२५ ऑगस्ट, २०१६
आज आम्ही WhatsApp चे 'अटी आणि गोपनीयता धोरण' ४ वर्षानंतर अपडेट करत आहोत. पुढील काही महिन्यात लोकांशी संवाद साधून व्यवहार करण्याचे निरनिराळे मार्ग तपासून पाहण्याच्या आमच्या योजनेचा तो एक भाग आहे. आमचे अद्यतनित दस्तावेज हे प्रतिबिंबित करते की आम्ही Facebook मध्ये सामील झालो आहोत आणि आम्ही नुकतीच नवीन वैशिष्ट्ये जसे की, एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कूटबद्धता, WhatsApp कॉलिंग तसेच मेसेजिंग साधने जसे की वेब आणि डेस्कटॉप वरील WhatsApp यांना देखील वापरण्यास उपलब्ध केले आहे. तुम्ही येथे पूर्ण दस्तावेज वाचू शकता. आमच्या अॅपच्या नवीन सपोर्टेड आवृत्तीं वरील सर्वांना या अद्यतनांबद्दल सूचित करण्यात आले आहे आणि WhatsApp वापरणे चालू ठेवण्यासाठी तुम्ही 'सहमत' वर टॅप करा असे तुम्हाला विचारण्यात येईल.
आपल्या मित्रांशी आणि त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान व्यक्तींशी संपर्कात राहण्यासाठी लोक आमचे अॅप दररोज वापरतात आणि यात काहीही बदलणार नाही. परंतु जसे आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला घोषित केले, आम्ही असे मार्ग शोधत आहोत ज्याद्वारे लोकांशी संवाद साधून व्यवहार करणे आणि ते करत असतानाही कोणत्याही तृतीयपक्षीय जाहिरातींचे बॅनर आणि स्पॅम चा अनुभव न घेता ते करणे शक्य होईल. मग ते एखाद्या बँकेकडून एखाद्या संभाव्य फसव्या व्यवहाराविषयी ऐकत असाल किंवा एअरलाईन कंपनीकडून एखादी फ्लाईट उशीरा येत असल्याची सूचना असेल, आपल्यापैकी अनेकजण ही माहिती टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉल्स च्या माध्यमातून इतर कोणाकडूनही ही माहिती मिळवू शकतात. आम्ही पुढील काही महिने हे फीचर्स टेस्ट करण्यामध्ये घालवू परंतु तसे करण्यासाठी आम्हाला आमचे अटी आणि गोपनीयता धोरण अपडेट करणे गरजेचे आहे.
आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स अपडेट करून हे सुद्धा स्पष्ट करायचे आहे की आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धीकरण सुद्धा सामील केले आहे. तुम्ही आणि ज्या व्यक्तीना तुम्ही मेसेज करीत आहेत ती व्यक्ती जेव्हा WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत असते तेव्हा तुमचे मेसेज मूलभूतरित्या एन्क्रिप्ट केलेले असतात याचा अर्थ फक्त तुम्हीच त्यांना वाचू शकता. जरी आम्ही Facebook शी पुढील काही महिन्यात अधिक समन्वय साधणार असलो तरी तुमचे एन्क्रिप्टेड मेसेज हे खाजगीच राहतील आणि कोणीही त्यांना वाचू शकणार नाही. WhatsApp नाही, Facebook नाही, कोणीही नाही. आम्ही अजूनही तुमचा फोन नंबर जाहिरातदारांना विकत नाही अथवा त्यांच्याशी शेअर करत नाही.
परंतु Facebook बरोबर समन्वय साधल्यामुळे, आम्हाला काही गोष्टी करणे शक्य होते जसे की लोक आमच्या सर्व्हिसेस किती वेळा वापरतात याच्या बेसिक मेट्रिक्स चा आढावा घेणे तसेच त्याहूनही महत्वाचे म्हणजे WhatsApp वरील स्पॅमशी लढा देणे. आणि तुमचा फोन नंबर Facebook च्या सिस्टिम शी जोडला गेला आणि की Facebook तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे मित्र सुचवू शकते आणि जर तुमचे त्याच्यावर खाते असेल तर तुम्हाला अधिक योग्य जाहिराती दाखवू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला ज्याबद्दल काहीच माहित नाही त्यापेक्षा तुम्हाला अशा कंपनीची जाहिरात दिसेल ज्याच्याशी तुमचा संबंध आहे. तुमचा डेटा वापर कसा नियंत्रित करावा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे पहा.
खाजगी संभाषणाबद्दल आमची जी मूल्ये आहेत त्याला कदापिही धक्का दिला जाणार नाही आणि आम्ही अशी ग्वाही देतो की आम्ही नेहमीच तुम्हाला जलद, सुलभ आणि विश्वसनीय अनुभव WhatsApp वर प्रदान करू. नेहमीप्रमाणेच आम्ही तुमच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करीत आहोत. WhatsApp चा वापर करण्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत.