२२ मे, २०२३
तुम्ही चूक करता त्यावेळी किंवा तुमचा विचार बदलतो त्यावेळी, तुम्ही आता तुमचे पाठवलेले मेसेजेस संपादित करू शकता.
एक क्षुल्लक शब्दलेखनातील चूक दुरूस्त करण्यापासून ते मेसेजमध्ये अतिरिक्त संदर्भ जोडण्यापर्यंत, आम्ही तुम्हाला तुमच्या चॅटवर आणखी नियंत्रण देण्यास उत्सुक आहोत. तुम्हाला केवळ पाठवलेल्या मेसेजवर दीर्घ काळ दाबून ठेवावे लागेल आणि सुमारे पंधरा मिनिटांनंतर मेनूमधून ‘संपादित करा’निवडावे लागेल.
संपादित केलेले मेसेजेस त्यांच्या बाजूला असलेले ‘संपादित केले’ दर्शवतील, त्यामुळे तुम्ही ज्यांना मेसेज पाठवता त्यांना दुरस्तीबद्दल कळेल परंतु संपादन इतिहास दिसणार नाही. सर्व वैयक्तिक मेसेजेससह, मीडिया आणि कॉल्स, तुमचे मेसेजेस आणि तुम्ही करता ती संपादने एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात.
हे फीचर जगभरातील वापरकर्त्यांसाठी आणण्यास प्रारंभ झाला आहे आणि ते प्रत्येकजणासाठी येणार्या आठवड्यांमध्ये उपलब्ध होईल.
तुमचे मेसेजेस खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधून देणे हे आमचे पॅशन आहे. आज, आम्ही तुमच्यासाठी चॅट लॉक नावाचे एक नवीन वैशिष्ट्य आणण्यास उत्साहित आहोत, जे तुम्हाला तुमच्या सर्वाधिक अंतरंग संभाषणांना अधिक सुरक्षिततेच्या पातळीने संरक्षित करू देते.
चॅट लॉक केल्याने तो थ्रेड इनबॉक्समधून बाहेर काढला जातो आणि तो त्याच्या स्वतःच्या फोल्डरच्या मागे ठेवतो ज्यामध्ये फक्त तुमच्या डिव्हाइस पासवर्डने किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकद्वारे ॲक्सेस केला जाऊ शकतो. ते त्या चॅटचे कंटेन्ट नोटिफिकेशन्समध्ये देखील स्वयंचलितपणे लपवते.
आम्हाला असे वाटते की ज्या लोकांकडे वेळोवेळी त्यांचे फोन कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करण्याचे कारण असते किंवा ज्या क्षणी खास चॅट येणार असते अगदी त्याच क्षणी तुमचा फोन अन्य एखाद्या व्यक्तीकडे असतो त्यावेळी हे फीचर अत्यंत उपयुक्त असेल. तुम्ही वन-टू-वन किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करून आणि लॉक पर्याय निवडून चॅट लॉक करू शकता. हे चॅट उघड करण्यासाठी, हळू हळू तुमचा इनबॉक्स खाली औढा आणि तुमचा पासवर्ड किंवा बाोमेट्रिक एंटर करा.
पुढील काही महिन्यांमध्ये आम्ही चॅट लॉकसाठी अधिक पर्याय जोडणार आहोत, यामध्ये सहयोगी डिव्हाइससाठी लॉक करणे आणि तुमच्या चॅट्ससाठी सानुकूल पासवर्ड तयार करणे समाविष्ट आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या फोनसाठी वापरत असलेल्या पासवर्ड पेक्षा भिन्न युनिक पासवर्ड वापरू शकता.
तुमच्या मित्रांना चॅट लॉकबद्दल सांगा, जे आता प्रारंभ होत आहे.
आम्ही अॅपमध्ये नावीन्य आणणे सुरू ठेवताना, आज आम्ही WhatsApp वर येणारे अनेक नवीन फीचर्स शेअर करत आहोत ज्याबद्दल आम्हाला आशा आहे की त्यामुळे चॅट्स थोडे अधिक प्रोडक्टिव्ह आणि मजेशीर बनतील.
मतचाचण्यांवरील नवीन अपडेट्स
ग्रुपना माहिती एकत्रित करण्यासाठी आणि एकत्रित निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी आम्ही मतचाचण्यांकरिता तीन नवीन अपडेट सादर करत आहोत.
