WhatsApp ब्लॉग
आपली भाषा निवडा
  • azərbaycan
  • Afrikaans
  • Bahasa Indonesia
  • Melayu
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • Filipino
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • العربية
  • فارسی
  • اردو
  • বাংলা
  • हिन्दी
  • ગુજરાતી
  • ಕನ್ನಡ
  • मराठी
  • ਪੰਜਾਬੀ
  • தமிழ்
  • తెలుగు
  • മലയാളം
  • ไทย
  • 简体中文
  • 繁體中文
  • 日本語
  • 한국어
  • WhatsApp वेब
  • फीचर्स
  • डाउनलोड
  • सुरक्षा
  • मदत केंद्र
  • डाउनलोड
  • फीचर्स
  • सुरक्षा
  • मदत केंद्र
  • संपर्क साधा

WhatsApp ब्लॉग

ॲनिमेटेड स्टिकर्स, क्यु आर कोड्स आणि इतर बरेच काही

जगभरात वापरल्या जाणाऱ्या WhatsApp ला अब्जावधी लोकांचे प्रेम लाभले आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा साधासोपा, विश्वसनीय व खाजगी प्लॅटफॉर्म देऊ करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. असे असले तरी, या ॲपची उपयुक्तता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करत राहणार आहोत.

या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणून आम्ही पुढील काही आठवड्यांमध्ये काही नवीन फीचर्स घेऊन येत आहोत:

  • ॲनिमेटेड स्टिकर्स: WhatsApp वर होणाऱ्या संभाषणांमध्ये स्टिकर्सचा वापर वेगाने वाढतो आहे. WhatsApp वर दररोज अब्जावधी स्टिकर्सची देवाणघेवाण होते. आम्ही येत्या काळात भावना नेमकेपणे व्यक्त करणारी आणखी मजेदार स्टिकर्स लॉंच करणार आहोत.
  • क्यु आर कोड्स: नवीन संपर्क समाविष्ट करणे आता आणखी सोपे! आता तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीचा संपर्क त्यांचा क्यु आर कोड स्कॅन करून जोडता येईल. आता संपर्क जोडण्यासाठी नंबर्स दाबत बसायला नको.
  • WhatsApp वेब आणि डेस्कटॉपसाठी डार्क मोड: सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली डार्क मोड थीम आता तुमच्या कॉंप्युटरवरही उपलब्ध होणार.
  • ग्रुप व्हिडिओ कॉल्समधील सुधारणा: व्हिडिओ कॉल्समध्ये आता ८ लोकांना समाविष्ट करता येते. अशा वेळी, तुम्हाला ज्या सहभागी व्यक्तीवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्या व्यक्तीच्या व्हिडिओवर प्रेस करून दाबून धरल्याने त्या व्यक्तीचा व्हिडिओ फुल स्क्रीनवर दिसायला लागतो. ८ किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असलेल्या ग्रुप चॅटमध्ये आता आम्ही व्हिडिओ आयकॉन समाविष्ट केला आहे. या आयकॉनच्या मदतीने तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकता.
  • 'स्टेटस' हे फीचर आता KaiOS मध्येही उपलब्ध होणार: २४ तासांनी नाहीसे होणारे 'स्टेटस अपडेट' हे सर्वात लोकप्रिय फीचर आता KaiOS वापरकर्त्यांनाही अनुभवायला मिळणार आहे.

वापरकर्त्यांना ही फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये WhatsApp च्या नवीन आवृत्तीमध्ये पाहायला मिळतील.

१ जुलै २०२०
Tweet
ब्राझिलमधील सामान्य लोक आणि लघुउद्योगांसाठी आता WhatApp चे 'पेमेंट्स' फीचर उपलब्ध होणार

आम्हाला हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, आजपासून आम्ही ब्राझिलमधील वापरकर्त्यांसाठी WhatsApp वरील डिजिटल पेमेंट्स चा पर्याय उपलब्ध करून देत आहोत. या फीचरच्या मदतीने आता लोकांना चॅटमधून बाहेर पडावे न लागता सुरक्षितरीत्या पैसे पाठवता येणार आहेत किंवा एखाद्या स्थानिक बिझनेसची उत्पादने किंवा सेवा खरेदी करता येणार आहेत.

