WhatsApp मुख्य पेजWhatsApp मुख्य पेजब्‍लॉग
WhatsApp वेब
फीचर्स
डाउनलोड
सुरक्षा
मदत केंद्र

आपली भाषा निवडा

  • azərbaycan

  • Afrikaans

  • Bahasa Indonesia

  • Melayu

  • català

  • čeština

  • dansk

  • Deutsch

  • eesti

  • English

  • español

  • français

  • Gaeilge

  • hrvatski

  • italiano

  • Kiswahili

  • latviešu

  • lietuvių

  • magyar

  • Nederlands

  • norsk bokmål

  • o‘zbek

  • Filipino

  • polski

  • Português (Brasil)

  • Português (Portugal)

  • română

  • shqip

  • slovenčina

  • slovenščina

  • suomi

  • svenska

  • Tiếng Việt

  • Türkçe

  • Ελληνικά

  • български

  • қазақ тілі

  • македонски

  • русский

  • српски

  • українська

  • עברית

  • العربية

  • فارسی

  • اردو

  • বাংলা

  • हिन्दी

  • ગુજરાતી

  • ಕನ್ನಡ

  • मराठी

  • ਪੰਜਾਬੀ

  • தமிழ்

  • తెలుగు

  • മലയാളം

  • ไทย

  • 简体中文

  • 繁體中文(台灣)

  • 繁體中文(香港)

  • 日本語

  • 한국어

  • डाउनलोड

  • फीचर्स

  • सुरक्षा

  • मदत केंद्र

  • संपर्क साधा

WhatsApp ब्लॉग

सर्व स्वरुपातील बिझनेसेससाठी WhatsApp वर सुरुवात करणे झाले अधिक सोपे

जगभरातील लोक तसेच बिझनेसेस आता आपल्या कामांसाठी WhatsApp चा अवलंब करत आहेत. कौटुंबिक व्यवसाय असो किंवा एखादी फॉर्च्यून ५०० कंपनी, सर्व स्तरांवरील बिझनेसेस आज आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी WhatsApp चा वापर करतात.

WhatsApp ने जसे सातासमुद्रापलीकडील प्रियजनांना एकमेकांशी मुक्त संवाद साधणे शक्य करून दिले, तसेच बिझनेसेसशी संवाद साधताना येणारी‍ आव्हाने आम्हाला नाहीशी करायची आहेत. याचाच अर्थ फोनवर होल्डवर ठेवले जाणे, एखाद्या न चालणार्‍या वेबसाइटवर येऊन पोहोचणे, किंवा ईमेल पाठवून तो कधी वाचला जाईल का असा प्रश्न पडणे, या समस्या आता कधीच येणार नाहीत.

आजपर्यंत आम्ही कोट्यावधी बिझनेसेसना WhatsApp च्या मदतीने प्रगती करण्यास मदत केली आहे. आपल्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह मार्ग हवा असलेल्या सर्व बिझनेसेसना WhatsApp उपलब्ध करून देणे ही त्याची पुढची पायरी आहे.

नवीन क्लाउड-बेस्ड API सह सर्व बिझनेसेस आणि डेव्हलपर्सना WhatsApp उपलब्ध करून देणे

Meta ने पुरवलेल्या निःशुल्क आणि सुरक्षित क्लाउड होस्टिंग सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊन जगभरातील कोणत्याही स्वरुपाच्या बिझनेसेससाठी WhatsApp उपलब्ध करून देण्याकरिता आज आम्ही महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत. या नवीन API च्या साहाय्याने प्रारंभ करण्याचा कालावधी आम्ही काही महिन्यांवरून अगदी काही मिनिटांवर आणला आहे. यामुळे बिझनेसेस आणि डेव्हलपर्सना आमची सर्व्हिस चटकन आणि सुलभतेने ॲक्सेस करता येईल आणि थेट WhatsApp च्या सर्व्हिसवरती आपल्या ग्राहकांना सानुकूल अनुभव देऊ करणारी आणि अधिक जलद प्रतिसाद देता येणारी सेवा उभारणे शक्य होईल. या सर्व्हिसेसमुळे आमच्या भागीदारांचा महागड्या सर्व्हर्सवरचा खर्च कमी होईल आणि त्यांना ताबडतोब नवीन फीचर्स वापरता येतील. बिझनेसेस थेट साइन अप करू शकतील किंवा आमच्या एखाद्या बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडरसोबत काम करू शकतील.

