सप्टेंबर २, २०२१
तुमचे WhatsApp मेसेजेस हे फक्त तुमचे असतात. म्हणूनच तुमचे वैयक्तिक WhatsApp मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले जातात आणि आम्ही त्यांना तुमच्या चॅट्समधून आपोआप नाहीसे करण्याचे मार्गही प्रदान करतो.
अजून एका फीचरची मागणी आमच्याकडे सतत करण्यात आली, ती म्हणजे फोन बदलल्यावर आपले पूर्वीचे चॅट एका ऑपरेटिंग सिस्टमवरून दुसऱ्यावर ट्रान्सफर करता येणे. आम्ही हे सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने शक्य करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम आणि डिव्हाइस निर्मात्यांसोबत अथक प्रयत्न करत आहोत.
तुमचे WhatsApp वरील पूर्वीचे चॅट iOS वरून Android वर हलवता येणे उपलब्ध करून देण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. असे करताना तुमचे मेसेजेस WhatsApp ला पाठवले जात नाहीत आणि यामध्ये व्हॉइस मेसेजेस, फोटोज आणि व्हिडिओज या सर्वांचा समावेश आहे. सध्या हे वैशिष्ट्य Android १० किंवा त्याहून वर चालणाऱ्या कोणत्याही Samsung डिव्हाइसवर उपलब्ध आहे, आणि लवकरच इतर Android डिव्हाइसेसवर देखील उपलब्ध होईल.
जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइस सेट अप कराल तेव्हा तुम्हाला तुमचे WhatsApp वरील पूर्वीचे चॅट तुमच्या जुन्या डिव्हाइसवरून नवीन डिव्हाइसवर सुरक्षितरीत्या ट्रान्सफर करण्याचा पर्याय मिळेल. या प्रक्रियेसाठी USB-C टू Lightning केबलची गरज असेल. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.
ही केवळ एक सुरुवात आहे. आम्ही अधिक लोकांना त्यांच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर स्विच करून आपले चॅट्स सुरक्षितपणे सोबत नेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत.