WhatsApp सुरु होऊन आता १० वर्षे झाली आहेत! गेल्या दशकामध्ये जगभरातील अनेक लोकांकडून आम्ही ऐकले आहे की ते त्यांच्या जवळच्या लोकांशी संपर्कात राहण्यासाठी, समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी, आणि व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी WhatsApp वापरतात. अशा कहाण्यांमुळे आम्हाला अजूनच स्फूर्ती मिळते आणि हा महत्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षातील मौल्यवान क्षणांकडे दृष्टिक्षेप टाकत आहोत.
आम्ही यापुढे देखील याच उत्साहाने WhatsApp साठी अधिकाधिक सोपे आणि प्रत्येकाला विश्वासार्ह असतील असे फिचर्स तयार करणे असेच सुरु ठेऊ. या प्रवासामध्ये आमची कायम साथ दिल्याबद्दल आम्ही जगभरातील सर्व वापरकर्त्यांचे आभार मानतो!
WhatsApp मध्ये, खाजगी मेसेजिंगबद्दल आम्ही नेहमीच जागरूक असतो आणि म्हणूनच आज आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की हे शक्य होण्यासाठी आम्ही iPhone वरील WhatsApp मध्ये 'टच आय डी' आणि 'फेस आय डी' अर्थात 'स्पर्श ओळख' आणि 'चेहरा ओळख' घेऊन येत आहोत.
यामुळे इतर कोणी तुमचा फोन घेऊन तुमचे संदेश वाचणे शक्य होणार नाही.
WhatsApp चे हे फिचर iPhone वर सुरु करण्यासाठी सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > स्क्रीन लॉक येथे टॅप करा आणि 'टच आय डी' किंवा 'फेस आय डी' सुरु करा. तुम्हाला बंद केल्यानंतर किती कालावधीनंतर तुम्हाला 'टच आय डी' आणि 'फेस आय डी' साठी विचारण्यात यावे हे तुम्ही निवडू शकता.
हे फिचर iPhone 5s अधिक किंवा iOS 9 किंवा अधिक आवृत्तींवर उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये आम्ही WhatsApp Business हे अॅप आणले आणि आता पाच दशलक्ष होऊन अधिक व्यावसायिक त्यांच्या ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी, त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तसेच समाजसेवेसाठी संपूर्ण जगभरात याचा वापर करतात. आम्हाला आनंद आहे की आम्ही लाखो व्यवसायांना वृद्धिंगत होण्यात मदत केली आहे. उदाहरणार्थ, भारतामध्ये बेंगलोर स्थित Glassic नामक आय वेअर ब्रँड ने आम्हाला असे सांगितले की त्यांच्या नवीन विक्री मध्ये जी वाढ झाली आहे त्यामध्ये ३० टक्के वाढ ही WhatsApp Business मुळे झाली आहे.
WhatsApp Business चा प्रथम वर्धापन दिन साजरा करत असताना आम्ही हे घोषित करत आहोत की WhatsApp वेब आणि डेस्कटॉप वर प्रचलित असणारे आता काही फीचर्स येत आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल :
कॉम्प्युटरवर हे फीचर्स आल्याने व्यावसायिकांचा वेळ वाचतो आणि त्यांना त्यांच्या ग्राहकांशी त्वरित संपर्क साधता येतो. WhatsApp Business वृद्धिंगत करण्यात आणि त्यामध्ये नवनवीन फीचर्स आणत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे यामुळे ग्राहकांना ज्या व्यवसायांमध्ये स्वारस्य आहे ते शोधणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे अधिकाधिक सोपे होईल.
इमोजी असो की कॅमेरा, स्टेटस असो किंवा ऍनिमेटेड GIFs असोत, आम्ही नेहमीच मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहणे सोपे आणि मजेशीर होण्यासाठी WhatsApp मध्ये नवनवीन वैशिष्ट्ये आणत असतो. आज आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की लोंकाना त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात यासाठी स्टिकर्स हे अजून एक वैशिष्ट्य आणत आहोत.
स्मितहास्य करणारा चहाचा कप असो किंवा मोडलेले हृदय असो, स्टिकर्स अशा भावना व्यक्त करू शकतात ज्या कधीकधी शब्दात उतरवणे शक्य नसते. त्याची सुरुवात म्हणून आम्ही स्टिकर्स पॅक उपलब्ध करून देत आहोत जे WhatsApp येथील डिझायनर्स ने तयार केलेले आहेत आणि इतर कलाकारांनी केलेले स्टिकर्स सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत.
WhatsApp वर स्टिकर्स निर्माण करण्यासाठी जगभरातील इतर डिझाईनर्स आणि डेव्हलपर्स ने तयार केलेल्या स्टिकर्स पॅक ला देखील आणि सपोर्ट करीत आहोत. ते करण्यासाठी आम्ही API आणि इंटेरफेसेस सेट सामाविष्ट केलेले आहेत ज्यामुळे Android किंवा iOS वरील WhatsApp वर स्टिकर्स निर्माण करणे शक्य होईल. तुम्ही इतर कोणत्याही ॲप प्रमाणे Google Play Store किंवा Apple App Store वर हे स्टिकर्स पब्लिश करू शकता, आणि ज्या वापरकर्त्यानी ते स्टिकर्स डाऊनलोड केलेले आहेत त्यांना ते WhatsApp मधून वापरणे लगेच सुरु करता येईल. WhatsApp साठी स्वतःचे स्टिकर्स तयार करण्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास येथे वाचा.
चॅट मध्ये स्टिकर्स वापरण्यासाठी, नवीन स्टिकर बटणावर टॅप करा आणि जे स्टिकर तुम्हाला पाठवायचे आहे ते निवडा. अधिक चिन्ह वापरून तुम्ही अजून स्टिकर्स पॅक समाविष्ट करू शकता.
पुढील काही आठवड्यांमध्ये Android आणि iPhone वर स्टिकर्स उपलब्ध होतील. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ते वापरताना मजा येईल!
आता प्रथमच JioPhone वर संपूर्ण भारतभर WhatsApp उपलब्ध होणार आहे. लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी संपर्कात राहण्यासाठी सोपा, विश्वासार्ह आणि सुरक्षित मार्ग प्राप्त होण्यासाठी WhatsApp ने JioPhone च्या KaiOS या ऑपरेटिंग सिस्टीम साठी या खाजगी मेसेजिंग ॲपची नवीन आवृत्ती निर्माण केली आहे.
या नवीन आवृत्तीमध्ये WhatsApp मधील उत्तम वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये जलद आणि वैश्वासार्ह मेसेजिंग आणि फोटो आणि व्हिडिओ पाठविणे याचा समावेश आहे - ते सुद्धा सर्व एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड स्वरूपात! व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करणे आणि पाठविणे हे तुम्ही कि पॅड वर एक-दोन वेळा टॅप करून अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता. सुरुवात करण्यासाठी JioPhone वापरकर्त्यांनी फक्त त्यांच्या फोन नंबरची WhatsApp वर पडताळणी करणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांना इतर WhatsApp वापरकर्त्यांबरोबर वैयक्तिक गप्पा किंवा गट गप्पा वापरून संभाषण करणे शक्य होईल.
आजपासून JioPhone ॲप स्टोअर मध्ये WhatsApp उपलब्ध होईल. ॲप स्टोअर वर किंवा डाउनलोड वर क्लिक करून लोकांना JioPhone आणि JioPhone 2 दोन्हीवर WhatsApp डाउनलोड करणे शक्य आहे.
As we announced last year, WhatsApp is building new tools to help people and businesses communicate with each other. Since we launched the WhatsApp Business app people have told us that it's quicker and easier to chat with a business than making a call or sending an e-mail. Today we are expanding our support for businesses that need more powerful tools to communicate with their customers.
Here's how people can connect with a business:
With this approach, you will continue to have full control over the messages you receive. Businesses will pay to send certain messages so they are selective and your chats don't get cluttered. In addition, messages will remain end-to-end encrypted and you can block any business with the tap of a button.
We will bring more businesses onto WhatsApp over a period of time. To do so, we will work directly with a few hundred businesses and a select number of companies that specialize in managing customer communications.
If you are interested in how a business can start using these new tools, you can learn more here. As always, we will be listening carefully to feedback as we go forward.
आम्ही WhatsApp ला खाजगी मेसेजिंग अॅप बनविले आहे - जो मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी संवाद साधण्याचा एक सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे आणि आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडत असताना देखील काळजीपूर्वक प्रयत्नात असतो की लोकांना आमच्याबद्दल वाटणारी जिवलगपणाची भावना जिवंत ठेवता येईल.