मथळ्यांसह फॉरवर्ड करणे
WhatsApp वर फोटो शेअर करणे हा मित्र आणि कुटुंबाला तुमच्या जीवनाबद्दल अपडेटेड ठेवण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि मीडियावर फॉरवर्ड करण्याच्या क्षमता म्हणजे तुम्ही एका कनेक्शनच्या ग्रुपवरील इमेज दुसऱ्यामध्ये जलद पुन्हा शेअर करू शकता. पण कधीकधी तुमच्याकडे एखाद्याने प्रतिसाद देण्यापूर्वी संदर्भ जोडण्यासाठी कदाचित वेळ नसू शकतो.
आता तुम्ही मथळा असलेला मीडिया फॉरवर्ड करता, तेव्हा तुमच्याकडे चॅट दरम्यान फोटो शेअर करताना अतिरिक्त माहिती देण्यासाठी तो ठेवण्याचा, हटवण्याचा किंवा पूर्णपणे पुन्हा लिहिण्याचा पर्याय असतो. तुम्ही फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करता तेव्हा तुम्ही त्यावर मथळा देखील जोडू शकता.
मथळ्यांसह डॉक्युमेंट शेअर करणे
इमेज किंवा व्हिडिओ शेअर करण्याप्रमाणे, तुम्ही शेअर करत असलेल्या डॉक्युमेंटना थोड्या स्पष्टीकरणाची गरज असू शकते. वर्तमानपत्रातील लेख पाठवणे असो किंला कार्य डॉक्युमेंट पाठवणे असो, आता तुमच्याकडे शेअर करण्यापूर्वी मथळा जोडण्याचा पर्याय आहे.
हे अपडेट जगभरातील युजरसाठी आणले जात आहेत आणि ते येणार्या आठवड्यांमध्ये प्रत्येकजणासाठी उपलब्ध असतील.
गोपनीयता आणि सुरक्षिततेची समान पातळी राखताना आम्ही मागील वर्षी वापरकर्त्यांसाठी जागतिक स्वरूपात त्यांच्या सर्व डिव्हाइसेसवर अखंडपणे मेसेज करा*, यावर क्षमता सादर केली.
आज, आम्ही एकाधिक फोन्सवर तेच WhatsApp खाते वापरण्याची क्षमता सादर करत आहोतयाद्वारे आमचे मल्टी-डिव्हाईस ऑफरिंग सुधारत आहोत.
वापरकर्त्यांनी खूपदा विनंती करण्यात आलेले वैशिष्ट्य, आता तुम्ही तुमचा फोन सुमारे चार अतिरिक्त डिव्हाइसेसवर लिंक करू शकता, अगदी तसेच जसे तुम्ही वेब ब्राउझर, टॅब्लेट आणि डेस्कटॉप वर WhatsApp शी लिंक करता. तुमचे वैयक्तिक मेसेजेस, मीडिया आणि कॉल एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असल्याची खात्री करून, प्रत्येक लिंक केलेला फोन WhatsApp शी स्वतंत्रणे कनेक्ट होतो आणि तुमचे मुख्य डिव्हाइस अधिक काळापासून निष्रिय असल्यास, आम्ही तुम्हाला सर्व सुसंगत डिव्हाइसमधून स्वयंचलितपणे लॉग आऊट करू.
लिंक केलेले फोन्स सुसंगत डिव्हाइसेस या रूपात मेसेजिंग सोपे करतात. आता तुम्ही, साइन आऊट न करता आणि जेथे तुम्ही चॅट सोडले आहे तिथून निवडून फोन्स दरम्यान स्विच करू शकता. किंवा तुम्ही लहान व्यवसाय मालक असल्यास, अतिरिक्त कर्मचारी आता त्याच WhatsApp Business खात्याच्या अंतर्गत त्यांच्या फोनवरून थेट ग्राहकांना प्रतिसाद देऊ शकतात.
हे अपडेट जगभरातील वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे आणि आगामी आठवड्यात प्रत्येकासाठी उपलब्ध होईल.
तसेच आगामी आठवड्यात रोल आउट करताना, आम्ही सुसंगत डिव्हाइसेसशी लिंक करण्याचा पर्यायी आणि अधिक ॲक्सेस करण्यायोग्य मार्ग सादर करत आहोत. आता तुम्ही एक-वेळ कोड प्राप्त करण्यासाठी WhatsApp वेब वर तुमचा फोन नंबर प्रविष्ट करू शकता, जो तुम्ही QR कोड स्कॅन करण्याऐवजी डिव्हाइस लिंकिंग सक्षम करण्यासाठी वापरू शकता. भविष्यात आम्ही अधिक सुसंगत डिव्हाइसवर हे वैशिष्ट्य सादर करण्यास उत्सुक आहोत.
