३० मार्च, २०२२
आम्ही जेव्हा २०१३ मध्ये प्रथम व्हॉइस मेसेजेस लाँच केले, तेव्हा त्यामुळे लोकांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडू शकेल याची आम्हाला खात्री होती. डिझाईन साधे ठेवल्यामुळे, एखादा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून पाठवणे हे आम्ही मजकूर पाठवण्याइतकेच जलद आणि सोपे केले आहे. WhatsApp वर दररोज आमचे वापरकर्ते सरासरी ७०० कोटी व्हॉइस मेसेजेस पाठवतात, जे नेहमी खाजगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात.
WhatsApp वरील व्हॉइस मेसेजचा अनुभव अधिक चांगला करणार्या नवीन फीचर्सची घोषणा करताना आम्हाला आज अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये या गोष्टी समाविष्ट आहेत:
व्हॉइस मेसेजेसमुळे अर्थपूर्ण संवाद साधणे लोकांसाठी आता जलद आणि सोपे झाले आहे. मजकुरापेक्षा आवाजाद्वारे भावना आणि उत्साह व्यक्त करणे अधिक नैसर्गिक आहे, आणि अनेक परिस्थितींमध्ये WhatsApp वर संभाषण करताना व्हॉइस मेसेजेसना अधिक पसंती दिली जात आहे. हे सर्वांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे आहे - टाइपिंग न करू इच्छिणारे तुमचे कुटुंबीय, किस्से सांगण्याची आवड असलेले तुमचे मित्र, प्रोत्साहनाची गरज असलेले तुमचे समवयस्क, किंवा जेव्हा एका धकाधकीच्या दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आवाज ऐकावासा वाटतो.
येत्या काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार्या या फीचर्सचा वापर वापरकर्त्यांनी करून पाहावा याकडे आम्ही उत्सुकतेने पहात आहोत.