२३ जून, २०१६
एक वर्षापेक्षा जास्त, लोकांनी त्यांच्या जगभरातील मित्रांसोबत कुटुंबासोबत बोलण्यासाठी WhatsApp कॉलिंग वापरले आहे. संपर्कात राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे, विशेषतः जेव्हा इतर देशातील लोकांशी कनेक्ट व्हायचे असते, किंवा फक्त मेसेज पाठवून काही होत नाही. आज, WhatsApp वर दररोज १०० दशलक्ष व्हॉइस कॉल होतात - जे प्रति सेकंद १,१०० कॉलपेक्षाही जास्त आहेत! आम्हाला खूप चांगले वाटते की लोकांना हे फीचर उपयुक्त वाटत आहे, आणि आगामी महिन्यात आम्ही ते याहून अधिक चांगले बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.