३ ऑगस्ट २०२०
खूप वेळा फॉरवर्ड होत होत अनेक चॅटवर शेअर केल्या गेलेल्या मेसेजेसना फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसचे स्पेशल लेबल लावले जाते. असा मेसेज तुम्हाला तो पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतः लिहिलेला नसून त्यांना दुसरीकडून आलेला आणि त्यांनी पुढे फॉरवर्ड केलेला मेसेज आहे हे या दोन बाणांच्या चिन्हावरून समजू शकते. या वर्षाच्या सुरुवातीला, आम्ही WhatsApp चे खाजगीपण जपण्यासाठी अशा प्रकारचे मेसेजेस एका वेळी किती व्यक्तींना पाठवता येतील यावर मर्यादा घातल्या.
आजपासून, चॅटमधील भिंगाच्या चिन्हावर टॅप करून अशा प्रकारचे मेसेजेस तपासून घेण्याचा साधासोपा पर्याय प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. अनेक वेळा फॉरवर्ड झालेल्या मेसेजेसचा शोध घेण्याचा साधासोपा पर्याय देऊ केल्याने लोकांना त्या मेसेजेसविषयी नवी माहिती किंवा त्यांचे स्रोत कळण्यातही मदत होईल.
या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना ब्राउझरद्वारे वेबवर मेसेज लोड करता येतो. तो मेसेज WhatsApp सोबत शेअर करण्याची गरज भासत नाही.
'वेबवर शोध घ्या' हे फीचर आजपासून ब्राझील, इटली, आयर्लंड, मेक्सिको, स्पेन, यूके आणि यूएस या देशांमध्ये Android, iOS आणि WhatsApp वेब या प्लॅटफॉर्म्सवरील WhatsApp च्या नवीनतम आवृत्त्यांसाठी उपलब्ध होईल.