* इग्रजीमध्ये
एक्स्पायर होणारे मेसेजेस सह वैयक्तिक चर्चांप्रमाणे – संभाषणे कायम ठेवण्याची गरज नाही. सुरक्षेच्या या अतिरिक्त स्तरामुळे मेसेजेस अयोग्य व्यक्तीला मिळत नसताना, काही वेळा तुम्ही अशी प्रासंगिक व्हॉइस नोट किंवा महत्त्वाची माहिती सेव्ह करू इच्छित असाल.
आज आम्ही “चॅटमध्ये सेव्ह करा,” सादर करत आहोत , त्यामुळे प्रेषकासाठी असणार्या खास सुपरपॉवरसह तुम्हाला नंतर आवश्यक असणारे मजकूर तुम्ही पाहू शकता. आम्हाला वाटते की तुम्ही मेसेज पाठवल्यास, चॅटमधील इतरजण तो नंतरसाठी सेव्ह करू शकतात की नाही ही तुमची निवड आहे.
यास कार्य करण्यासाठी, एखादी व्यक्ती मेसेज सेव्ह करते तेव्हा प्रेषकास सूचित केले जाईल आणि प्रेषकाकडे निर्णय फेटाळण्याची क्षमता असेल. तुमचा मेसेज इतरांना सेव्ह करता येऊ नये असे तुम्ही ठरवल्यास, तुमचा निर्णय अंतिम असेल, अन्य कोणीही तो सेव्ह करू शकत नाही आणि टायमर कालबाह्य झाल्यावर मेसेज हटवला जाईल. अशा प्रकारे तुम्ही पाठवता ते मेसेजेस कसे संरक्षित केले जावेत याबाबत तुमचे मत अंतिम असते.
तुमच्या WhatsApp वर तुम्ही सेव्ह केलेले मेसेजेस बुकमार्क चिन्हाद्वारे नोट केले जातील आणि तुम्हाला हे मेसेजेस, सेव्ह केलेल्या मेसेजेच्या फोल्डरमध्ये, चॅटद्वारे व्यवस्थापित केलेले दिसतील.
आम्हाला आशा आहे की लोक या नवीन अपडेटचा आणि त्यांना गरज असलेले मेसेजेस सेव्ह करण्याच्या सुविधेचा आनंद घेतील. जगभरात याचा प्रारंभ येणार्या काही आठवड्यांमध्ये होईल.
आम्ही कशावर कार्य करत आहोत हे जेव्हा आम्ही शेअर करतो तेव्हा ते सहसा आम्ही बील्ड करत असलेली नवीन वैशिष्ट्ये किंवा प्रॉडक्टबद्दल असते. आज आम्ही युनायटेड किंगडममधील एका त्रासदायक विकासाबद्दल लिहित आहोत ज्याबद्दल प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.
यूके सरकार सध्या नवीन कायद्याचा विचार करत आहे जो तंत्रज्ञान कंपन्यांना खाजगी मेसेज सर्व्हिसवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन खंडित करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्याचे दरवाजे उघडत. कायद्यामुळे निवडून न आलेल्या अधिकाऱ्याला जगभरातील अब्जावधी लोकांची गोपनीयता कमकुवत करण्याचा अधिकार मिळू शकतो.
कोणतीही कंपनी, सरकार किंवा व्यक्तीला तुमचे वैयक्तिक मेसेज वाचण्याचा अधिकार आहे असे आम्हाला वाटत नाही आणि आम्ही एन्क्रिप्शन तंत्रज्ञानाचे रक्षण करणे सुरू ठेऊ. यूके आणि जगभरातील लोकांना कमी सुरक्षित बनवणाऱ्या या कायद्याच्या दिशाभूल करणार्या भागांच्या विरोधात आमच्या उद्योगातील इतर तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ठाम उभे राहण्याचा आम्हाला अभिमान आहे.
—
इंटरनेटवर सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल काळजी वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी.