वेगाने वाढणाऱ्या बिझनेसेससाठी WhatsApp बिझनेस ॲपमध्ये नवीन फीचर्स

गेल्या काही वर्षांत WhatsApp चा वापर करणारे लघु व्यवसाय कसे वाढतात हे आपण पाहिले आहे. अधिक टूल्स देऊन आम्ही त्यांना साहाय्य करू इच्छितो. आम्हाला असे वाटते की काही बिझनेसेसना क्लाउड-बेस्ड API वापरायला आवडेल तर बरेच जण WhatsApp Business ॲप वापरणे सुरू ठेवतील. या बिझनेसेसना त्यांची कामे काही थोडक्या लोकांपलीकडे नेऊन, त्यांचा ब्रॅंड ऑनलाइन स्वरूपात अधिक प्रभावी करण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही काही प्रगत फीचर्सवरदेखील काम करत आहोत - उदाहरणार्थ अधिकतम १० डिव्हाइसेसवरील चॅट्स एकावेळी व्यवस्थापित करता येणे, जेणेकरून बिझनेसेसना येणारे चॅट्स अधिक चांगल्या प्रकारे हाताळणे शक्य होईल. आपल्या ग्राहकांचे आपल्या ऑनलाइन उपस्थितीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही बिझनेसेसना नवीन सानुकूलित करता येणारे WhatsApp क्लिक-टू-चॅट लिंक्सदेखील पुरवू. हे सर्व अतिरिक्त आणि पर्यायी फीचर्स WhatsApp बिझनेस ॲपमधील एका नवीन प्रीमियम सर्व्हिसचा भाग म्हणून आम्ही सशुल्क उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही याची अधिक माहिती लवकरच शेअर करू.

बिझनेसेसना मदत करण्याचे हे नवीन पर्याय उपलब्ध असले तरीदेखील लोकांना बिझनेसेसशी बोलता येण्यामागची आमची मूल्ये बदललेली नाहीत. आपण कोणत्या बिझनेसेसशी बोलत आहोत याचे नियंत्रण लोकांकडेच असेल आणि त्यांनी संपर्क करण्याची विनंती केल्याशिवाय कोणतेही बिझनेसेस त्यांना मेसेज पाठवू शकणार नाहीत.

आम्हाला आशा आहे की लोकांना त्यांच्या आवडत्या बिझनेसेससोबत WhatsApp वर चॅट करण्याचा हा नवीन पर्याय आवडेल. तसेच नवीन बिझनेसेस कसे तयार होत आहेत आणि वाढत आहेत हे ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.

मे १९, २०२२

Tweetशेअर करा

प्रतिक्रिया, 2GB फाईल शेअरिंग, ५१२ ग्रुप्स

आम्ही मागच्या महिन्यात WhatsApp वरील कम्युनिटीजबाबतच्या आमच्या कल्पनेबद्दल घोषणा केली होती. आता आम्ही संस्था, बिझनेसेस आणि इतर सौहार्दपूर्ण संबंध असलेल्या ग्रुप्सना सुरक्षितरीत्या संभाषण करून WhatsApp वर आपली कामे करता यावीत यासाठी कम्युनिटीजची निर्मिती करत आहोत. आम्हाला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आहे आणि म्हणूनच नवनवीन फीचर्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

आम्हाला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की ॲपच्या नवीनतम आवृत्तीवर आता इमोजी प्रतिक्रिया उपलब्ध आहेत. प्रतिक्रिया गंमतीशीर आणि जलद असून त्यांच्यामुळे ग्रुप्सवरील अतिरिक्त भारदेखील कमी होतो. प्रतिक्रियांमध्ये अधिक सुधारणा आणण्यासाठी भविष्यात आम्ही अभिव्यक्तींचे अधिक विस्तृत पर्याय जोडू.

त्याचबरोबर, तुम्ही आता WhatsApp मध्ये 2GB पर्यंतच्या फाइल्स पाठवू शकता, ज्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असतील. ही मर्यादा पूर्वी असलेल्या 100MB या मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे लहान बिझनेसेस आणि शालेय ग्रुप्सना एकत्रित काम करणे सुकर होईल असे आम्हाला वाटते. मोठ्या फाइल्ससाठी तुम्ही वायफायचा वापर करावा असे आम्ही सुचवतो. तुम्ही फाइल अपलोड किंवा डाउनलोड करत असताना एक काउंटर दाखविला जाईल, ज्यामुळे तुमच्या ट्रान्सफरला किती वेळ लागेल हे तुम्हाला समजेल.