ब्राझिलमध्ये कोट्यावधी लघुउद्योग आणि लघुतम उद्योग आहेत. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एखाद्या बिझनेसला झॅप करणे अर्थात ऑटोमेटेड उत्तरप्रणाली सेट करणे ही तिथली नित्याचीच बाब आहे. या फीचरमुळे आता लोकांना एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग बघता येणार आहेच, शिवाय एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी पेमेंटदेखील पाठवता येणार आहे. पेमेंट्स पाठवणे सोपे झाले तर, अधिकाधिक बिझनेस डिजिटल इकॉनॉमीचा पर्याय चोखाळण्याचा विचार करतील आणि त्यांना वाढीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.

याशिवाय पैसे पाठवणे मेसेज पाठवण्याइतके सोपे करून लोकांमधले शारीरिक अंतर दूर करणे हेदेखील आमचे उद्दीष्ट्य आहे. WhatsApp वरील पेमेंट्स Facebook Pay उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे या पेमेंट्ससाठी वापरत असलेली कार्ड माहिती तुम्हाला पुढे Facebook च्या इतर ॲप्ससाठी वापरता येईल अशीही सोय करण्याची आमची इच्छा आहे.

पेमेंट्स हे फीचर तयार करताना 'सुरक्षा' हा मुख्य मुद्दा विचारात घेण्यात आला असल्याने अवैध व्यवहार रोखण्यासाठी सहा अंकी खास पिन नंबर किंवा फिंगरप्रिंट आवश्यक असेल. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही Visa आणि Mastercard च्या नेटवर्कवर Banco do Brasil, Nubank आणि Sicredi च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सना सपोर्ट देऊ. यासाठी आम्ही Cielo या ब्राझिलमधील अग्रगण्य पेमेंट्स प्रोसेसर कंपनीसोबत मिळून काम करत आहोत. येत्या काळात अधिकाधिक भागीदार कंपन्यांना आमच्यासोबत काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमचे मॉडेल मुक्त स्वरूपाचे ठेवले आहे.

WhatsApp वरून पैसे पाठवणे किंवा काहीतरी खरेदी करणे हे पूर्णपणे मोफत असणार आहे. क्रेडिट कार्डावरून होणारी पेमेंट्स प्राप्त करताना बिझनेसना फी द्यावी लागते, त्या धर्तीवर या प्लॅटफॉर्मवरदेखील ग्राहकांकडून येणारी पेमेंट्स प्राप्त करण्यासाठी बिझनेसना प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे.

WhatsApp वरील पेमेंट्स हे फीचर ब्राझिलमधील लोकांना आजपासून उपलब्ध होणार आहे. हे फीचर कालांतराने जगभरातील सर्व लोकांना उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.

१५ जून, २०२०
Tweet
ग्रुप व्हिडिओ कॉल्स आणि ग्रुप व्हॉइस कॉल्समध्ये आता ८ व्यक्तींना समाविष्ट करता येईल

COVID-19 च्या साथीमध्ये अनेकजण आपापल्या घरांपासून, मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांपासून दूर अडकून पडले आहेत. त्यामुळे जगभरातील लोक आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल्सची जास्तीतजास्त मदत घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्रुप कॉलिंग अधिक उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आणि आमच्या वापरकर्त्यांनी एकाचवेळी जास्तीतजास्त लोकांशी कनेक्ट करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी आम्ही आजपासून WhatsApp व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉलमध्ये एकाचवेळी समाविष्ट होऊ शकणाऱ्या व्यक्तींची कमाल संख्या ४ वरून ८ केली आहे.

गेल्या एका महिन्यामध्ये जगभरातील लोक सरासरी तत्त्वावर प्रतिदिन १५ अब्ज मिनिटांहून अधिक वेळ WhatsApp कॉल्सवर घालवत आहेत असे दिसून आले आहे. हे प्रमाण साथीच्या पूर्वी होते त्याहून कितीतरी जास्त आहे. लिहून पाठवलेल्या मेसेजेसप्रमाणे या कॉल्सनाही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभले आहे. साध्या फोन्सपासून ते कमी क्षमतेचे नेटवर्क असणाऱ्या फोन्सवर जास्तीतजास्त लोकांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने आम्ही ग्रुप कॉलिंग तयार केले आहे.