आम्ही एंड-टू-एंड-एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणून, यूके सरकारला विनंती करतो की ऑनलाइन सुरक्षा विधेयकामुळे प्रत्येकाची गोपनीयता आणि सुरक्षितता याबाबत निर्माण होणार्या जोखमींचे निराकरण करा. हे विधेयक एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचे संरक्षण करण्याच्या आणि गोपनीयतेच्या मानवी हक्काचा आदर करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाशी संरेखित आहे याची खात्री करण्यास उशीर झालेला नाही.
जगभरात, व्यवसाय, व्यक्ती आणि सरकारांना ऑनलाइन फसवणूक, घोटाळे आणि डेटा चोरीच्या सततच्या धमक्यांना सामोरे जावे लागते. दुर्भावनापूर्ण अॅक्टर आणि प्रतिकूल राज्ये नियमितपणे आमच्या गंभीर पायाभूत सुविधांच्या सुरक्षेला आव्हान देतात. एन्ड-टू-एंड एन्क्रिप्शन हे या धोक्यांविरोधात असलेल्या सर्वात मजबूत संभाव्य संरक्षणांपैकी एक आहे आणि महत्त्वाच्या संस्था मुख्य कार्य करण्यासाठी इंटरनेट तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून राहिल्यामुळे, दावे कधीही जास्त नव्हते.
सध्या ड्राफ्ट केल्याप्रमाणे, विधेयक एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन खंडित करू शकते, मित्र, कुटुंबातील सदस्य, कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि खुद्द राजकारणी यांच्या वैयक्तिक मेसेजच्या नियमित, सामान्य आणि अविवेकी पाळत ठेवण्याचे दरवाजे खुले करू शकते, ज्यामुळे सुरक्षितपणे संवाद साधण्याची प्रत्येकाची क्षमता मूलभूतपणे कमी करेल.
हे विधेयक एनक्रिप्शनसाठी कोणतेही स्पष्ट संरक्षण प्रदान करत नाही आणि लिखित स्वरुपात अंमलबजावणी केल्यास, OFCOM ला एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन सर्व्हिसवर खाजगी मेसेजचे सक्रिय स्कॅनिंग सक्तीने करण्याचा प्रयत्न करण्यास सक्षम बनवू शकते - यामुळे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचा उद्देश पुर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि सर्व वापरकर्त्यांच्या गोपनीयतेशी तडजोड होऊ शकते.
थोडक्यात, या विधेयकामुळे यूकेच्या प्रत्येक नागरिकाच्या तसेच ज्यांच्याशी ते जगभरात संवाद साधतात अशा लोकांच्या गोपनीयता, सुरक्षितता आणि सुरक्षेसाठी अभूतपूर्व धोका निर्माण झाला आहे, तसेच कॉपी-कॅट कायद्याचा ड्राफ्ट तयार करू पाहणार्या विरोधी सरकारांना प्रोत्साहन मिळत आहे.
समर्थक म्हणतात की ते एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेच्या महत्त्वाची प्रशंसा करतात आणि ते क्लेम करतात की एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनला कमी न करता प्रत्येकाच्या मेसेजेसचे सर्वेक्षण करणे शक्य आहे. सत्य हे आहे की ते शक्य नाही.
यूके विधेयकाविषयी चिंता व्यक्त करणारे आम्ही एकटेच नाही. युनायटेड नेशन्सने चेतावणी दिली आहे की बॅकडोअर आवश्यकता लादण्याचे यूके सरकारचे प्रयत्न "एक पॅराडाइम शिफ्ट आहे ज्यामुळे संभाव्य गंभीर परिणामांसह गंभीर समस्या उद्भवतात".
खुद्द यूके सरकारने देखील या विधेयकाच्या मजकुरात असलेल्या गोपनीयतेच्या जोखमीची कबुली दिली आहे, परंतु विधेयकाचा अशा प्रकारे अर्थ लावण्याचा त्याचा “हेतू” नाही असे म्हटले आहे.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसचे जागतिक प्रोव्हायडर वैयक्तिक सरकारांना अनुरूप त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची सुरक्षा कमकुवत करू शकत नाहीत. खास यूकेसाठी विशिष्ट "ब्रिटिश इंटरनेट" असू शकत नाही किंवा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची आवृत्ती असू शकत नाही.
यूके सरकारने तात्काळ या विधेयकाचा फेरविचार केला पाहिजे, कंपन्यांना त्यांच्या रहिवाशांना कमी नाही तर, अधिक गोपनीयता आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यात सुधारणा केली पाहिजे. एन्क्रिप्शन कमकुवत करणे, गोपनीयता कमी करणे आणि लोकांच्या खाजगी कम्युनिकेशनवर मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवणे हा मार्ग नाही.
ज्यांना आपली संभाषणे सुरक्षित ठेवण्याबद्दल काळजी आहे अशा लोकांद्वारे स्वाक्षरी केलेले:
Matthew Hodgson, सीईओ, Element
Alex Linton, संचालक, OPTF/Session
Meredith Whittaker, अध्यक्ष, Signal
Martin Blatter, सीईओ, Threema
Ofir Eyal, सीईओ, Viber
Will Cathcart, Meta येथे WhatsApp चे प्रमुख
Alan Duric, सीटीओ, Wire
WhatsApp वर, आम्हाला वाटते की तुमचे मेसेज खाजगी असायला हवेत आणि वैयक्तिक संभाषणात असतात तितके सुरक्षित असायला हवेत. तुमच्या वैयक्तिक मेसेजना डीफॉल्ट एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केले याद्वारे संरक्षण देणे हा त्या सुरक्षेचा पाया आहा आणि तुम्हालाअतिरिक्त गोपनीयतेचे स्तर आणि तुमच्या मेसेजवर आणखी नियंत्रण देण्यासाठी आम्ही नवीन वैशिष्ट्ये बनवणे कधीही थांबवणार नाही.
पडद्यामागे हे पुष्कळ कार्य होत असून तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते. आम्ही येणार्या महिन्यांमध्ये जोडणार आहोत त्या काही अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल, आज तुम्हाला सांगण्यात आम्हाला आनंद होत आहे.
खाते संरक्षण: तुम्हाला तुमचे WhatsApp खाते एका नवीन डिव्हाईसवर स्विच करण्याची गरज असल्यास – ही व्यक्ती खरोखर तुम्हीच आहात याची आम्ही दोनदा तपासणी करू इच्छित आहोत. यापासून पुढे, आम्ही तुम्हाला तुमच्या जुन्या डिव्हाईसवर तुम्ही ही स्टेप अतिरिक्त सुरक्षा तपासणी म्हणून घेऊ इच्छिता याची पडताळणी करण्यास सांगू शकतो. है वैशिष्ट्य तुम्हाला तुमचे खाते अन्य डिव्हाईसवर हलवण्यासाठी अनधिकृत प्रयत्नाबाबत अलर्ट करण्यासाठी मदत करू शकते.
डिव्हाईस पडताळणी:मोबाईल डिव्हाईस मालवेअर ही आज लोकांच्या गोपनीयतेस आणि सुरक्षेस असलेल्या सर्वाधिक मोठ्या धमकींपैकी एक आहे कारण यामुळे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या फोनचा ॲडव्हांटेज घेतला जाऊ शकतो आणि अवांछित मेसेज पाठवण्यासाठी तुमच्या WhatsApp चा वापर केला जाऊ शकतो. हे प्रतिबंधित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही तुमचे खाते प्रमाणित करण्यात मदत करण्यासाठी तपासण्या जोडल्या आहेत - यात तुम्हाला कोणतीही कृती करण्याची गरज नाही - आणि यामुळे तुमचे डिव्हाईस बळकावले गेल्यास तुमचे अधिक चांगले संरक्षण होते. यामुळे तुम्हाला WhatsApp अखंडपणे वापरणे चालू ठेवता येते. येथे तंत्रज्ञानावर सखोलपणे विचार करा.*
स्वयंचलित सुरक्षा कोड: सुरक्षेबाबत सर्वाधिक जाणीव असलेले आमचे वापरकर्ता नेहमीच आमच्या पडताळणी वैशिष्ट्य सुरक्षा कोडचा ॲडव्हांटेज घेतात, जे तुम्ही योग्य प्राप्तकर्त्यासोबत चॅट करत आहात याची खात्री करण्यात मदत करते. तुम्ही हे संपर्काची माहिती याखालील एनक्रिप्शनवर मॅन्युअली जाऊन तपासू शकता. ही प्रक्रिया अधिक सोपी आणि आणखी ॲक्सेसिबल बनवण्यासाठी, आम्ही “की ट्रान्सपरन्सी” नावाच्या प्रक्रियेवर आधारित असलेल्या एका सुरक्षा वैशिष्ट्याचा प्रारंभ करत आहोत ज्यामुळे तुम्ही स्वयंचलितपणे पडताळणी करू शकता की तुमच्याकडे एक सुरक्षित कनेक्शन आहे. तुमच्यासाठी याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एनक्रिप्शन टॅबवर क्लिक करता तेव्हा, तुमचे वैयक्तिक संभाषण सुरक्षित केले आहे याची तुम्ही लगेच पडताळणी करू शकाल. तंत्रज्ञानामध्ये सखोलपणे विचार करण्यात इंटरेस्ट असणाऱ्या लोकांसाठी, येथे क्लिक करा.*
