०७ ऑगस्ट, २०१३
आम्ही WhatsApp मध्ये बराच वेळ खर्च करतो आणि विचार करत राहतो की एकमेकांशी संपर्कात राहण्याचा सोपा मार्ग कोणता असेल आणि आम्हाला हे माहित आहे की आपल्या मित्राचा किंवा कुटुंबीयांचा आवाज ऐकू शकणे याची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. आज आमचे नवीन फिचर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे ते आहे : ध्वनी संदेशन.
आम्ही आमच्या सर्व प्लॅटफॉर्म्स वर ध्वनी संदेशन एकाचवेळी सुरु केले. iPhone आणि Android डिव्हाइसेस वर ध्वनी संदेश सुरळीतपणे चालतील याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलीच आहे परंतु BlackBerry, Nokia आणि Windows Phone वापरकर्तेसुद्धा ध्वनी संदेशनाचा उत्तम आणि दर्जेदार अनुभव घेऊ शकण्यासाठी आम्ही अथक परिश्रम केले आहेत.
ध्वनी संदेशनाबद्दल आणि ते कसे कार्य करते त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही तयार केलेला व्हिडिओ बघा :
http://www.youtube.com/watch?v=i3I_7H1mByA
तुमच्या विशिष्ट फोनसाठी ध्वनी संदेश कसे कार्य करतील हे जाणून घेण्यासाठी मदतपुस्तिकेतील हा लेख वाचा.
आम्हाला अशी आशा आहे की आम्ही जसे ध्वनी संदेशन निर्माण करताना आनंद मिळविला तसा तुम्हाला ते वापरताना देखील मिळेल.