३१ ऑक्टोबर, २०११
नुकतीच आपल्या या पृथ्वीने ७ अब्ज इतक्या लोकसंख्येची पातळी गाठली आहे, योगायोग असा आहे की गेल्या आठवड्यामध्ये WhatsApp ने त्याचा स्वतः चा मैलाचा दगड सर केला आहे तेही एक अब्ज संदेश एका दिवसात प्रथमच पाठवून. ज्याप्रमाणे आता पृथ्वीवर ७ अब्ज लोक वास्तव्य करतील या कल्पनेने आम्ही हरखून जातो अगदी त्याच प्रमाणे WhatsApp मध्ये काम करणारे आम्ही सर्व भविष्याबद्दल अतिशय आशावादी आणि उत्सुक आहोत.
मग हे १ अब्ज संदेश नक्की किती असतात? ते असतात ४,१६,६६,६६७ संदेश एका तासामध्ये, ६,९४,४४४ संदेश एका मिनिटामध्ये आणि ११,५७४ संदेश एका सेकंदामध्ये.
एका दिवसात १ अब्ज संदेश हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आमच्या ध्येयाच्या दिशेने पडलेले पुढचे पाऊल आहे : कोणताही हँडसेट असो, जागतिक बाजारपेठेत अतिशय दर्जेदार मोबाईल मेसेजिंग सिस्टिम उपलब्ध करून देणे.
आमच्या सर्व वापरकर्त्यांना आमच्या उत्पादनाबद्दल जी निष्ठा आणि उत्कंठा आहे त्याबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत, आपण नसता तर आम्ही हे कधीच करू शकलो नसतो.