आम्ही तुमचे खाते सुरक्षित करण्यात मदत करण्याचे हे तीन अतिरिक्त मार्ग आहेत. आम्ही प्रत्येकजणासाठी सुरक्षा सुलभ बनवण्यासाठी करू शकतो अशा बर्याच गोष्टी असताना, अशी दोन वैशिष्ट्ये आहेत जी केवळ तुम्हीच चालू करू शकता: टू-स्टेप व्हेरिफिकेशन आणि एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन बॅकअप चा वापर. तुम्ही आधीपासून दोन्ही वापरत असल्यास, कृपया तुमच्या मित्रांना त्याबद्दल सांगा जेणेकरून अधिक लोकांना देखील या सुरक्षेच्या स्तरांचा लाभ मिळू शकतो.
आम्हाला आशा आहे की लोक या वाढीव सुरक्षा वैशिष्ट्यांच्या ऑफरचा लाभ घेत आहेत आणि आम्ही आणखी अपडेटबाबत लवकरच घोषणा करण्यास उत्सुक आहोत.
*इंग्रजीमध्ये
Starting today people across Brazil will be able to pay their local small business right within a WhatsApp chat. This seamless and secure checkout experience will be a game-changer for people and small businesses looking to buy and sell on WhatsApp without having to go to a website, open another app or pay in person. We’re rolling out today to a small number of businesses and will be available to many more in the coming months.
In Brazil you can search for a business, browse goods and services, add them to your cart, and make a payment all with just a few taps. We’re excited to finally unlock this ability for people and businesses right within a chat.
It’s now possible to pay for goods and services using Mastercard and Visa debit, credit and pre-paid cards issued by the numerous banks participating in the service. Small businesses using the WhatsApp Business app can link a supported payment partner – such as Cielo, Mercado Pago or Rede – and create an order within the app to securely accept payments from their customers.
Just like every feature in WhatsApp, payments are designed to be secure. Card numbers are encrypted and securely stored, and people are required to create a Payment PIN and use it for each payment. We also offer customer support to ensure help is available, if needed.
We’re excited to hear how this service helps people and small businesses in Brazil connect on WhatsApp, and look forward to bringing it to more types of businesses and countries in the future.
WhatsApp ने मोबाईल ॲप या रूपात प्रारंभ केला आणि आजही उत्तमपणे कार्य करत आहे. परंतु लक्षावधी लोक कॉम्प्यूटर आणि टॅब्लेटवर WhatsApp वापरत असल्यामुळे, आम्ही डिव्हाइसवरील मेसेजिंग आणि कॉलिंग अनुभव आणखी चांगला करण्यावर लक्ष केद्रित करत आहोत.
आज, आम्ही Windows साठी एक अगदी नवीन WhatsApp ॲप सादर करत आहोत, येथेडाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
नवीन Windows डेस्कटॉप अॅप अधिक जलद लोड होतो आणि याचा इंटरफेस WhatsApp तसेच Windows वापरकर्त्यांना परिचित असलेल्या इंटरफेस प्रमाणेच तयार केला आहे. तुम्ही सुमारे 8 लोकांपर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉल आणि 32 लोकांपर्यंत ऑडिओ कॉल होस्ट करू शकता. आम्ही कालांतराने या मर्यादा वाढवणे चालू ठेवू त्यामुळे तुम्ही नेहमीच मित्र, कुटुंब आणि कार्यस्थानातील सहकर्मींसोबत कनेक्ट करू शकता.
WhatsApp हा सर्वाधिक मोठा प्लॅटफॉर्म आहे, जो मोबाईल फोन, कॉम्प्यूटर, टॅब्लेट आणि बर्याच डिव्हाइस दरम्यान क्रॉस प्लॅटफॉर्म कम्युनिकेशन करण्यासाठी पूर्णपणे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेला अनुभव प्रदान करतो. याचा अर्थ असा की तुमचे वैयक्तिक मेसेजेस, मीडिया आणि कॉल तुमच्या सर्व डिव्हाइसवर नेहमी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात.