चॅटमध्ये अधिक लोकांना जोडता येण्याचा पर्याय असावा अशी विनंतीदेखील आमच्याकडे सतत आल्यामुळे आम्ही आता ग्रुपमध्ये ५१२ लोक जोडण्याची क्षमता हळूहळू उपलब्ध करून देणार आहोत. खाजगी आणि सुरक्षित कम्युनिटी तयार करण्यासाठी मेहनत लागते आणि आम्हाला मनापासून असे वाटते की या विविध सुधारणांच्या मदतीने लोकांना आणि ग्रुप्सना एकमेकांच्या संपर्कात राहता येईल.

आम्हाला आशा आहे की लोकांना हे नवीन अपडेट्स आवडतील. पुढील वर्षभरात असे अनेक बदल शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

मे ५, २०२२

Tweetशेअर करा

WhatsApp वरील कम्युनिटीजबाबतची आमची कल्पना तुमच्यासोबत शेअर करत आहोत

आज कम्युनिटीज ही नवीन फीचरबाबतची कल्पना WhatsApp वर जोडताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साल २००९ मध्ये WhatsApp लाँच झाल्यापासून, जेव्हा लोकांना एखाद्या व्यक्तीशी, मित्रांच्या ग्रुपशी किंवा कुटुंबाशी बोलायचे असेल, तेव्हा प्रत्यक्ष भेटीतील संभाषणानंतर दुसरे समाधानकारण संभाषण प्रदान करण्यात आम्ही कशी मदत करू शकू यावर लक्ष केंद्रित केले आहे. कम्युनिटीबरोबर संवाद आणि समन्वय साधण्यासाठी जे लोक WhatsApp वापरत आहेत त्यांची मतेदेखील आम्ही वारंवार जाणून घेत असतो.

शाळा, लोकल क्लब्ज आणि नफा हेतुहीन संस्था यांसारख्या संस्था आता सुरक्षितरित्या संवाद साधण्यासाठी आणि कामे करवून घेण्यासाठी WhatsApp वर अवलंबून राहतात - विशेषतः सार्वत्रिक साथीने जेव्हापासून आपल्या सर्वांना दूर असतानादेखील एकत्र काम करण्याचे अभिनव मार्ग शोधण्यास भाग पाडले, तेव्हापासून. आम्हाला ज्या विपुल प्रमाणात फीडबॅक मिळाला आहे त्यामुळे या कार्यव्यस्त संभाषणांचे व्यवस्थापन करणे लोकांसाठी अधिक सोपे व्हावे म्हणून आम्हाला बरेच काही करता येईल असे वाटते.

येथे कम्युनिटीज मोठी भूमिका बजावू शकतात. WhatsApp वरील कम्युनिटीज लोकांना त्यांच्यासाठी सुयोग्य अशा संरचनेत वेगवेगळे ग्रुप्स एका छताखाली एकत्र आणणे शक्य करतील. त्यामुळे लोकांना संपूर्ण कम्युनिटीला पाठविलेले अपडेट्स मिळवणे आणि छोट्या छोट्या ग्रुप्सना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चासत्र आयोजित करणे अधिक सोपे होऊ शकेल. कम्युनिटीजकडे ॲडमिनसाठी नवीन प्रभावी टूल्सदेखील असतील ज्यामध्ये प्रत्येकाला पाठविले जाणारे घोषणा मेसेजेस आणि कोणते ग्रुप्स समाविष्ट करायचे यावर नियंत्रण अशा गोष्टींचा समावेश असेल.

शाळेच्या मुख्याध्यापकांना कम्युनिटीजमुळे सर्व पालकांना एकत्र आणून, माहित असणे आवश्यक असे अपडेट्स शेअर करणे, तसेच विशिष्ट वर्ग, अभ्यासेतर उपक्रम किंवा स्वयंसेवकांची गरज यांसारखे ग्रुप्स स्थापन करणे अधिक सुलभ होईल.

WhatsApp वर ग्रुप्स ज्याप्रकारे कार्य करतात त्यामध्ये आम्ही अनेक सुधारणा करत आहोत - मग ते कम्युनिटीचा भाग असोत किंवा नसोत. यामुळे लोकांना गोष्टी शेअर करण्याचे नवीन मार्ग मिळण्यास मदत होईल आणि मोठ्या चॅट्सवरील अतिरिक्त भार कमी होईल असे आम्ही मानतो. कम्युनिटीज तयार होण्याआधीच लोकांना नवीन फीचर्स वापरून बघता यावेत म्हणून हे नवीन फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये सादर केले जातील.

