आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज कराकनेक्टेड रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराबिझनेससाठी WhatsApp
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • बिझनेससाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • कनेक्टेड रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • WhatsApp Business

      कुठूनही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप्स
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

आमच्या अपडेटविषयी आणखी माहिती

आज आम्ही WhatsApp वापरकर्त्यांना आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन कशा प्रकारे करायला सांगणार आहोत याबद्दलची अपडेट केलेली माहिती देणार आहोत. यापूर्वी या अपडेटविषयी अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले, त्यामुळे अनेक गैरसमज पसरले आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही अजूनही अविश्रांत काम करत आहोत.

आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की, या अपडेटमधून आम्ही एखाद्या बिझनेससोबत चॅट किंवा शॉपिंग करण्याच्या नवीन मार्गांची माहिती देत आहोत. कृपया लक्षात घ्या, की एखाद्या बिझनेससोबत संभाषण करावे की नाही ही निवड पूर्णपणे तुमची आहे. तुमच्या वैयक्तिक मेसेजेसना WhatsApp च्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण लाभलेले आहे आणि त्यामुळेच, WhatsApp तुमचे वैयक्तिक मेसेजेस वाचू किंवा ऐकू शकत नाही.

हे आम्ही अधिक चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकलो असतो, यावर आम्ही गांभीर्याने विचार केला आहे. आम्ही नेहमीच एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचा पुरस्कार केला आहे हे आमच्या वापरकर्त्यांना कळावे अशी आमची इच्छा आहे आणि त्यातून वापरकर्त्यांचे खाजगीपण व सुरक्षितता जपणे हेच आमचे ध्येय असते यावर वापरकर्त्यांनी विश्वास ठेवावा. यामुळेच आम्ही 'स्टेटस' फीचरच्या मदतीने आमची मूल्ये थेट WhatsApp मधूनच आमच्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आमचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करणार आहोत.

येत्या काही आठवड्यांमध्ये आम्ही WhatsApp मध्ये एक बॅनर दाखवणार आहोत. हे बॅनर लोकांना आणखी माहिती देईल आणि लोकांना ती माहिती त्यांच्या सोयीने वाचता येईल. आम्ही कळणाऱ्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी आणि संबोधित करण्यासाठी आम्ही अधिक माहिती समाविष्ट देखील केली आहे. कालांतराने, आम्ही लोकांना हे अपडेट्स स्वीकारण्याची आठवण करून देऊ, जेणे करून त्यांना WhatsApp अव्याहत वापरता यावे.

आम्ही WhatsApp ची सेवा पूर्णपणे मोफत कशी देऊ शकतो हेदेखील लोकांना कळणे अतिशय महत्त्वाचे आहे असे आम्हाला वाटते. दर दिवशी जगभरातील करोडो लोक WhatsApp वरील बिझनेसेसशी संपर्क साधतात व त्यांच्याशी संभाषण करतात. बिझनेसला कॉल करण्यापेक्षा किंवा ईमेल्स पाठवण्यापेक्षा त्यांना WhatsApp वर चॅट करणे जास्त सोपे वाटते. या बिझनेसेसना त्यांच्या ग्राहकांना WhatsApp वर सर्व्हिस देता यावी यासाठी आम्ही त्या बिझनेसकडून शुल्क आकारतो, लोकांकडून नाही. बिझनेसेसना अनेक अ‍ॅप्सवर त्यांची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस व्यवस्थापित करता याव्यात यासाठी काही शॉपिंगविषयक फीचर्समध्ये Facebook चा वापर केला जातो. बिझनेससोबत संभाषण करायचे की नाही हे वापरकर्त्यांना ठरवता यावे यासाठी आम्ही थेट WhatsApp वर आणखी माहिती उपलब्ध करून देणार आहोत.

हे सर्व होत असताना काही लोक इतर अ‍ॅप्स वापरून पाहाण्याचा विचार करत आहेत आणि आम्ही ते समजू शकतो. काही अ‍ॅप्स असा दावा करत आहेत की, ते लोकांचे मेसेजेस पाहू शकत नाहीत. कृपया लक्षात घ्या, एखादे अ‍ॅप एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचे संरक्षण देत नसेल, तर त्याचा अर्थ ते अ‍ॅप तुमचे मेसेजेस वाचू शकते असा होतो. काही अ‍ॅप्स असेही म्हणत आहेत की, WhastApp कडे वापरकर्त्यांची जितकी माहिती असते त्यापेक्षा कमी माहिती त्यांच्याकडे असते. लोकांना विश्वसनीय आणि सुरक्षित अ‍ॅप हवे आहे असे आम्हाला वाटते, त्यासाठी WhatsApp कडे अतिशय मर्यादित डेटा असणे गरजेचे असले तरीही. आम्ही कोणत्याही निर्णयाचा सखोल विचार करण्यावर भर देतो आणि आम्ही याहीपेक्षा कमी माहितीसह ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लोकांच्या शंकांचे निराकरण करण्यास आम्हाला मदत करणाऱ्या आणि उत्तरे देण्यासाठी हजर राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार! २०२१ मध्ये अनेक नव्या गोष्टी खुणावत आहेत आणि येत्या काही आठवड्यांमध्ये, महिन्यांमध्ये त्या शेअर करण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत.

१८ फेब्रुवारी २०२१

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरण
साइटमॅप