लोकांना घरातल्या घरात राहून इतरांशी कनेक्ट करण्याचे अनेक मार्ग हवे असतात आणि याचसाठी Portal वरही WhatsApp उपलब्ध करून देण्यात आले आहे. क्वारंटाइनमध्ये असताना संपूर्ण लिव्हिंग रूम व्हिडिओ कॉलिंगद्वारे शेअर करण्याचा हा सर्वाेत्तम मार्ग आहे असे प्रशंसापर मत अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

WhatsApp ग्रुप कॉल्समधील या नवीन वाढीव मर्यादेचा लाभ घेण्यासाठी ग्रुप कॉलमध्ये असलेल्या सर्व व्यक्तींनी त्यांचे WhatsApp आजच iPhone आणि Android वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना आजच WhatsApp अपडेट करून हे वापरून पाहायला सांगा.

२८ एप्रिल २०२०
Tweet
स्टिकर्सच्या माध्यमातून संपर्कात राहा

आपल्या मनातील विचार आणि भावना एकही शब्द टाईप न करता व्यक्त करण्यासाठी दररोज WhatsApp वर कोट्यवधी स्टिकर्स पाठवले जातात. आम्ही दीड वर्षापूर्वी 'स्टिकर्स' हे फीचर आणले आणि तेव्हा पासून लोकांनी संवाद साधण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या माध्यमांमध्ये ते अग्रेसर आहे.

COVID-19 च्या या जागतिक साथीमध्ये मध्ये आम्ही WHO-जागतिक आरोग्य संस्थेबरोबर काम करुन "टुगेदर ॲट होम" हा स्टिकर पॅक आणला आहे. भाषा, वय आणि इतर सर्व मर्यादांच्या पलीकडे असलेली ही स्टिकर्स मजेशीर तर आहेतच पण ती शैक्षणिक आणि सर्वांना इतर कुठेही वापरता येतील अशी आहेत.

आम्हाला आशा आहे की आपल्या एकाकी असलेल्या किंवा चिंताग्रस्त जिवलग व्यक्तींना ही स्टिकर्स पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुम्हाला मदत होईल. या पॅकमध्ये विविध प्रकारे लोकांना हात धुण्याची आठवण करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, व्यायाम करणे आणि महत्वाचे म्हणजे सध्या अहोरात्र कामामध्ये असलेल्या आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील आणि इतर अनेक आधाडीवर मदत करणाऱ्या बंधुभगिनींचा आदर आणि सन्मान करण्यासाठी अनेक कलात्मक स्टिकर्सचा समावेश आहे.

"टुगेदर ॲट होम" हा स्टिकर पॅक आता WhatsApp वर उपलब्ध होत आहे. यामध्ये अरेबिक, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश आणि टर्किश अशा नऊ भाषांमध्ये मजकूर उपलब्ध असेल.

२१ एप्रिल २०२०
Tweet
WhatsApp ला वैयक्तिक आणि खाजगी ठेवणे

COVID-19 मुळे कोट्यवधी माणसं त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना प्रत्यक्षात भेटू शकत नसल्यामुळे, आता एकमेकांशी संवाद साधण्यासाठी लोक WhatsApp वर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवत आहेत. या संंकट प्रसंगी लोक WhatsApp द्वारे डॉक्टर्स, शिक्षण आणि विलगीकरण केलेल्या प्रियजनांशी बोलत आहेत. म्हणूनच सर्वाधिक वैयक्तिक संवाद साधण्यासाठी तुम्हाला एक सुरक्षित ठिकाण देण्याकरिता WhatsApp वरील तुमचे सर्व मेसेजेस आणि कॉल्स डिफॉल्टपणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्ट केले आहेत.

मागील वर्षी आम्ही वापरकर्त्यांसाठी "अनेक वेळा फॉरवर्ड केलेले मेसेजेस" ओळखण्याची संकल्पना आणली. हे मेसेजेस तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने स्वतः तयार केलेले नसून ते त्यांना दुसऱ्याच कोणी पाठविलेले आहेत हे स्पष्ट दाखवण्यासाठी त्यावर दोन बाणांनी खूण केलेली आहे. याचा अर्थ असा की, हे मेसेजेस WhatsApp वर पाठवलेल्या सामान्य मेसेजेसच्या तुलनेत कमी वैयक्तिक असतात. आता आम्ही यावर मर्यादा आणणार आहोत म्हणजे हे मेसेजेस एकावेळी फक्त एका चॅटलाच फॉरवर्ड केले जाऊ शकतात.

खाजगी मेसेजिंग सेवा म्हणून, संवाद व्यक्तिगत ठेवण्यात मदत करण्यासाठी आम्ही मागील काही वर्षांमध्ये अनेक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ, व्हायरल मेसेजेस कमी वेगाने प्रसारित व्हावेत यासाठी यापूर्वी आम्ही फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या मेसेजेसवर मर्यादा आणली. तेव्हा त्या वेळी जागतिकरित्या मेसेज फॉरवर्ड केले जाण्यात २५% घट आम्हाला दिसली.

फॉरवर्ड करणे ही वाईट गोष्ट आहे का? नक्कीच नाही. आम्हाला माहीत आहे की, अनेक वापरकर्ते उपयुक्त माहिती, तसेच मजेशीर व्हिडिओ, मेम्स, त्यांना अर्थपूर्ण वाटणारे विचार किंवा प्रार्थना फॉरवर्ड करतात. अलीकडील आठवड्यांमध्ये, अग्रभागी काम करणाऱ्या आरोग्य दक्षता कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याकरिता ते कशी सेवा देतात याचे प्रत्यक्ष क्षण दाखवण्यासाठी देखील लोक WhatsApp वापरत आहेत. पण आजकाल आम्हाला मेसेजेस फॉरवर्ड केल्या जाण्याच्या प्रमाणात भरपूर वाढ झाल्याचे दिसत आहे, ज्याविषयी वापरकर्त्यांनी आम्हाला सांगितले आहे की असे मेसेज वाचून लोक भारावून जाऊ शकतात आणि ज्यामुळे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. वैयक्तिक संवाद साधण्याचे एक ठिकाण म्हणून WhatsApp ला टिकवून ठेवण्यासाठी या मेसेजेसचे प्रसारण कमी करणे महत्त्वाचे असल्याचे आम्हाला वाटते.

या बदलाव्यतिरिक्त, लोकांना अचूक माहिती मिळवण्यात मदत करण्यासाठी आम्ही थेट सरकार आणि एनजीओंसह काम करत आहोत ज्यामध्ये "WHO-जागतिक आरोग्य संस्था" आणि २० पेक्षा जास्त राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयांचा समावेश आहे. विश्वासू अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, ज्या लोकांनी माहितीसाठी विचारणा केली होती अशा लाखो लोकांना परस्पर थेट मेसेजेस पाठवले आहेत. तुम्ही या प्रयत्नांबद्दलची अधिक माहिती तसेच संभाव्य काल्पनिक कथा, फसवणूक करणारे मेसेजेस आणि अफवा हे "तथ्य तपासणी संस्थांना" कशी पाठवायची हे आमच्या "कोरोना व्हायरस माहिती हबवर" जाणून घेऊ शकता.

खाजगीरीत्या कनेक्ट होण्याची गरज लोकांना आता पूर्वीपेक्षाही अधिक वाटते, असे आम्हाला वाटते. या अभूतपूर्व जागतिक संकटाच्या वेळी WhatsApp ला विश्वासाने कार्यरत ठेवण्यासाठी आमच्या टीम्स कठोर प्रयत्न करत आहेत. नेहमीप्रमाणे तुमचा फीडबॅक स्वागतार्हच असेल आणि लोकांना WhatsApp वर एकमेकांशी माहिती शेअर करणे सुलभ व्हावे यासाठीचे नवनवीन मार्ग शोधण्यात आम्ही सदैव कार्यरत राहू.

७ एप्रिल २०२०
Tweet
आता Android आणि iPhone वर 'डार्क मोड’ उपलब्ध होत आहे

डार्क मोड - या फिचरसाठी अनेक वापरकर्त्यांनी सर्वाधिक मागणी केली होती आणि ते फिचर WhatsApp वर आता येत आहे हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

डार्क मोड मुळे नेहमीच्या अंगवळणी पडलेल्या WhatsApp वापरास एक फ्रेश लुक मिळाला आहे. कमी प्रकाश असणाऱ्या ठिकाणी डोळ्यावर कमी ताण पडावा यादृष्टीने याची निर्मिती केली आहे. आणि अंधाऱ्या खोलीत तुमच्या फोनचा प्रखर लाईट चालू झाल्याने जी पंचाईत होते ती आता टळू शकेल असे आम्हाला वाटते.

