जगभरात वापरल्या जाणाऱ्या WhatsApp ला अब्जावधी लोकांचे प्रेम लाभले आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा साधासोपा, विश्वसनीय व खाजगी प्लॅटफॉर्म देऊ करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. असे असले तरी, या ॲपची उपयुक्तता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करत राहणार आहोत.
या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणून आम्ही पुढील काही आठवड्यांमध्ये काही नवीन फीचर्स घेऊन येत आहोत:
ॲनिमेटेड स्टिकर्स: WhatsApp वर होणाऱ्या संभाषणांमध्ये स्टिकर्सचा वापर वेगाने वाढतो आहे. WhatsApp वर दररोज अब्जावधी स्टिकर्सची देवाणघेवाण होते. आम्ही येत्या काळात भावना नेमकेपणे व्यक्त करणारी आणखी मजेदार स्टिकर्स लॉंच करणार आहोत.
क्यु आर कोड्स: नवीन संपर्क समाविष्ट करणे आता आणखी सोपे! आता तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीचा संपर्क त्यांचा क्यु आर कोड स्कॅन करून जोडता येईल. आता संपर्क जोडण्यासाठी नंबर्स दाबत बसायला नको.
ग्रुप व्हिडिओ कॉल्समधील सुधारणा: व्हिडिओ कॉल्समध्ये आता ८ लोकांना समाविष्ट करता येते. अशा वेळी, तुम्हाला ज्या सहभागी व्यक्तीवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्या व्यक्तीच्या व्हिडिओवर प्रेस करून दाबून धरल्याने त्या व्यक्तीचा व्हिडिओ फुल स्क्रीनवर दिसायला लागतो. ८ किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असलेल्या ग्रुप चॅटमध्ये आता आम्ही व्हिडिओ आयकॉन समाविष्ट केला आहे. या आयकॉनच्या मदतीने तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकता.