१९ जुलै, २०१८
आम्ही WhatsApp ला खाजगी मेसेजिंग अॅप बनविले आहे - जो मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी संवाद साधण्याचा एक सोपा, सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग आहे आणि आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडत असताना देखील काळजीपूर्वक प्रयत्नात असतो की लोकांना आमच्याबद्दल वाटणारी जिवलगपणाची भावना जिवंत ठेवता येईल.
काही वर्षांपूर्वी आम्ही WhatsApp मध्ये एक वैशिष्ट्य जोडले जे तुम्हाला एकाचवेळी एकापेक्षा अधिक चॅटना संदेश फॉरवर्ड करू देते.
आज, आम्ही फॉरवर्ड करणे मर्यादित करण्याची चाचणी लाँच करत आहोत जी WhatsApp वापरणार्या प्रत्येकाला लागू होईल. भारतामध्ये - जेथे लोक जगभरातील कोणत्याही अन्य देशाच्या तुलनेत अधिक संदेश, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करतात - आम्ही एकाच वेळी ५ चॅट इतक्या कमी मर्यादेचीही चाचणी करू आणि आम्ही मीडिया संदेशांच्या बाजूचे त्वरित फॉरवर्ड बटण काढून टाकू.
आम्हाला विश्वास आहे की आपण सर्वांनी या बदलांचे मुल्यांकन करणे पुढे सुरू ठेवल्यास याचा WhatsApp ज्या उद्देशाने डिझाइन केले आहे तो उद्देश कायम ठेवण्यास मदत होईल : एक खाजगी मेसेजिंग अॅप.
आम्ही तुमच्या सुरक्षा आणि गोपनीयतेशी पूर्णपणे वचनबद्ध आहोत म्हणूनच WhatsApp एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केले आहे आणि आम्ही यासारख्या वैशिष्ट्यांसह आमच्या अॅपमध्ये सुधारणा करणे पुढे सुरू ठेवू. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या WhatsApp सुरक्षा टीपा पृष्ठाला भेट द्या.
अपडेट: सहा महिन्यांहून अधिक काळ WhatsApp ने या चाचणीचे मूल्यांकन केले आहे आणि ग्राहकांचा फीडबॅक काळजीपूर्वक ऐकला आहे. फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणल्याने संदेश फॉरवर्ड करण्यामध्ये संपूर्ण जगभरात लक्षणीय कपात झाली आहे. आजपासून, WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरणारे सर्व वापरकर्ते एकावेळी केवळ पाच जणांनाच संदेश फॉरवर्ड करू शकतात, यामुळे नजीकच्या लोकांशी खाजगी संदेशांमार्फत संपर्कात राहण्याचा WhatsApp चा उद्देश साध्य होईल. वापरकर्त्यांना येणाऱ्या अनुभवाचा फीडबॅक आम्ही ऐकत राहूच, शिवाय पुढील काळात व्हायरल मजकूर हाताळण्यासाठी नवीन उपाय शोधण्यासाठी कार्यरत राहू.
अखेरचा अपडेट: २१ जानेवारी, २०१९