डार्क मोडची निर्मिती करत असताना आम्ही संशोधन आणि प्रयोगांसाठी जो वेळ दिला त्यामध्ये प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर भर दिला होता :

वाचन सुसह्य करणे : रंग निवडत असताना आम्हाला डोळ्यांवरचा ताण कमी करायचा होता म्हणून आम्ही असे रंग निवडले जे iPhone आणि Android च्या सिस्टम डिफॉल्ट रंगांशी मिळतेजुळते असतील.

माहितीची संरचना : प्रत्येक स्क्रीनवर वापरकर्त्यांना लक्ष केंद्रित करणे सोपे जावे यासाठी मदत होईल. हे करण्यासाठी आम्ही असे रंग आणि डिझाईन वापरले आहे ज्यामुळे महत्त्वाची माहिती जास्त उठून दिसेल.

Android 10 आणि iOS 13 च्या सिस्टम सेटिंगमध्ये जर तुम्ही डार्क मोड सक्षम केला असेल तर WhatsApp मध्ये तो आपोआप सुरु होईल. Android 9 होऊन जुन्या आवृत्तींसाठी तुम्ही WhatsApp सेटिंग्ज > चॅट > थीम > ‘डार्क’ निवडून तुम्ही तो सुरु करू शकता.

WhatsApp च्या नवीन आवृत्तीवर डार्क मोड उपलब्ध होणार आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे फिचर नक्कीच आवडेल.

३ मार्च २०२०
Tweet
दोन अब्ज वापरकर्ते -- खाजगीपणा जपून जगभरात एकमेकांशी जोडले गेले आहेत

आम्हाला हे शेअर करण्यास खूप आनंद होत आहे की आता जगभरात दोन अब्ज लोक WhatsApp वापरतात.

वडीलधारी माणसं त्यांच्या जिवलगांच्या ते जगाच्या पाठीवर कोठेही असले तरीही अगदी सहज संपर्कात येऊ शकतात. बहीण भावंडं एकमेकांशी मौल्यवान क्षण शेअर करू शकतात. सहकर्मचारी एकमेकांशी सहयोग वाढवू शकतात आणि ग्राहकांशी सहज कनेक्ट होऊन व्यवसाय वृद्धिंगत करू शकतात.

खाजगी संभाषणे, जी पूर्वी केवळ समोरासमोरच करणे शक्य असायचे ती आता चॅट्स आणि व्हिडिओ कॉलिंग द्वारे चटकन करता येतात. WhatsApp च्या या वाटचालीमध्ये अनेक महत्त्वाचे आणि मौलिक क्षण येऊन गेले आहेत. आम्ही एवढी मोठी मजल मारू शकलो याबद्दल आम्ही ऋणी असून हा आम्हाला आमचा सन्मान वाटतो.

आम्हाला कल्पना आहे की, जेवढे अधिक लोक संपर्कात येतील तेवढीच सुरक्षा देखील आम्हाला वाढवावी लागेल. आजकाल आपला ऑनलाईन वावर बराच वाढला असल्याने आपली संभाषणे सुरक्षित ठेवणे अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत आहे.

आणि म्हणूनच WhatsApp वर पाठवलेले खाजगी संदेश हे मूलभूतरीत्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने कूटबद्ध करून सुरक्षित केलेले आहेत. सशक्त एन्क्रिप्शन हे एका अभेद्य डिजिटल लॉक प्रमाणे कार्य करते जे तुम्ही WhatsApp वर पाठवत असलेली माहिती सुरक्षित ठेवते आणि तुम्हाला हॅकर्स आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देते. संदेश हे तुमच्या फोनवरच ठेवले जातात आणि कोणीही हस्तक्षेप करून ते वाचू शकत नाहीत किंवा तुमचे कॉल्स ऐकू शकत नाहीत, अगदी आम्हीदेखील नाही. तुमची खाजगी संभाषणे तुमच्यामध्येच राहतात.

या आधुनिक काळामध्ये सशक्त एन्क्रिप्शन असणे अतिशय गरजेचे आहे. आम्ही सुरक्षेमध्ये कधीही तडजोड करणार नाही कारण तसे केल्यास लोकांची सुरक्षितता कमी होऊ शकते. अधिक सुरक्षेसाठी आम्ही उच्च सुरक्षा तज्ञांबरोबर काम करतो आणि इंडस्ट्रीमधील अग्रेसर टेक्नॉलॉजीचा वापर करून गैरवापर होणे थांबवितो तसेच, ते नियंत्रित करण्यासाठी व तक्रार नोंदवण्यासाठी गोपनीयतेशी तडजोड न करता विविध साधने प्रदान करतो.