  • प्रतिक्रिया - लोकांना चॅटमध्ये वारंवार नवीन मेसेजेस न टाकताही आपले मत त्वरित मांडता यावे म्हणून WhatsApp वर इमोजी प्रतिक्रिया सादर केल्या जात आहेत.
  • ॲडमिनद्वारे हटवणे - ग्रुप ॲडमिन्स सर्व सदस्यांच्या चॅटमधील चुकीचे किंवा आक्षेपार्ह मेसेजेस काढून टाकण्यास सक्षम असतील.
  • फाइल शेअरिंग – लोकांना प्रोजेक्टमध्ये सुलभतेने सहयोग करता यावा म्हणून २ गिगाबाइट्सपर्यंतच्या फाइल्सना सपोर्ट करण्यासाठी आम्ही फाइल शेअरिंग वाढवत आहोत.
  • अधिक मोठे व्हॉइस कॉल्स – चॅटिंग पेक्षा प्रत्यक्ष बोलणे चांगले वाटत असेल अशा लोकांना आता जास्तीत जास्त ३२ लोकांना व्हॉइस कॉल करणे आम्ही सादर करणार आहोत त्यात पूर्णपणे नवीन डिझाइनचा समावेश आहे आणि जे फक्त एका टॅपने करता येईल.

कम्युनिटीज स्वभावतःच खाजगी आहेत आणि म्हणूनच आम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने मेसेजेस सुरक्षित ठेवत राहू. हे सुरक्षा तंत्रज्ञान लोकांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एकजुटीचे संबंध असलेले ग्रुप्स - शाळा, धार्मिक मेळाव्याचे सदस्य किंवा अगदी बिझनेसेस - सर्वांनाच WhatsApp कडून प्रत्येक शब्दाचे मॉनिटरिंग न केले जाता, सुरक्षित आणि खाजगी संभाषणे करता येण्याची अपेक्षा आणि गरज आहे. कम्युनिटीजची गोपनीयता, सुरक्षितता आणि सुरक्षा आम्ही कशाप्रकारे हाताळणार आहोत याबद्दल here येथे अधिक जाणून घ्या.

इतर ॲप्स शेकडो आणि हजारो लोकांच्या चॅट्सची निर्मिती करत असताना, आम्ही जे ग्रुप्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत, त्या ग्रुप्सना सपोर्ट करण्यावर लक्ष केंद्रित करणे पसंत करत आहोत. WhatsApp वर कम्युनिटीज ही नवीन गोष्ट आहे आणि पुढील काही वर्षे त्यांना सपोर्ट करण्यासाठी नवनवीन फीचर्स सादर करण्यावर आमचे लक्ष सर्वाधिक केंद्रित झालेले असेल. कम्युनिटीज तुमच्या हातात देण्यास आणि तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

एप्रिल १४, २०२२

Tweetशेअर करा

आम्ही व्हॉइस मेसेजेस अधिक चांगले बनवत आहोत

आम्ही जेव्हा २०१३ मध्ये प्रथम व्हॉइस मेसेजेस लाँच केले, तेव्हा त्यामुळे लोकांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडू शकेल याची आम्हाला खात्री होती. डिझाईन साधे ठेवल्यामुळे, एखादा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून पाठवणे हे आम्ही मजकूर पाठवण्याइतकेच जलद आणि सोपे केले आहे. WhatsApp वर दररोज आमचे वापरकर्ते सरासरी ७०० कोटी व्हॉइस मेसेजेस पाठवतात, जे नेहमी खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात.

WhatsApp वरील व्हॉइस मेसेजचा अनुभव अधिक चांगला करणार्‍या नवीन फीचर्सची घोषणा करताना आम्हाला आज अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल:

  • चॅट बाहेरील प्लेबॅक: चॅटच्या बाहेर जाऊन व्हॉइस मेसेज ऐका जेणेकरून तुम्हाला त्याचवेळी इतर कामेदेखील करता येतील किंवा इतर मेसेजेसना प्रतिसाद देता येईल.
  • रेकॉर्डिंग पॉज/पुन्हा सुरू करा: व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करताना व्यत्यय आल्यास किंवा तुम्हाला अधिक विचार करण्यासाठी वेळ हवा असल्यास तुम्ही आता रेकॉर्डिंग पॉज करू शकता आणि हवे तेव्हा ते पुन्हा सुरू करू शकता.
  • वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन: हे व्हॉइस मेसेजमधील रेकॉर्डिंगला फॉलो करता यावे यासाठी तुम्हाला त्यातील आवाजाचे एक व्हिज्युअल प्रतिरुपण दर्शवते.
  • ड्राफ्टचे पूर्वविलोकन: तुमचे व्हॉइस मेसेजेस पाठवण्याआधी ते ऐकणे.
  • लक्षात ठेवता येणारे प्लेबॅक: एखादा व्हॉइस मेसेज ऐकताना तुम्ही तो पॉज केल्यास, चॅट पुन्हा उघडल्यानंतर, तुम्ही जिथे थांबलात तिथून तो पुन्हा ऐकता येणे.
  • फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसचा जलद प्लेबॅक: नियमित तसेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस जलदपणे ऐकण्यासाठी 1.5x किंवा 2x गतीने प्ले करणे.

