१७ मार्च, २०१४
Facebook सोबत आमची आगामी भागीदारी घोषीत केल्यापासून, आमच्या स्टोरीकडे किती लक्ष दिले गेले आहे ते पाहून आम्ही खरोखरच नम्र झालो आहोत. एक कंपनी म्हणून शक्य तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मित्र आणि प्रियजनांसह कनेक्टेड राहण्याची संधी देण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करताना आम्हाला आनंद होत आहे, मग ते कोणीही असे किंवा कुठेही राहत असो.
दुर्दैवाने, WhatsApp वापरकर्त्यांच्या डेटा आणि गोपनीयतेसाठी आमच्या भविष्यातील भागीदारीचा काय अर्थ असेल याबद्दल बरीच चुकीची आणि निष्काळजीने माहिती प्रसारित केली गेली आहे.
मला थेट रेकॉर्ड सेट करायचा आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला खात्री करून घ्यायची आहे की मी खाजगी कम्युनिकेशनच्या तत्त्वाला किती महत्त्व देतो हे तुम्हाला समजले आहे. माझ्यासाठी हे खूपच वैयक्तिक आहे. माझा जन्म युक्रेनमध्ये झाला, आणि १९८० च्या दरम्यान USSR मध्ये मोठा झालो. माझ्या त्या वेळेच्या चांगल्या लक्षात राहणाऱ्या आठवणी म्हणजे एक असं वाक्य जे मी माझ्या आईच्या तोडून फोनवर बोलताना सतत ऐकायचो: "हे फोनवरून होणारे संभाषण नाही; मी तुला वैयक्तिक भेटून सांगेन.” आमच्या कम्युनिकेशनवर KGB द्वारे देखरेख केली जाईल या भीतीशिवाय आम्ही मोकळेपणाने बोलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे की मी किशोरवयीन असताना आम्ही युनायटेड स्टेट्सला का गेलो होतो.
तुमच्या गोपनीयतेचा आदर आमच्या DNA मध्ये कोड केलेला आहे आणि आम्ही तुमच्याबद्दल शक्य तितके कमी जाणून घेण्याच्या उद्देशाने WhatsApp तयार केले आहे: तुम्ही आम्हाला तुमचे नाव देण्याची गरज नाही आणि आम्ही तुमचा ईमेल पत्ता विचारत नाही. आम्हाला तुमचा वाढदिवस माहित नाही. आम्हाला तुमच्या घराचा पत्ता माहित नाही. तुम्ही कुठे काम करता हे आम्हाला माहित नाही. आम्हाला तुमच्या आवडी-निवडी, तुम्ही इंटरनेटवर काय शोधता ते माहित नाही किंवा आम्ही तुमचे GPS लोकेशन संकलित करत नाही. त्या डेटापैकी WhatsApp द्वारे काहीही संकलित केले जात नाही आणि स्टोअर केले जात नाही, आणि ते बदलण्याच्या आमच्याकडे कोणत्याही योजना नाहीत.
Facebook सह भागीदारी करणे म्हणजे आम्हाला आमची मूल्ये बदलायची असती तर आम्ही ते केले नसते. त्याऐवजी आम्ही अशी भागीदारी स्थापित करत आहोत जी आम्हाला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे सातत्याने ऑपरेट करण्याची अनुमती देईल. आमची मूलभूत मूल्य आणि विश्वास बदलणार नाही. आमची तत्त्वे बदलणार नाहीत. वैयक्तिक मेसेजिंगमध्ये WhatsApp ला लीडर बनवणारे सर्वकाही काच ठिकाणी आहे. याउलट अनुमान केवळ निराधारच नाही तर ते बेजबाबदार आहे. यामध्ये लोकांना अचानक नवीन माहिती संकलित करत आहोत या विचाराने भिती वाटते. हे खरं नाही, आणि तुम्हाला हे माहित आहे हे आम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कोणतीही चूक करू नकाः Facebook सोबतची आमची भविष्यातील भागीदारी आम्हाला या टप्प्यावर आणलेल्या दृष्टीकोनाशी तडजोड करणार नाही. WhatsApp चे वचन सर्वदूर पोहोचवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे, जेणेकरून जगभरातील लोकांना त्यांच्या मनातील गोष्टी न घाबरता बोलण्याचे स्वातंत्र्य मिळेल.