लोकांना सोपी, सुरक्षित आणि खाजगी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशानेच WhatsApp ची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आम्ही जसे होतो तसेच आजही, जगभरातील लोकांना खाजगीरित्या कनेक्ट होण्यास मदत करण्यासाठी आणि जगभरातील दोन अब्ज लोकांची वैयक्तिक संभाषणे सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

१२ फेब्रुवारी २०२०

Tweet
लहान व्यवसायांसाठी कॅटलॉग आणत आहोत

लोकांना WhatsApp वरून त्यांच्या आवडत्या व्यवसायाशी संपर्कात राहायला आवडतं परंतु उत्पादनाची माहिती मिळविण्यासाठी अनेक फोटो आणि मेसेजेसची देवाणघेवाण करणं जिकिरीचं ठरतं. व्यवसाय जी उत्पादने आणि सेवा ऑफर करत आहेत ते जाणून घेणे अधिक सोपे व्हावे यासाठी आम्ही आज WhatsApp Business ॲप मध्ये कॅटलॉग फिचर आणत आहोत.

कॅटलॉग हे मोबाइलवरचे शोरूम असते ज्यामध्ये व्यवसायांना त्यांची उत्पादने मांडता येतात ज्यामुळे ग्राहकांना सर्व उत्पादने सहजपणे चाळता येतात आणि त्यांना जे हवे आहे ते चटकन शोधणे शक्य होते. पूर्वी व्यवसायांना त्यांच्या उत्पादनाचे फोटो एका पाठोपाठ एक असे पाठवावे लागत आणि वारंवार माहिती पाठवावी लागे - आता ग्राहकांना सर्व माहिती WhatsApp मधील कॅटलॉगमधून सहज मिळवता येईल. यामुळे व्यावसायिक जास्त प्रोफेशनल दिसतात तसेच ग्राहकांचे चॅट मधील स्वारस्य टिकून राहण्यामध्ये व त्यांची वेबसाईट बघण्याची उस्तवार टाळणे शक्य होते.

जसे की, इंडोनेशिया मधील टिकाऊ औषधी वनस्पती आणि मसाल्याच्या Agradaya या व्यवसायाचे संस्थापक अंधिका महारदिका यांना आम्ही कॅटलॉग फिचर लवकर उपलब्ध करून दिले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितले की ग्राहकांना त्यांची उत्पादने जाणून घेणे, किंमती जाणून घेणे आणि ते काय ऑफर करतात याचे फोटो पाहणे सुलभ झाले आहे - जे त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी आवश्यक आहे.

व्यावसायिक कॅटलॉगमधील प्रत्येक वस्तूसाठी किंमत, वर्णन आणि उत्पादन कोड यासारखी माहिती समाविष्ट करू शकतो. व्यवसाय आणि ग्राहक दोघांच्याही फोनवरची महत्त्वाची स्टोरेज स्पेस वाचवण्यासाठी WhatsApp ने हे कॅटलॉग फिचर विकसित केले आहे.

WhatsApp Business ॲप मध्ये कॅटलॉग तयार करण्यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. सुरु करण्यासाठी हा व्हिडिओ पहा :


आजपासून Android आणि iPhone साठी WhatsApp Business ॲप वर ब्राझील, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका या देशांमध्ये कॅटलॉग फिचर उपलब्ध होत आहे. जगभरात इतरत्र ते लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. छोट्या व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी कनेक्ट होण्यास आणि व्यवसाय वाढविण्यास कॅटलॉग कशी मदत करतात हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

७ नोव्हेंबर २०१९

Tweet
Android साठी फिंगरप्रिंट ॲप लॉक आणत आहोत

या वर्षाच्या सुरूवातीस, WhatsApp वापरकर्त्यांना सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर प्रदान करण्यासाठी आम्ही iPhone साठी 'टच आय डी' आणि 'फेस आय डी' ही वैशिष्ट्ये आणली. आज आम्ही Android फोनसाठी देखील असे प्रमाणीकरण सादर करीत आहोत ज्यामुळे आपण आपले फिंगरप्रिंट वापरून ॲप अनलॉक करू शकता. ते सुरु करण्यासाठी, सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > फिंगरप्रिंट लॉक वर टॅप करा. "फिंगरप्रिंट वापरून अनलॉक करा" हे चालू वर सेट करा आणि तुमच्या फिंगरप्रिंटची पुष्टी करा.