व्हॉइस मेसेजेसमुळे अर्थपूर्ण संवाद साधणे लोकांसाठी आता जलद आणि सोपे झाले आहे. मजकुरापेक्षा आवाजाद्वारे भावना आणि उत्साह व्यक्त करणे अधिक नैसर्गिक आहे, आणि अनेक परिस्थितींमध्ये WhatsApp वर संभाषण करताना व्हॉइस मेसेजेसना अधिक पसंती दिली जात आहे. हे सर्वांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे आहे - टाइपिंग न करू इच्छिणारे तुमचे कुटुंबीय, किस्से सांगण्याची आवड असलेले तुमचे मित्र, प्रोत्साहनाची गरज असलेले तुमचे समवयस्क, किंवा जेव्हा एका धकाधकीच्या दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आवाज ऐकावासा वाटतो.

येत्या काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार्‍या या फीचर्सचा वापर वापरकर्त्यांनी करून पाहावा याकडे आम्ही उत्सुकतेने पहात आहोत.

मार्च ३०, २०२२

Tweetशेअर करा

डीफॉल्ट Disappearing Messages आणि एकापेक्षा अधिक कालावधी यांवर अधिक नियंत्रण आणि गोपनीयता

खाजगीपणा राखून जगाला जोडणे हे आमचे ध्येय आहे. आपली जास्तीत जास्त संभाषणे समोरा समोर होण्याऐवजी डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे, आम्हाला जाणीव आहे की काही गोष्टीत एक वेगळीच जादू असते, जसे की, एखाद्या व्यक्तीसह समोरा समोर बसून तुमचे विचार विश्वासाने सांगणे, तो क्षण अनुभवत असताना तुम्ही दोघे खाजगीपणे जोडले जात असल्याचे माहीत असणे. प्रामाणिक आणि हळवे होण्याचे स्वातंत्र्य असणे, संभाषण कुठेही, कधीही रेकॉर्ड आणि स्टोअर होत नसल्याचे माहीत असणे.

मेसेज किती वेळ राहावा हे ठरवणे तुमच्या हातात असणे. आपण जे काही टाइप करतो त्याची डिजिटल प्रत नकळत सोडण्याची आपल्याला सवयच झाली आहे. हे जणू आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा कायमस्वरूपी रेकॉर्ड ठेवता यावा म्हणून आपल्या अवती भवती घुटमळून नोंद ठेवणाऱ्या व्यक्ती सारखे झाले आहे. म्हणूनच आम्ही मागील वर्षी disappearing messages आणि अलीकडील फोटोज आणि व्हिडिओज एकदा पाहिल्यावर ते त्वरित नाहीसे होणारा एक मार्ग सादर केला आहे.

आमच्या वापरकर्त्यांना त्यांचे मेसेजेस आणि ते किती काळ राहतील हे नियंत्रित करण्याचे आणखी पर्याय देण्यासाठी आम्ही आज उत्सुक आहोत आणि ते पर्याय आहेत डीफॉल्ट disappearing messages आणि एकापेक्षा अधिक कालावधी.

WhatsApp वापरकर्त्यांकडे आता सर्व नवीन चॅट्ससाठी डीफॉल्टपणे disappearing messages चालू करण्याचा पर्याय असेल. पर्याय चालू केल्यावर, तुम्ही किंवा समोरील व्यक्ती एकमेकांसोबत जे काही चॅट्स सुरू कराल, ते तुम्ही निवडलेल्या कालावधीत नाहीसे होण्यासाठी सेट केले जातील. तसेच आम्ही ग्रुप चॅट तयार करताना नवीन पर्याय जोडला आहे, जो तुम्ही तयार कराल त्या ग्रुप्ससाठी चालू करू शकाल. हे नवीन फीचर पर्यायी आहे आणि यामुळे तुमचे अस्तित्त्वात असलेले कोणतेही चॅट्स बदलले किंवा हटवले जात नाहीत.

आम्ही disappearing messages साठी दोन नवीन कालावधी देखील जोडत आहोत : २४ तास आणि ९० दिवस तसेच सध्याचा ७ दिवसांचा पर्याय.

