३१ ऑक्टोबर, २०१९
या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही WhatsApp वापरकर्त्यांसाठी सुरक्षेचा जास्तीचा स्तर प्रदान करण्यासाठी iPhone करीता टच आयडी आणि फेस आयडी उपलब्ध केले. आज आम्ही त्यासारखेच प्रमाणिकरण सादर करत आहोत, ज्याद्वारे तुम्हाला सपोर्टेड Android फोनवर, तुमचे फिंगरप्रिंट वापरुन ॲप अनलॉक करता येतो. ते सक्षम करण्यासाठी, सेटिंग्ज > खाते > गोपनीयता > फिंगरप्रिंट लॉक टॅप करा. फिंगरप्रिंटसह अनलॉक करा चालू करा, आणि तुमचे फिंगरप्रिंट कन्फर्म करा.