फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षापालक नियंत्रणे
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp वर बिझनेसशी संपर्क करण्याचे नवीन मार्ग

जगभरातील बिझनेस आता पुन्हा सुरू होत आहेत आणि ते ऑनलाइन बिझनेसचा मार्ग चोखाळण्याचा विचार करत आहेत. अशा वेळी लोकांना एखाद्या बिझनेसशी कनेक्ट करण्यासाठी, एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी, प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसविषयी माहिती मिळवण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे.

सध्याच्या घडीला ५ कोटींहून जास्त वापरकर्ते WhatsApp Business चा वापर करत आहेत. त्यांना मदत करण्‍यासाठी आणि WhatsApp Business API वरील अशा अनेक मोठ्या बिझनेसची माहिती लोकांना व्हावी यासाठी आम्ही लोकांना WhatsApp वर बिझनेससोबत चॅट सुरू करण्यात आणि त्यांची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पाहण्यात मदत करणारे फीचर्स सादर करत आहोत.

QR कोडचा वापर करून एखाद्या बिझनेससोबत चॅट सुरू करणे

QR कोड्स हा एखाद्या बिझनेससोबत चॅट सुरू करण्याचा सर्वात सोपा डिजिटल मार्ग आहे. यापूर्वी लोकांना एखादा बिझनेस किंवा त्यांची उत्पादने आवडली तर त्या बिझनेसचा नंबर संपर्क म्हणून समाविष्ट करायला लागायचा. बिझनेसचे अनेक नंबर असतील तर ते नंबर्स एकावेळी एक अशा पद्धतीने जोडायला लागायचे. पण आता लोकांना बिझनेसशी चॅट सुरू करायचे असल्यास फक्त त्या बिझनेसचा त्यांच्या स्टोअरमधला, प्रॉडक्टच्या पॅकेजिंगवर किंवा पावतीवर असलेला क्यु आर कोड स्कॅन करायचा आहे.

Uttam Toys (उत्तम टॉइज) हे भारतातील राजकोट येथील खेळण्यांचे दुकान आहे. त्यांनी या फीचरची चाचणी घेण्यात आमची मदत केली होती. हे दुकान त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या पॅकेजिंगवर आणि खेळण्यांच्या मॅन्युअलवर क्यु आर कोड टाकते. ग्राहकांना प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसविषयी प्रश्न असल्यास ते या क्यु आर कोडच्या मदतीने या बिझनेसशी संपर्क साधू शकतात.

हा क्यु आर कोड स्कॅन केल्यावर चॅट उघडते आणि त्यात बिझनेसचा स्वागत संदेश दिसतो. या मेसेजमधून तुम्ही त्या बिझनेसशी संभाषण सुरू करू शकता. ॲप्स मेसेजिंग टूल्सद्वारे, बिझनेस चॅट पुढे सुरू ठेवण्यासाठी कॅटलॉग इ. सारखी माहिती तात्काळ पाठवू शकतात. QR कोड वापरणे सुरू करण्यासाठी, बिझनेस या त्वरित स्टेप फॉलो करू शकतात.

QR कोड WhatsApp Business ॲप किंवा WhatsApp Business API वापरणाऱ्या जगभरातील बिझनेसना आजपासून उपलब्ध होणार आहे.

बिझनेस काय ऑफर करतो हे जाणून घेण्यासाठी कॅटलॉग शेअर करणे

कॅटलॉगच्या मदतीने बिझनेसना ते ऑफर करतात त्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस यांची माहिती देता येते आणि ती माहिती शेअर करता येते. यामुळे तिथल्या तिथे विक्री पूर्ण होऊ शकते. कॅटलॉग हे फीचर गेल्या वर्षी लॉंच करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते लोक आणि बिझनेस यांच्यातील संभाषणाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. आकडेवारीनुसार दर महिन्याला ४ कोटींहून अधिक लोक बिझनेस कॅटलॉग पाहतात असे दिसून आले आहे.

लोकांना प्रॉडक्ट्स दिसावीत, कळावीत यासाठी आम्ही कॅटलॉग तयार करतो आणि त्या कॅटलॉगमध्ये उपलब्ध असलेले प्रत्येक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लिंकच्या स्वरूपात वेबसाइट्सवर, Facebook, Instagram वर तसेच इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करता येते. याशिवाय, लोकांना कॅटलॉग किंवा एखादा आयटम त्यांच्या मित्रमैत्रीणींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत शेअर करायचे असेल, तर ते फक्त त्याची लिंक कॉपी करून ती लिंक WhatsApp वर किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू शकतात.

कॅटलॉग लिंक जागतिक स्तरावर उपलब्ध आहेत आणि येथे बिझनेस त्या कशा शेअर करतात हे शिकू शकतात.

ऑनलाइन बिझनेसचे नवे वास्तव अंगवळणी पडताना बिझनेसना वेळ लागणार आहे आणि त्यादृष्टीने येणारा काळ खूप आव्हानात्मक असणार आहे, पण आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.

९ जुलै २०२०

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)