फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

स्टिकर सादर करत आहोत

इमोजी आणि कॅमेरा फीचरपासून ते स्टेटस आणि ॲनिमेटेड GIF पर्यंत, WhatsApp वर मित्र आणि कुटुंबियांशी संवाद साधणे सोपे आणि मजेदार बनवणारे नवीन फीचर नेहमीच जोडण्याचा आम्ही विचार करत असतो. आज, आम्ही लोकांसाठी स्टिकरसह व्यक्त होण्यासाठी एक नवीन मार्ग सादर करण्यासाठी उत्सुक आहोत.

एखादा हसणारा चहाचा कप असो किंवा रडणारे ब्रोकन हार्ट असो, स्टिकर तुम्हाला तुमच्या ज्या भावना तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही त्या शेअर करण्यात मदत करतात. सुरू करण्यासाठी, आम्ही WhatsApp मधील आमच्या डिझाईनरनी तयार केलेले आणि इतर कलाकारांकडील स्टिकरची निवड लाँच करत आहोत.

जगभरातील डिझाईनर आणि विकासकांना WhatsApp साठी स्टिकर तयार करण्याची अनुमती देण्यासाठी तृतीय पक्ष स्टिकर पॅककरीता आम्ही सपोर्ट देखील दिला आहे. हे करण्यासाठी, आम्ही API आणि इंटरफेसचा संच समाविष्ट केला आहे ज्याद्वारे तुम्हाला स्टिकर ॲप बील्ड करता येतो व हा पॅक Android किंवा iOS वरील WhatsApp वर स्टिकर जोडतो. Google Play Store किंवा Apple App Store वरील इतर कोणत्याही ॲपप्रमाणे तुम्ही तुमचे स्टिकर ॲप प्रकाशित करू शकता, आणि जे वापरकर्ते तुमचे ॲप डाउनलोड करतील आणि इन्‍स्‍टॉल करतील ते WhatsApp मधून थेट ते स्टिकर पाठवू शकतील. तुम्ही येथे WhatsApp साठी तुमचे स्वतःचे स्टिकर ॲप तयार करण्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

चॅटमध्ये स्टिकर वापरण्यासाठी, फक्त नवीन स्टिकर बटणावर टॅप करा आणि तुम्हाला शेअर करायचा आहे तो स्टिकर निवडा. अधिक चिन्हावर टॅप करून तुम्ही नवीन स्टिकर पॅक जोडू शकता.

आगामी आठवड्यात Android आणि iPhone साठी स्टिकर उपलब्ध होतील. तुम्ही त्यांचा आनंद घ्याल अशी आम्हाला आशा आहे!


२५ ऑक्टोबर, २०१८

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप