२१ एप्रिल २०२०
आपल्या मनातील विचार आणि भावना एकही शब्द टाईप न करता व्यक्त करण्यासाठी दररोज WhatsApp वर कोट्यवधी स्टिकर्स पाठवले जातात. आम्ही दीड वर्षापूर्वी 'स्टिकर्स' हे फीचर आणले आणि तेव्हा पासून लोकांनी संवाद साधण्यासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या माध्यमांमध्ये ते अग्रेसर आहे.
COVID-19 च्या या जागतिक साथीमध्ये मध्ये आम्ही WHO-जागतिक आरोग्य संस्थेबरोबर काम करुन "टुगेदर ॲट होम" हा स्टिकर पॅक आणला आहे. भाषा, वय आणि इतर सर्व मर्यादांच्या पलीकडे असलेली ही स्टिकर्स मजेशीर तर आहेतच पण ती शैक्षणिक आणि सर्वांना इतर कुठेही वापरता येतील अशी आहेत.
आम्हाला आशा आहे की आपल्या एकाकी असलेल्या किंवा चिंताग्रस्त जिवलग व्यक्तींना ही स्टिकर्स पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुम्हाला मदत होईल. या पॅकमध्ये विविध प्रकारे लोकांना हात धुण्याची आठवण करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, व्यायाम करणे आणि महत्वाचे म्हणजे सध्या अहोरात्र कामामध्ये असलेल्या आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील आणि इतर अनेक आधाडीवर मदत करणाऱ्या बंधुभगिनींचा आदर आणि सन्मान करण्यासाठी अनेक कलात्मक स्टिकर्सचा समावेश आहे.
"टुगेदर ॲट होम" हा स्टिकर पॅक आता WhatsApp वर उपलब्ध होत आहे. यामध्ये अरेबिक, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश आणि टर्किश अशा नऊ भाषांमध्ये मजकूर उपलब्ध असेल.