७ एप्रिल २०२०
COVID-19 मुळे कोट्यवधी माणसं त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना प्रत्यक्षात भेटू शकत नसल्यामुळे, आता एकमेकांशी संवाद साधण्यासाठी लोक WhatsApp वर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवत आहेत. या संंकट प्रसंगी लोक WhatsApp द्वारे डॉक्टर्स, शिक्षण आणि विलगीकरण केलेल्या प्रियजनांशी बोलत आहेत. म्हणूनच सर्वाधिक वैयक्तिक संवाद साधण्यासाठी तुम्हाला एक सुरक्षित ठिकाण देण्याकरिता WhatsApp वरील तुमचे सर्व मेसेजेस आणि कॉल्स डिफॉल्टपणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केले आहेत.
मागील वर्षी आम्ही वापरकर्त्यांसाठी "अनेक वेळा फॉरवर्ड केलेले मेसेजेस" ओळखण्याची संकल्पना आणली. हे मेसेजेस तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने स्वतः तयार केलेले नसून ते त्यांना दुसऱ्याच कोणी पाठविलेले आहेत हे स्पष्ट दाखवण्यासाठी त्यावर दोन बाणांनी
खाजगी मेसेजिंग सेवा म्हणून, संवाद व्यक्तिगत ठेवण्यात मदत करण्यासाठी आम्ही मागील काही वर्षांमध्ये अनेक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ, व्हायरल मेसेजेस कमी वेगाने प्रसारित व्हावेत यासाठी यापूर्वी आम्ही फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या मेसेजेसवर मर्यादा आणली. तेव्हा त्या वेळी जागतिकरित्या मेसेज फॉरवर्ड केले जाण्यात २५% घट आम्हाला दिसली.
फॉरवर्ड करणे ही वाईट गोष्ट आहे का? नक्कीच नाही. आम्हाला माहीत आहे की, अनेक वापरकर्ते उपयुक्त माहिती, तसेच मजेशीर व्हिडिओ, मेम्स, त्यांना अर्थपूर्ण वाटणारे विचार किंवा प्रार्थना फॉरवर्ड करतात. अलीकडील आठवड्यांमध्ये, अग्रभागी काम करणाऱ्या आरोग्य दक्षता कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याकरिता ते कशी सेवा देतात याचे प्रत्यक्ष क्षण दाखवण्यासाठी देखील लोक WhatsApp वापरत आहेत. पण आजकाल आम्हाला मेसेजेस फॉरवर्ड केल्या जाण्याच्या प्रमाणात भरपूर वाढ झाल्याचे दिसत आहे, ज्याविषयी वापरकर्त्यांनी आम्हाला सांगितले आहे की असे मेसेज वाचून लोक भारावून जाऊ शकतात आणि ज्यामुळे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. वैयक्तिक संवाद साधण्याचे एक ठिकाण म्हणून WhatsApp ला टिकवून ठेवण्यासाठी या मेसेजेसचे प्रसारण कमी करणे महत्त्वाचे असल्याचे आम्हाला वाटते.
या बदलाव्यतिरिक्त, लोकांना अचूक माहिती मिळवण्यात मदत करण्यासाठी आम्ही थेट सरकार आणि एनजीओंसह काम करत आहोत ज्यामध्ये "WHO-जागतिक आरोग्य संस्था" आणि २० पेक्षा जास्त राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयांचा समावेश आहे. विश्वासू अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, ज्या लोकांनी माहितीसाठी विचारणा केली होती अशा लाखो लोकांना परस्पर थेट मेसेजेस पाठवले आहेत. तुम्ही या प्रयत्नांबद्दलची अधिक माहिती तसेच संभाव्य काल्पनिक कथा, फसवणूक करणारे मेसेजेस आणि अफवा हे "तथ्य तपासणी संस्थांना" कशी पाठवायची हे आमच्या "कोरोना व्हायरस माहिती हबवर" जाणून घेऊ शकता.
खाजगीरीत्या कनेक्ट होण्याची गरज लोकांना आता पूर्वीपेक्षाही अधिक वाटते, असे आम्हाला वाटते. या अभूतपूर्व जागतिक संकटाच्या वेळी WhatsApp ला विश्वासाने कार्यरत ठेवण्यासाठी आमच्या टीम्स कठोर प्रयत्न करत आहेत. नेहमीप्रमाणे तुमचा फीडबॅक स्वागतार्हच असेल आणि लोकांना WhatsApp वर एकमेकांशी माहिती शेअर करणे सुलभ व्हावे यासाठीचे नवनवीन मार्ग शोधण्यात आम्ही सदैव कार्यरत राहू.