०७ ऑगस्ट, २०१३
आम्ही WhatsApp वर सहज संपर्कात कसे राहू शकतो यावर विचार करण्यात खूप वेळ घालवतो, आणि आम्हाला माहित आहे की मित्राचा किंवा चुटुंबातील सदस्याचा आवाज ऐकण्याला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे आज आम्ही खरोखरंच ज्यासाठी उत्सुक आहोत ते नवीन फीचर आम्ही सादर करत आहोतt: व्हॉइस मेसेजेस.
एकाच वेळी आम्ही आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हॉइस मेसेजेस रिलिज करत आहोत. आम्ही iPhone आणि Android डिव्हाइसवर अचूकतेने व्हॉइस मेसेजेसचे कार्य होते याची खात्री करण्यासाठी म्हणून खूप मेहनत घेतली, आणि BlackBerry, Nokia आणि Windows Phone वापरकर्ते देखील तोच संपन्न आणि सामर्थ्यित आनंद घेतील याची खात्री करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घेत आहोत.
व्हॉइस मेसेजबद्दल आणि ते कसे कार्य करतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही बनवलेला हा व्हिडिओ एकदा पहा:
http://www.youtube.com/watch?v=i3I_7H1mByA
तुमच्या विशिष्ट फोनसाठी तुम्हाला व्हॉइस मेसेजेसबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आमची मदतपुस्तिका देखील वाचू शकता.
आम्हाला व्हॉइस मेसेजेस बनवण्यात जितका आनंद झाला तितकाच तुम्हीही त्याचा आनंद घ्याल अशी आम्हाला आशा आहे.