नवीन एकाधिक-डिव्हाइस क्षमता सादर करत असल्याने,आम्ही अभिप्राय पाहिले आहेत आणि अधिक जलद डिव्हाइस लिंक करणे आणि डिव्हाइसवर अधिक चांगल्या प्रकारे सिंक करणे तसेच, लिंक प्रीव्ह्यू आणि स्टिकर यांसारखी नवीन वैशिष्ट्ये अशा सुधारणा केल्या आहेत.
आम्ही WhatsApp ला समर्थन देणार्या डिव्हाइसच्या संख्येत वाढ करत असल्याने, आम्ही नुकताच Android टॅब्लेटसाठी एक नवीन WhatsApp बीटा अनुभव सादर केला आहे. आम्ही Mac डेस्कटॉपसाठी एक नवीन, अधिक जलद ॲप लॉंच करत आहोत जो सध्या बीटाच्या सुरुवातीच्या अवस्थांमध्ये आहे.
आम्ही भविष्यात WhatsApp आणखी डिव्हाइसवर देखील आणण्यासाठी उत्सुक आहोत.
लोकांना WhatsApp वर त्यांच्या ग्रुप्सचा पुरेपूर लाभ मिळवण्यात मदत करण्यासाठी गेल्या वर्षी, आम्ही कम्युनिटीज चा प्रारंभ केला. लॉंच केल्यापासून, आम्ही समान असलेल्या अॅडमिन आणि युजर्ससाठी आणखी टूल्स देखील तयार करू इच्छित आहोत. ॲडमिन्सकरिता ग्रुप्स आणखी व्यवस्थापित करण्यायोग्य बनवण्यासाठी आणि प्रत्येकसासाठी नॅव्हिगेट करणे अधिक सोपे करण्यासाठी आम्ही केलेले काही नवीन बदल प्रारंभ करण्यात आम्हाला आनंद होत आहे.
ॲडमिन्सकरिता नवीन नियंत्रणे
अधिकाधिक लोक कम्युनिटीजमध्ये सामील होत असल्याने, आम्ही ग्रुप अॅडमिनना त्यांच्या ग्रुपच्या गोपनीयतेवर आणखी नियंत्रण देऊ इच्छितो, म्हणून आम्ही एक सोपे टूल बनवले आहे ज्यामुळे अॅडमिन्स ठरवू शकतात की कोण ग्रुपमध्ये सामील होऊ शकते.जेव्हा एखादा अॅडमिन त्याच्या ग्रुपची आमंत्रण लिंक शेअर करण्याची निवड करतो किंवा कम्युनिटीमध्ये त्याचा ग्रुप सामील होण्यायोग्य बनवतो तेव्हा, कोण सामील होऊ शकते यावर त्याचे आता अधिक नियंत्रण असेल. ग्रुप्स असे ठिकाण असते जिथे लोक त्यांची अत्यंत आंतरिक संभाषणे करतात आणि ॲडमिनना कोण प्रवेश करू शकते आणि कोण प्रवेश करू शकत नाही हे सहजपणे ठरवता येणे महत्त्वाचे असते.
कॉमन असलेले ग्रुप्स सहजपणे पहा
आम्ही कम्युनिटीज आणि त्यांच्या अधिक मोठ्या ग्रुप्सद्वारे, एखादी व्यक्ती आणि तुम्ही यांच्यामध्ये कोणते ग्रुप्स कॉमन आहेत हे माहित करून घेणे सोपे करू इच्छितो. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करता त्या तुम्हाला माहित असलेल्या ग्रुपचे नाव तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही दोघे ज्या ग्रुप्समध्ये आहात ते ग्रुप्स तुम्ही पाहू इच्छित असल्यास, तुम्ही आता तुमचे कॉमन असलेले ग्रुप्स पाहण्यासाठी सहजपणे एखाद्या संपर्काचे नाव शोधू शकता.
ग्रुप्सना ॲडमिन्स आणि समान सदस्यांसाठी उत्तम अनुभव देता यावा यासाठी आम्ही नवीन टूल्स तयार करणे सुरु ठेवत असल्याने, ही वैशिष्ट्ये येणार्या आठवड्यांमध्ये जागतिक पातळीवर सुरु होतील.