आशयावर जा
  • होम
    • मेसेज प्रायव्हेटलीकनेक्टेड रहाकम्युनिटी बील्ड करास्वत:स व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
डाउनलोड करा
सेवाशर्ती2023 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • मेसेज प्रायव्हेटली

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • कम्युनिटी बील्ड करा

      ग्रुप संभाषणे सोपी बनवली.

    • स्वत:स व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • बिझनेससाठी
WhatsApp वेबडाउनलोड करा
WhatsApp ब्लॉग

ग्रुप व्हिडिओ कॉल्स आणि ग्रुप व्हॉइस कॉल्समध्ये आता ८ व्यक्तींना समाविष्ट करता येईल

COVID-19 च्या साथीमध्ये अनेकजण आपापल्या घरांपासून, मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांपासून दूर अडकून पडले आहेत. त्यामुळे जगभरातील लोक आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल्सची जास्तीतजास्त मदत घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्रुप कॉलिंग अधिक उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आणि आमच्या वापरकर्त्यांनी एकाचवेळी जास्तीतजास्त लोकांशी कनेक्ट करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी आम्ही आजपासून WhatsApp व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉलमध्ये एकाचवेळी समाविष्ट होऊ शकणाऱ्या व्यक्तींची कमाल संख्या ४ वरून ८ केली आहे.

गेल्या एका महिन्यामध्ये जगभरातील लोक सरासरी तत्त्वावर प्रतिदिन १५ अब्ज मिनिटांहून अधिक वेळ WhatsApp कॉल्सवर घालवत आहेत असे दिसून आले आहे. हे प्रमाण साथीच्या पूर्वी होते त्याहून कितीतरी जास्त आहे. लिहून पाठवलेल्या मेसेजेसप्रमाणे या कॉल्सनाही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभले आहे. साध्या फोन्सपासून ते कमी क्षमतेचे नेटवर्क असणाऱ्या फोन्सवर जास्तीतजास्त लोकांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने आम्ही ग्रुप कॉलिंग तयार केले आहे.

लोकांना घरातल्या घरात राहून इतरांशी कनेक्ट करण्याचे अनेक मार्ग हवे असतात आणि याचसाठी Portal वरही WhatsApp उपलब्ध करून देण्यात आले आहे. क्वारंटाइनमध्ये असताना संपूर्ण लिव्हिंग रूम व्हिडिओ कॉलिंगद्वारे शेअर करण्याचा हा सर्वाेत्तम मार्ग आहे असे प्रशंसापर मत अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

WhatsApp ग्रुप कॉल्समधील या नवीन वाढीव मर्यादेचा लाभ घेण्यासाठी ग्रुप कॉलमध्ये असलेल्या सर्व व्यक्तींनी त्यांचे WhatsApp आजच iPhone आणि Android वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना आजच WhatsApp अपडेट करून हे वापरून पाहायला सांगा.

२८ एप्रिल २०२०

ट्विट कराशेअर करा
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगोडाउनलोड करा
आम्ही काय करतोफीचर्सब्‍लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोतआमच्या बद्दलकरीअर्सब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापराAndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदत हवी आहे का?आमच्याशी संपर्क करामदत केंद्रकोरोना व्हायरससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2023 © WhatsApp LLC

सेवाशर्ती