डीफॉल्ट disappearing messages चालू करणे निवडलेल्या लोकांसाठी, आम्ही तुमच्या चॅट्समध्ये एक मेसेज दाखवू ज्यामुळे लोकांना तुम्ही तो डीफॉल्ट निवडल्याचे कळेल. यावरून स्पष्ट होते की यात काहीच वैयक्तिक नाही - यापुढे WhatsApp वर प्रत्येकाशी कसा संवाद साधायचा ही तुमची निवड आहे. अर्थातच, तुम्हाला विशिष्ट संभाषण कायमस्वरूपी ठेवायचे असल्यास, चॅटवर परत स्विच करणे सोपे आहे.

एका वर्षाहून अधिक काळ कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहिल्याने एक गोष्ट अधिक स्पष्ट झाली आहे की आपल्याला समोरा समोर बोलता येत नसले तरीही, त्याचा अर्थ आपल्याला आपल्या वैयक्तिक संभाषणांच्या गोपनीयतेचा त्याग करावा लागेल असा होत नाही. आमचा विश्वास आहे की एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन सह disappearing messages हे असे दोन महत्त्वाचे फीचर्स आहेत, जे आजच्या काळात खाजगी मेसेजिंग सर्व्हिस म्हणजे काय हे निश्चित करतात आणि संभाषण करत असताना, ते समोरा समोर करत असल्याच्या भावनेच्या जवळ आणतात.

सुरुवात करण्यासाठी, तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज वर जा आणि 'डीफॉल्ट मेसेज टायमर' निवडा. तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

६ डिसेंबर २०२१

Tweetशेअर करा

WhatsApp वर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले बॅकअप्स

WhatsApp एका सरळसाध्या संकल्पनेवर आधारलेले आहे: तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबीयांसोबत जे काही शेअर करता, ते फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्यासोबत शेअर करता आहात ती व्यक्ती यांच्यातच राहते. पाच वर्षांपूर्वी, आम्ही डिफॉल्टपणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन समाविष्ट केले, जे आता एका दिवसात 2 अब्ज वापरकर्त्यांदरम्यान केले जाणारे 100 अब्ज मेसेजेस सुरक्षित करते.

तुम्ही पाठवत आणि प्राप्त करत असलेले एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले मेसेजेस तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केले जात असल्याने, अनेक लोकांना जर त्यांचा फोन हरवला, तर त्यांच्या चॅट्सचा बॅकअप घेण्याचा मार्ग देखील हवा आहे. आजपासून, Google ड्राइव्ह किंवा iCloud वर स्टोअर केलेले बॅकअप्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित करण्यासाठी आम्ही अतिरिक्त, पर्यायी सुरक्षा स्तर उपलब्ध करून देत आहोत. इतर कोणतीही ग्लोबल मेसेजिंग सर्व्हिस त्यांच्या वापरकर्त्यांच्या मेसेजेस, मीडिया, व्हॉइस मेसेजेस, व्हिडिओ कॉल आणि चॅट बॅकअप्ससाठी अशा प्रकारची सुरक्षा प्रदान करत नाही.

तुम्ही आता तुम्हाला हव्या असलेल्या पासवर्ड द्वारे किंवा फक्त तुम्हाला माहीत असलेल्या 64-अंकी एन्क्रिप्शन की द्वारे तुमचे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने संरक्षित केलेले बॅकअप सुरक्षित करू शकता. WhatsApp किंवा बॅकअप सर्व्हिस पुरवठादार दोन्हींपैकी कोणीही तुमचे बॅकअप्स वाचू शकणार नाही किंवा ते अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेली की ॲक्सेस करू शकणार नाही.

आमच्या 2 अब्जपेक्षा जास्त वापरकर्ते, लोकांना त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आणखी मार्ग उपलब्ध करून देण्यास आम्ही उत्सुक आहोत. WhatsApp च्या नवीनतम आवृत्तीसह आम्ही हळूहळू हे फीचर सादर करत आहोत. तुम्ही iOS आणि Android वर एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह तुमचे चॅट बॅकअप्स कसे सुरक्षित करू शकता याविषयीच्या अधिक माहितीसाठी येथे जा आणि आम्ही ते कसे तयार केले आहे याविषयीच्या अधिक माहितीसाठी येथे जा.

Tweetशेअर करा

तुमचे चॅट्स तुमच्यासोबत न्या

तुमचे WhatsApp मेसेजेस हे फक्त तुमचे असतात. म्हणूनच तुमचे वैयक्तिक WhatsApp मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात आणि आम्ही त्यांना तुमच्या चॅट्समधून आपोआप नाहीसे करण्याचे मार्गही प्रदान करतो.

