२६ फेब्रुवारी, २०१६
या आठवड्याच्या सुरुवातीला WhatsApp ने सात वर्षे पूर्ण केली आहेत. हा एक निश्चितच विस्मयकारक प्रवास होता आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये सुरक्षा फीचर्सवर आणि लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्कात राहणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी आम्ही अधिक प्रयत्नशील राहणार आहोत.
परंतु या वर्धापनदिनी आम्ही भूतकाळातही एक नजर टाकू इच्छितो. आम्ही जेव्हा २००९ मध्ये WhatsApp सुरु केले तेव्हा मोबाइल डिव्हाइसेसचा वापर आजच्या पेक्षा बराच वेगळा होता. तेव्हा Apple App Store हे नुकतेच काही महिन्यांपूर्वी सुरु झाले होते. त्या काळी, साधारण ७० टक्के स्मार्टफोन हे BlackBerry and Nokia या ऑपरेटिंग सिस्टीम तर्फे विकले जात. Google, Apple आणि Microsoft तर्फे आणलेल्या प्रचलित ऑपरेटिंग सिस्टिम्स, ज्यांचा आजचा सेल्स ९९.५ टक्के इतका आहे, त्यांचा त्या काळातील मोबाइल डिव्हाइस मधील सेल २५ टक्क्यांहूनही कमी होता.
पुढील सात वर्षांचा जेव्हा आम्ही आढावा घेत आहोत तेव्हा ज्या ऑपरेटिंग सिस्टिम्स सर्वाधिक जनसमुदाय वापरतो त्याकडे अधिक लक्ष पुरविणे हे आमचे ध्येय असेल. आणि म्हणूनच २०१६ च्या अखेरीस WhatsApp मेसेंजर साठी आम्ही खालील मोबाइल प्लॅटफॉर्म्स वर सपोर्ट देणे बंद करीत आहोत :
ही मोबाइल डिव्हाइसेस जरी आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य घटक होती तरी भविष्यामध्ये आम्हाला ज्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या पुरवण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही.
हा एक कठीण निर्णय असला तरी WhatsApp वापरणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी, मित्रपरिवाराशी आणि जवळच्या व्यक्तींशी संपर्कात राहणे अधिक सोयीचे होण्याकरिता अधिकाधिक उत्तम मार्ग प्रदान करता यावेत, यासाठी तो योग्य निर्णय होता. जर तुम्ही यापैकी एखादे डिव्हाइस वापरत असाल आम्ही असे सुचवितो की तुम्ही WhatsApp चा वापर चालू ठेवण्यासाठी २०१६ संपण्यापूर्वी Android, iPhone, किंवा Windows Phone चे नवीन डिव्हाइस वापरावे.
अपडेट : तुम्ही खालील प्लॅटफॉर्म्सवर WhatsApp वापरू शकणार नाही :
टीप : आम्ही या ऑपरेटिंग सिस्टीमवर सक्रिय पणे डेव्हलपमेंट करत नसल्याने काही वैशिष्ट्ये कोणत्याही वेळी कार्य करणे बंद करू शकतात.
अखेरचा अपडेट : १४ जुलै, २०१९