८ डिसेंबर २०२०
WhatsApp हे केवळ संवाद साधण्याचेच नाही तर प्रॉडक्ट्स पाहण्याचे, त्यांच्याबद्दल चर्चा करण्याचे व त्यांची विक्री करण्याचेही माध्यम बनत चालले आहे. कॅटलॉग्सच्या मदतीने उपलब्ध असलेली उत्पादने लोकांना चटकन पाहता येतात तसेच बिझनेसनादेखील विशिष्ट प्रॉडक्टसंबंधी झालेली त्यांची चॅट्स ऑर्गनाइझ करण्यास मदत होते. चॅट्समधून शॉपिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे आणि म्हणूनच खरेदी-विक्री करणे अधिकच सोपे करण्याची आमची इच्छा होती.
त्याच प्रयत्नांचे फलित म्हणून WhatsApp वर 'कार्ट्स' हे फीचर दाखल करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जे बिझनेस एकावेळी अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्सची विक्री करतात (जसे की लोकल रेस्टॉरंट किंवा कपड्यांचे दुकान), अशा बिझनेसना मेसेज करायचा असल्यास 'कार्ट्स' हे फीचर उपयुक्त ठरते. कार्ट्सच्या मदतीने लोकांना कॅटलॉग ब्राउझ करता येतो, एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट्स निवडता येतात आणि ही ऑर्डर एका मेसेजच्या रूपात बिझनेसला पाठवता येते. यामुळे बिझनेसना ऑर्डर्सबद्दलच्या विचारणांचा माग ठेवता येतो, ग्राहकांच्या विनंत्या उत्तम पद्धतीने हाताळता येतात आणि प्रॉडक्ट्सची विक्री मार्गी लावता येते.
उदाहरणार्थ, राजकोटमधील 'उत्तम टॉईज' या स्टोअरला या फीचरचा अर्ली ॲक्सेस मिळाला. त्यांनी आम्हाला सांगितले की, ग्राहकांना प्रॉडक्ट्स ऑर्डर करणे कार्ट्समुळे खूप सोपे झाले आणि ऑर्डर्स ऑर्गनाईझ करण्यासाठी देखील त्यांच्या बिझनेसला याचा उपयोग झाला.
कार्ट्स वापरणे सोपे आहे. तुम्हाला हवे आहे ते प्रॉडक्ट निवडा आणि "कार्टमध्ये जोडा" वर टॅप करा. तुमचे कार्ट पूर्ण झाले की, ते एका मेसेजच्या रूपात त्या बिझनेसला पाठवा. कार्ट हे फीचर कसे वापरायचे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे पहा.
आगामी सणासुदीचा काळ आणि त्यानिमित्ताने होणारी शॉपिंग विचारात घेऊन 'कार्ट्स' हे फीचर आज जगभरात लॉंच होणार आहे. WhatsApp वरील शॉपिंगसाठी शुभेच्छा!