३१ ऑक्टोबर, २०१७
आजपासून आता तुम्ही चुकून पाठवलेले मेसेजेस हटवू शकता — एखादी व्यक्ती असो किंवा संपूर्ण ग्रुपवरून असो. हे अशाप्रकारे कार्य करते: मेसेजवर टॅप करा आणि होल्ड करा, "हटवा" निवडा, आणि त्यानंतर 'प्रत्येकजणासाठी हटवा' निवडा. तुमच्याकडे मेसेज पाठवल्यानंतर तो हटवण्यासाठी सात मिनिटे आहेत.
हे फीचर जगभरातील वापरकर्त्यांसाठी iPhone, Android, Windows Phone तसेच डेस्कटॉपच्या नवीनतम आवृत्त्यांवर. रोल आऊट होत आहे. तुम्ही आणि मेसेज प्राप्तकर्ता दोघांनीही यशस्वीपणे मेसेज हटवण्यासाठी WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरणे आवश्यक आहे.
तुम्ही Android, iPhone, आणि Windows फोन साठी असलेल्या आमच्या मदतपुस्तिकेमध्ये अधित जाणून घेऊ शकता.