१४ नोव्हेंबर, २०१६
शक्य तेवढ्या लोकांना नेहमीच त्यांचे मित्र, कुटुंब आणि त्यांना काळजी वाटत असलेल्या लोकांच्या शक्य तेवढे संपर्कात राहण्यात मदत करणे हेच आमचे WhatsApp वरील उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असे प्रॉडक्ट बनवायचे जे सहज, वापरण्यासाठी सोपे आणि तुम्ही कुठे असलात तरी ॲक्सेस करण्यायोग्य असेल. आम्ही मेसेजिंग आणि ग्रुप चॅटपासून सुरुवात केली. त्यानंतर आम्ही व्हॉइस कॉलिंग जोडले. आणि आम्ही अशाप्रकारे केलं जे जगभरातील हजारो डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मच्या संयोजनावर काम करेल.
आज आम्ही लोकांना कनेक्ट करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये पुढील पाऊल उचलताना WhatsApp व्हिडिओ कॉलिंगची घोषणा करताना आनंदी आहोत. येणाऱ्या दिवसात, WhatsApp चे एक अब्जापेक्षा अधिक वापरकर्ते संपूर्ण Android, iPhone, आणि Windows Phone डिव्हाइसेसवर व्हिडिओ कॉल करू शकतील.
आम्ही हे फीचर सादर करत आहोत कारण आम्हाला माहित आहे की कधीकधी फक्त व्हॉइस आणि मजकूर पुरेसे नसते. तुमची नात तिचे पहिले पाऊल उचलत आहे हे पाहण्याला, किंवा परदेशात शिकत असणाऱ्या तुमच्या मुलीचा चेहरा पाहणे याला पर्याय असूच शकत नाही. आम्ही ज्यांना महागडे नवीन फोन परवडू शकतात केवळ त्यांनाच किंवा सर्वोत्तम सेल्युलर नेटवर्क असलेल्या देशांमध्ये राहतात त्यांनाच नाही तर हे फीचर प्रत्येकासाठी उपलब्ध करून देऊ इच्छितो.
अनेक वर्षांपासून आम्हाला आमच्या वापरकर्त्यांकडून व्हिडिओ कॉलिंगसाठी अनेक विनंत्या प्राप्त होत आहेत, आणि अखेर हे फीचर आम्ही जगाला ऑफर करण्यासाठी उत्सुक आहोत. WhatsApp वापरण्यासाठी धन्यवाद आणि आमची सर्व्हिस सुधारण्यासाठी आम्ही दररोज खूप मेहनत घेण्याचे वचन देतो.