अजून एका फीचरची मागणी आमच्याकडे सतत करण्यात आली, ती म्हणजे फोन बदलल्यावर आपले पूर्वीचे चॅट एका ऑपरेटिंग सिस्टमवरून दुसऱ्यावर ट्रान्सफर करता येणे. आम्ही हे सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने शक्य करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि डिव्हाइस निर्मात्यांसोबत अथक प्रयत्न करत आहोत.

तुमचे WhatsApp वरील पूर्वीचे चॅट iOS वरून Android वर हलवता येणे उपलब्ध करून देण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. असे करताना तुमचे मेसेजेस WhatsApp ला पाठवले जात नाहीत आणि यामध्ये व्हॉइस मेसेजेस, फोटोज आणि व्हिडिओज या सर्वांचा समावेश आहे. सध्या हे वैशिष्ट्य Android १० किंवा त्याहून वर चालणाऱ्या कोणत्याही Samsung डिव्हाइसवर उपलब्ध आहे, आणि लवकरच इतर Android डिव्हाइसेसवर देखील उपलब्ध होईल.

जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइस सेट अप कराल तेव्हा तुम्हाला तुमचे WhatsApp वरील पूर्वीचे चॅट तुमच्या जुन्या डिव्हाइसवरून नवीन डिव्हाइसवर सुरक्षितरीत्या ट्रान्सफर करण्याचा पर्याय मिळेल. या प्रक्रियेसाठी USB-C टू Lightning केबलची गरज असेल. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

ही केवळ एक सुरुवात आहे. आम्ही अधिक लोकांना त्यांच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर स्विच करून आपले चॅट्स सुरक्षितपणे सोबत नेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत.

सप्टेंबर २, २०२१

Tweetशेअर करा

WhatsApp वर फोटोज आणि व्हिडिओज एकदाच पहा

आपल्या फोनवर फोटोज किंवा व्हिडिओज घेणे हे आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग बनले आहे, पण आपण सामायिक केलेल्या सर्वच गोष्टी कायम स्वरूपी डिजिटल रेकॉर्ड बनून राहिल्या पाहिजेत असं नाही. काही फोन्सच्या बाबतीत, साधा फोटो घेण्याचा अर्थसुद्धा कॅमेरा रोलवर कायमची स्पेस घेणे असा होतो.

म्हणूनच आम्ही उघडल्यानंतर चॅट मधून नाहीसे होतील असे 'एकदाच पहा फोटोज आणि व्हिडिओज' हे फीचर आज उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयतेवर अधिक नियंत्रण मिळेल.

उदाहरणार्थ, तुम्ही विकत घेण्यापूर्वी दुकानात घालून बघितलेल्या कपड्यातील फोटो किंवा क्षणभरात दिलेली त्वरित प्रतिक्रिया अथवा वाय-फाय पासवर्डसारखी संवेदनशील माहिती एकदाच पाहण्यासाठी पाठवली असेल.

WhatsApp वर पाठवलेल्या सर्वच वैयक्तिक मेसेजेसप्रमाणे, एकदाच पहा मीडिया एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेला आहे म्हणून WhatsApp तो पाहू शकत नाही. हे नवीन "एक-वेळ" आयकॉनने स्पष्टपणे चिन्हांकित केलेले असतील.

मीडिया बघितला गेल्यानंतर, चॅटमध्ये त्यावेळी काय होत होते याबाबत कोणताही संभ्रम टाळण्यासाठी, मेसेज "उघडला" असा दिसू लागेल.

या आठवड्याच्या सुरुवातीला आम्ही हे फीचर सर्वांना उपलब्ध करून देत आहोत आणि वैयक्तिक आणि नाहीसा होणारा मीडिया पाठविण्याच्या या नवीन मार्गाबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घेण्यास उत्सुक आहोत.

हे कसे वापरून पाहायचे याविषयी अधिक माहिती इथे मिळवा.

ऑगस्ट ३, २०२१

Tweetशेअर करा

आता कधीही ग्रुप कॉल मिस करू नका

आपल्यापैकी अनेकजण सध्या एकमेकांपासून दूर असताना ग्रुप कॉलवर मित्र आणि कुटुंबासोबत एकत्र येण्यासारखे दुसरे काहीच चांगले नाही, आणि असा एखादा खास क्षण मिस होणे यापेक्षा वाईट काही नाही.

