्यवस्थापित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ॲपदरम्यान स्विच करता.

तुमच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येते, जसे की वर्गमित्र, शेजारी किंवा तुम्ही इव्हेंटमध्ये झालेली ओळख, तेव्हा फोन नंबर शेअर करणे मोठे पाऊल असू शकते. कारण फोन नंबर वैयक्तिक असतो आणि तो तुमच्या जीवनातील अनेक भागांशी संबंधित असतो. कधीकधी तुम्हाला तुमचा नंबर न देता फक्त चॅट करायचे असते.

फुटबॉलइतके लोकांना एकत्र आणणारे दुसरे काहीच नाही: शेवटच्या क्षणी झालेले गोल, अविश्वसनीय बचाव, आणि तुम्हाला उडी मारायला आणि ओरडायला लावणारे क्षण.

AI सोबत चॅट करणे हा, लोक माहिती कशी मिळवतात आणि महत्त्वाचे प्रश्न कसे विचारतात, याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग वेगाने बनला आहे. आणि यातील अनेक प्रश्न अतिशय संवेदनशील असू शकतात किंवा अशा परिस्थितींचा समावेश असू शकतो ज्यात लोक त्यांच्या प्रश्नांसोबत खाजगी आर्थिक, वैयक्तिक, आरोग्य किंवा कामाचा डेटा समाविष्ट करतात.