२४ एप्रिल, २०१८
लोकांची ऑनलाईन माहिती कशी वापरली जावी याबद्दल अधिक पारदर्शकता निर्माण करण्यासाठी पुढील महिन्यात युरोपियन संयुक्त राष्ट्रे त्यांचे गोपनीयता कायदे अद्यतनित करणार आहेत. आम्ही आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण अद्यतनित करीत आहोत ज्यामध्ये General Data Protection Regulation (GDPR) या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.
या अपडेटमध्ये आम्ही कोणतीही नवीन वैयक्तिक माहिती गोळा करण्याची विनंती करणार नाही. आमच्याकडे जी तुमची मर्यादित माहिती आहे त्याचा वापर आम्ही कसा करतो आणि त्याचे संरक्षण कसे करतो याची माहिती स्पष्ट करणे हा या मागील मुख्य हेतू आहे. काही गोष्टींवर आम्ही प्रकाश टाकू इच्छितो :
तुमची गोपनीयता आणि सुरक्षितता WhatsApp साठी अत्यंत महत्वाची आहे. तुमचा प्रत्येक संदेश आणि कॉल्स हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनने अर्थात संपूर्णपणे कूटबद्ध करून सुरक्षित केलेले असतात त्यामुळे ते कोणीही वाचू अथवा ऐकू शकत नाही, अगदी WhatsApp देखील नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये आमच्याकडे तुमचा कोणता मर्यादित डेटा आहे ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. अॅपच्या नवीन सुधारित आवृत्तीमध्ये हे वैशिष्टय आम्ही संपूर्ण जगभरात उपलब्ध करून देत आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी येथे टॅप करा.
तुमच्या अभिप्रायाचे आम्ही स्वागतच करू. WhatsApp चा वापर केल्याबद्दल धन्यवाद!