३ मार्च २०२०
डार्क मोड - या फिचरसाठी अनेक वापरकर्त्यांनी सर्वाधिक मागणी केली होती आणि ते फिचर WhatsApp वर आता येत आहे हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
डार्क मोड मुळे नेहमीच्या अंगवळणी पडलेल्या WhatsApp वापरास एक फ्रेश लुक मिळाला आहे. कमी प्रकाश असणाऱ्या ठिकाणी डोळ्यावर कमी ताण पडावा यादृष्टीने याची निर्मिती केली आहे. आणि अंधाऱ्या खोलीत तुमच्या फोनचा प्रखर लाईट चालू झाल्याने जी पंचाईत होते ती आता टळू शकेल असे आम्हाला वाटते.
डार्क मोडची निर्मिती करत असताना आम्ही संशोधन आणि प्रयोगांसाठी जो वेळ दिला त्यामध्ये प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर भर दिला होता :
वाचन सुसह्य करणे : रंग निवडत असताना आम्हाला डोळ्यांवरचा ताण कमी करायचा होता म्हणून आम्ही असे रंग निवडले जे iPhone आणि Android च्या सिस्टम डिफॉल्ट रंगांशी मिळतेजुळते असतील.
माहितीची संरचना : प्रत्येक स्क्रीनवर वापरकर्त्यांना लक्ष केंद्रित करणे सोपे जावे यासाठी मदत होईल. हे करण्यासाठी आम्ही असे रंग आणि डिझाईन वापरले आहे ज्यामुळे महत्त्वाची माहिती जास्त उठून दिसेल.
Android 10 आणि iOS 13 च्या सिस्टम सेटिंगमध्ये जर तुम्ही डार्क मोड सक्षम केला असेल तर WhatsApp मध्ये तो आपोआप सुरु होईल. Android 9 होऊन जुन्या आवृत्तींसाठी तुम्ही WhatsApp सेटिंग्ज > चॅट > थीम > ‘डार्क’ निवडून तुम्ही तो सुरु करू शकता.
WhatsApp च्या नवीन आवृत्तीवर डार्क मोड उपलब्ध होणार आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे फिचर नक्कीच आवडेल.