ग्रुप कॉल अधिकाधिक लोकप्रिय होत असताना, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा आणि गोपनीयता कायम राखून आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी हा अनुभव सुधारण्यावर काम करत आहोत.

आज आम्ही घेऊन आलो आहोत ग्रुप कॉल सुरू झाल्यावर देखील त्यात सामील होण्याची क्षमता. हे फीचर ग्रुप कॉल सुरु झाल्यानंतर त्यात सामील होण्याचे काम कमी करून WhatsApp वरील ग्रुप कॉलिंगला प्रत्यक्षात भेटण्यासारखे उत्स्फूर्त आणि सोपे बनवते.

काही सर्वोत्तम संवाद अनपेक्षितपणेच घडतात. आता, जर तुमच्या ग्रुपमधल्या एखाद्या व्यक्तीकडून फोन वाजल्यानंतर कॉल मिस झाला तर ते नंतर त्यांना हवे तेव्हा त्या कॉलमध्ये सामील होऊ शकतात. तुम्ही कॉल सुरू असेपर्यंत त्यातून बाहेर पडू शकता आणि पुन्हा सामील ही होऊ शकता.

आम्ही एक कॉल माहिती स्क्रीन देखील तयार केला आहे जेणेकरून कॉलमध्ये कोण सामील झाले आहे, तसेच कोणाला आमंत्रण दिले गेले आहे पण अजून सामील झालेले नाहीत, हे तुम्हाला पाहता येईल. आणि जर तुम्ही 'दुर्लक्ष करा' निवडले तर नंतर WhatsApp मधील कॉल्स टॅबमधून तुम्ही सामील होऊ शकता.

हे फीचर आजपासून उपलब्ध होणार असून लोक या नवीन अनुभवाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील अशी आम्ही आशा करतो.

हे कसे वापरून पाहायचे याविषयी इथे अधिक माहिती मिळवा.

जुलै १९, २०२१

Tweetशेअर करा

CDC Spanish Language Vaccine Finder on WhatsApp

We’re honored by the opportunity to support the U.S. government’s sprint to get more Americans vaccinated for COVID-19 before the July 4 holiday, or as soon as they are able to do so.

People of all backgrounds rely on WhatsApp, though we know WhatsApp plays a particularly strong role with Spanish speaking communities in the United States. This new Spanish-language vaccine finder the CDC developed makes it easy to find a location to get the shot, order a free ride to get there, and get information.

It’s amazing what can be done with just a simple text messaging service. Throughout the last year we’ve worked with over 150 governments and health organizations, like WHO and now the CDC, to help counter misinformation, provide updates, and get people vaccinated to end this pandemic. Please help us spread the word to someone you know by tapping https://wa.me/18336361122?text=hola.


Localizador de vacunas de los CDC en WhatsApp disponible en español

Es un honor para nosotros tener la oportunidad de apoyar al gobierno de Estados Unidos en su carrera por lograr que una mayor parte de la ciudadanía se vacune contra el COVID-19 antes de la celebración del 4 de julio, o tan pronto como les sea posible.

Si bien personas de todos los orígenes confían en WhatsApp, sabemos que esta aplicación juega un papel particularmente importante en la comunidad hispanohablante de Estados Unidos. Con el nuevo localizador de vacunas que desarrollaron los Centros para el Control y la Prevención de Enfermedades (CDC, por sus siglas en inglés) y que está disponible en español, será más fácil buscar un lugar donde vacunarse, solicitar un traslado gratuito al centro de vacunación y recibir información.

Es increíble lo que se puede lograr con un simple servicio de mensajería de texto. Durante el último año, trabajamos con más de 150 gobiernos y organizaciones de salud, como la Organización Mundial de la Salud (OMS) y ahora los CDC, para ayudar a contrarrestar la desinformación, ofrecer actualizaciones y lograr que las personas se vacunen para terminar con esta pandemia. Por favor, visita el siguiente enlace y ayúdanos a difundir el mensaje entre tus contactos: https://wa.me/18336361122?text=hola.

June 21, 2021

Tweetशेअर करा
पुढील पृष्ठ

WhatsApp

फीचर्स

सुरक्षा

डाउनलोड

WhatsApp वेब

बिझनेस

गोपनीयता

कंपनी

आमच्याबद्दल

करियर्स

ब्रँड केंद्र

संपर्क साधा

ब्लॉग

WhatsApp अनुभव

डाउनलोड

Mac/PC

Android

iPhone

मदत

मदत केंद्र

Twitter

Facebook

कोरोना व्हायरस

2022 © WhatsApp LLC

गोपनीयता आणि अटी