काही वर्षांपूर्वी आम्ही WhatsApp मध्ये एक वैशिष्ट्य जोडले जे तुम्हाला एकाचवेळी एकापेक्षा अधिक चॅटना संदेश फॉरवर्ड करू देते.
आज, आम्ही फॉरवर्ड करणे मर्यादित करण्याची चाचणी लाँच करत आहोत जी WhatsApp वापरणार्या प्रत्येकाला लागू होईल. भारतामध्ये - जेथे लोक जगभरातील कोणत्याही अन्य देशाच्या तुलनेत अधिक संदेश, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करतात - आम्ही एकाच वेळी ५ चॅट इतक्या कमी मर्यादेचीही चाचणी करू आणि आम्ही मीडिया संदेशांच्या बाजूचे त्वरित फॉरवर्ड बटण काढून टाकू.
आम्हाला विश्वास आहे की आपण सर्वांनी या बदलांचे मुल्यांकन करणे पुढे सुरू ठेवल्यास याचा WhatsApp ज्या उद्देशाने डिझाइन केले आहे तो उद्देश कायम ठेवण्यास मदत होईल : एक खाजगी मेसेजिंग अॅप.
आम्ही तुमच्या सुरक्षा आणि गोपनीयतेशी पूर्णपणे वचनबद्ध आहोत म्हणूनच WhatsApp एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केले आहे आणि आम्ही यासारख्या वैशिष्ट्यांसह आमच्या अॅपमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सुरक्षा टीपा पृष्ठाला भेट द्या.
अपडेट: सहा महिन्यांहून अधिक काळ WhatsApp ने या चाचणीचे मूल्यांकन केले आहे आणि ग्राहकांचा फीडबॅक काळजीपूर्वक ऐकला आहे. फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणल्याने संदेश फॉरवर्ड करण्यामध्ये संपूर्ण जगभरात लक्षणीय कपात झाली आहे. आजपासून, WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरणारे सर्व वापरकर्ते एकावेळी केवळ पाच जणांनाच संदेश फॉरवर्ड करू शकतात, यामुळे नजीकच्या लोकांशी खाजगी संदेशांमार्फत संपर्कात राहण्याचा WhatsApp चा उद्देश साध्य होईल. वापरकर्त्यांना येणाऱ्या अनुभवाचा फीडबॅक आम्ही ऐकत राहूच, शिवाय पुढील काळात व्हायरल मजकूर हाताळण्यासाठी नवीन उपाय शोधण्यासाठी कार्यरत राहू.
अखेरचा अपडेट: २१ जानेवारी, २०१९
Over the last couple years, people have enjoyed making voice and video calls on WhatsApp. In fact, our users spend over 2 billion minutes on calls per day. We're excited to announce that group calls for voice and video are coming to WhatsApp starting today.
You can make a group call with up to four people total - anytime and anywhere. Just start a one-on-one voice or video call and tap the new "add participant" button in the top right corner to add more contacts to the call.
Group calls are always end-to-end encrypted, and we've designed calling to work reliably around the world in different network conditions. The feature is currently rolling out on the iPhone and Android versions of our app.
Starting today, WhatsApp will indicate which messages you receive have been forwarded to you. This extra context will help make one-on-one and group chats easier to follow. It also helps you determine if your friend or relative wrote the message they sent or if it originally came from someone else. To see this new forwarded label, you need to have the latest supported version of WhatsApp on your phone.
WhatsApp cares deeply about your safety. We encourage you to think before sharing messages that were forwarded. As a reminder, you can report spam or block a contact in one tap and can always reach out to WhatsApp directly for help. For more information, please visit our WhatsApp Safety Tips page.
Over the last few months, we've added new features that improve the groups experience. Some of these include group descriptions, a catch up feature, and protection for people who are being added repeatedly to groups they've left.
Today, we're launching a new group setting where only admins are able to send messages to a group. One way people use groups is to receive important announcements and information, including parents and teachers at schools, community centers, and non-profit organizations. We've introduced this new setting so admins can have better tools for these use cases.
To enable this setting, open “Group Info,” tap Group Settings > Send Messages and select “Only Admins.” This setting is rolling out to all users around the world on the latest supported versions of the app.