३१ ऑक्टोबर, २०१९
Tweet
ग्रुप्ससाठी नवीन गोपनीयता सेटिंग्ज

WhatsApp मधील ग्रुप्स हे कुटुंब, मित्रमैत्रिणी, सहकर्मचारी, वर्गमित्र आणि इतर कोणीही असो, त्यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वापरले जातात. जसजसे लोकांनी ग्रुप्सचा वापर अधिक महत्त्वाच्या संभाषणांसाठी सुरु केला तसे त्यांनी ही संभाषणे अधिक नियंत्रित कशी ठेवता येतील याविषयी विचारणा सुरु केली. आज आम्ही नवीन 'गोपनीयता सेटिंग' व आमंत्रण प्रणाली आणली आहे ज्यामुळे तुम्हाला कोण कोण ग्रुपमध्ये जोडू शकेल हे तुम्हीच ठरवू शकता.

ते सुरु करण्यासाठी, तुमच्या ॲपच्या सेटिंग्ज मध्ये जा, त्यानंतर खाते > गोपनीयता > गट येथे टॅप करा आणि "प्रत्येकजण", "माझे संपर्क" किंवा "यांना वगळा" यापैकी एक पर्याय निवडा. "माझे संपर्क" निवडले तर जे संपर्क तुमच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये आहेत तेच तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकतात. "यांना वगळा" निवडले तर ॲड्रेस बुक मधील संपर्कांमधून तुम्हाला कोणी वगळायचे असल्यास ते तुम्ही ठरवू शकता.

अशा नियंत्रणामुळे, जे ॲडमीन तुम्हाला ग्रुपमध्ये जोडू शकत नाहीत त्यांनी तुम्हाला खाजगी चॅट द्वारे आमंत्रण पाठविणे गरजेचे आहे असे त्यांना सूचित केले जाईल. यामुळे तुम्हाला ग्रुपमध्ये सामील व्हायचे की नाही हे तुम्ही आमंत्रण स्वीकारून अथवा नाकारून ठरवू शकता. आमंत्रण कालबाह्य होण्यापूर्वी तुमच्याकडे तीन दिवस असतील.

या नवीन फिचर मुळे, वापरकर्त्यांना ग्रुप मेसेजेस नियंत्रणामध्ये ठेवणे शक्य होईल. आजपासून हे गोपनीयता सेटिंग्ज काही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल आणि येणार्‍या आठवड्यांमध्ये WhatsApp ची नवीनतम आवृत्ती असलेल्यांना ते संपूर्ण जगभरात उपलब्ध होईल.

अपडेट : सुरुवातीला जेव्हा आम्ही हे फिचर उपलब्ध केले होते तेव्हाच्या वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार "कोणीच नाही" या पर्यायाऐवजी "यांना वगळा" हा पर्याय आता आम्ही देत आहोत. यामुळे तुम्ही काही विशिष्ट संपर्कांना वगळायचे असल्यास तसे करू शकता किंवा "सर्वांना निवडले" तर कोणीच तुम्हाला तुमच्या परवानगी शिवाय ग्रुपमध्ये जोडू शकणार नाही. हा नवीन अपडेट WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरणाऱ्यांना संपूर्ण जगभरात उपलब्ध होईल.

अखेरचा अपडेट : ५ नोव्हेंबर २०१९

३ एप्रिल २०१९
Tweet
पुढील पृष्ठ

WhatsApp

  • फीचर्स
  • सुरक्षा
  • डाउनलोड
  • WhatsApp वेब
  • बिझनेस
  • गोपनीयता

कंपनी

  • आमच्याबद्दल
  • करियर्स
  • ब्रँड केंद्र
  • संपर्क साधा
  • ब्लॉग
  • WhatsApp अनुभव

डाउनलोड

  • Mac/PC
  • Android
  • iPhone

मदत

  • मदत केंद्र
  • Twitter
  • Facebook
  • कोरोना व्हायरस
2021 © WhatsApp LLC
गोपनीयता आणि अटी