जून २, २०२१
WhatsApp वर बिझनेसशी चॅट करण्याकडे अधिक लोक वळत असल्यामुळे आम्ही आज F8 रिफ्रेश वर WhatsApp Business API साठी अपडेट्स जाहीर करणार आहोत, ज्यामुळे बिझनेसना सुरुवात करणे अधिक जलद आणि लोकांना या बिझनेसशी चॅट करणे अधिक सोपे होईल.
बिझनेसना पूर्णपणे सुरळीत सुरू होण्यासाठी लागणारा वेळ आम्ही आठवड्यांवरून केवळ पाच मिनिटांवर आणला आहे. एखाद्या बिझनेसला भविष्यात बिझनेस सोल्यूशन प्रोव्हायडरसोबत काम करायचे असेल किंवा थेट Facebook कडून मदत घ्यायची असेल, या सुधारणांमुळे मध्यम आणि मोठ्या बिझनेसना WhatsApp वर ग्राहकांशी संभाषण करणे सोपे जाईल.
अनेक बिझनेस आता WhatsApp वर येत असल्यामुळे, बिझनेस त्यांच्या ग्राहकांशी संवाद कसा साधू शकतील हे आम्ही सुधारत आहोत. उदाहरणार्थ, बिझनेसना बरेचदा केवळ समयोचित नोटिफिकेशन्स पाठवण्याची मर्यादा होती, ज्यामुळे २४ तासांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना आपल्या ग्राहकांशी पाठपुरावा करणे कठीण जात असे. तर आता आम्ही अधिक प्रकारच्या मेसेजेसना सपोर्ट करू -- उदा., एखादा आयटम परत साठ्यात असल्याची लोकांना माहिती व्हावी. आम्ही हेदेखील पाहिले आहे की या महामारीला प्रतिसाद देण्यासंबंधी आरोग्य अधिकार्यांचे नियमित अपडेट्स किती उपयुक्त आहेत आणि आम्हाला अशाप्रकारची सर्व्हिस अधिक प्रकारच्या संभाषणांसाठी उपलब्ध करायची आहे.
आम्ही काही नवीन मेसेजिंग फीचर्सदेखील बाजारात आणत आहोत ज्यामुळे लोकांना बिझनेस अधिक जलद होण्यास मदत होईल. नवीन लिस्ट मेसेजेस १० पर्यायांचा मेनू सादर करतात जेणेकरून आता लोकांना त्यांचा प्रतिसाद टाइप करण्याची आवश्यकता नाही. रिप्लाय करा बटण, लोकांना फक्त एका टॅपने तीन पर्यायांपैकी चटकन निवड करायला अनुमती देते जे बिझनेसने त्यांच्या WhatsApp Business API खात्याद्वारे वेळेआधीच सेट केलेले असू शकतात.
नेहमीप्रमाणेच, लोकांकडे त्यांच्या चॅट्सचे नियंत्रण राहील. पण लोकांना अजूनही WhatsApp द्वारे एखादे संभाषण सुरू करण्यासाठी किंवा एखाद्या बिझनेसला त्यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करावी लागेल. या अपडेट्ससह, जर लोकांकडे एखाद्या बिझनेसला ब्लॉक करण्याचे कारण असेल तर लोकांसाठी त्यांच्या अनुभवाबद्दल सविस्तर अभिप्राय देण्याचे नवीन मार्गदेखील आम्ही प्रदान करत आहोत.
लोकांना आणि बिझनेसना एकमेकांशी जोडले जाण्याचा अत्यंत सोयीस्कर आणि वैयक्तिक मार्ग WhatsApp असावा अशी आमची इच्छा आहे, आणि बिझनेस मेसेजिंग सुधारण्यासाठी आम्ही तयार करत असलेल्या या नवीन अनुभवांसाठी आम्ही उत्सुक आहोत.