डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन

WhatsApp नेहमीच तुमचा डेटा आणि कम्युनिकेशन शक्य तेवढे सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देते. आणि आज, आम्हाला हे घोषित करताना आनंद होत आहे की आम्ही तंत्रज्ञान विषयक विकास पूर्ण केला आहे ज्यामुळे WhatsApp तुमचे खाजगी कम्युनिकेशन संरक्षित करण्यात सर्व सर्वश्रेष्ठ बनले आहे: संपूर्ण एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन. यापुढे जेव्हा तुम्ही आणि तुमचे संपर्क ॲपची नवीनतम आवृत्ती वापराल, तेव्हा तुम्ही करता तो प्रत्येक कॉल, आणि तुम्ही पाठवता तो प्रत्येक मेसेज, फोटो, व्हिडिओ, फाइल आणि व्हॉइस मेसेज, ग्रुप चॅटसह डीफॉल्टनुसार एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केले आहेत.

कल्पना अगदी सोपी आहे: जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता, तेव्हा फक्त ती व्यक्ती किंवा ग्रुप चॅट तो वाचू शकते ज्यांना तुम्ही तो मेसेज पाठवला आहे. तो मेसेज कोणीही पाहू शकत नाही. सायबरक्रिमिनल्स नाही. हॅकर्स नाही. कठोर राजवटी नाही. अगदी आम्हीही नाही. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन WhatsApp द्वारे होणारे कम्युनिकेशन खाजगी बनविण्यात मदत करते - जसे ते अगदी समोरासमोर होणारे संभाषण असावे.

एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन कसे कार्य करते याबद्दल अधिक जाणून घेण्यास तुम्हाला रुची असेल, तर तुम्ही त्याबद्दल येथे वाचू शकता. परंतु तुम्हाला फक्त एवढेच माहीत असणे आवश्यक आहे की एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन केलेले मेसेज फक्त तुम्हाला हवे असलेले प्राप्तकर्ते वाचू शकतात. आणि जर तुम्ही WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरत असाल, तर तुम्हाला तुमचे मेसेजेस एन्क्रिप्ट करण्यासाठी काहीही करावे लागत नाही: एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन डीफॉल्टनुसार आणि नेहमीच चालू असते.

आपण अशा जगात राहतो जिथे आमचा डेटा आधीपेक्षा जास्त डिजिटल केला जातो. दररोज आपण चुकीच्या पद्धतीने ॲक्सेस केल्या जाणाऱ्या किंवा चोरल्या जाणाऱ्या संवेदनशील रेकॉर्डबद्दलच्या स्टोरीज पाहतो. आणि जर कृती केली गेली नाही, तर लोकांची डिजिटल माहिती आणि कम्युनिकेशन असुरक्षित होईल आणि त्यावर पुढील काही वर्षांमध्ये हल्ला होऊ शकतो. सुदैवाने, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आपल्याला या असुरक्षिततेपासून संरक्षण देते.

एनक्रिप्शन हे सरकार, कंपन्या आणि व्यक्तींना नवीन डिजिटल युगात सुरक्षितता आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी असलेले सर्वात महत्त्वाचे टूल आहेत. अलीकडे एन्क्रिप्टेड सर्व्हिसेस आणि कायदा अंमलबजावणीचे कार्य याबद्दल खूप चर्चा होत आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी हे महत्त्वाचे कार्य आहे हे आम्ही ओळखतो, परंतु एनक्रिप्शन कमकुवत करण्याच्या प्रयत्नांमुळे सायबर गुन्हेगार, हॅकर्स आणि बदमाश लोकांकडून इतर लोकांच्या माहितीचा गैरवापर होण्याचा धोका असतो.

तुम्ही करता त्या सर्व गोष्टींसाठी डीफॉल्टनुसार चालू असलेले संपूर्ण एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन असलेल्या काही कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मपैकी WhatsApp एक आहे, त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ते शेवटी वैयक्तिक कम्युनिकेशनच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करेल.

लोकांच्या खाजगी कम्युनिकेशनचे संरक्षण करण्याची इच्छा असणे ही WhatsApp ची मूळ धारणा आहे, आणि माझ्यासाठी ती वैयक्तिक आहे. मी USSR राजवटीत वाढलो आणि तेथे लोकं मुक्तपणे बोलू शकत नव्हती हे सत्य आहे आणि माझे कुटुंब युनायटेड स्टेट्सला स्थलांतरीत होण्याच्या काही कारणांपैकी हे देखील एक कारण आहे.

आज एक अब्जाहून अधिक लोक त्यांच्या जगभरातील मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी WhatsApp वापरतात. आणि आता त्या लोकांपैकी प्रत्येकजण WhatsApp वर मुक्तपणे आणि सुरक्षितपणे बोलू शकतात.

Jan आणि Brian

५ एप्रिल, २०१६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

  • फीचर
  • ब्लॉग
  • सुरक्षा
  • व्यवसायासाठी

आम्ही कोण आहोत

  • आमचा परिचय
  • करिअर
  • ब्रँड सेंटर
  • गोपनीयता

WhatsApp वापरा

  • मोबाइल
  • डेस्कटॉप
  • टॅबलेट
  • WhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

  • आमच्याशी संपर्क करा
  • मदत केंद्र
  • ॲप
  • सुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप
  • मराठी
  • हिन्दी
  • বাংলা
  • ਪੰਜਾਬੀ
  • ગુજરાતી
  • தமிழ்
  • తెలుగు
  • ಕನ್ನಡ
  • മലയാളം
  • Afrikaans
  • azərbaycan
  • Bahasa Indonesia
  • català
  • čeština
  • dansk
  • Deutsch
  • eesti
  • English
  • español
  • Filipino
  • français
  • Gaeilge
  • hrvatski
  • italiano
  • Kiswahili
  • latviešu
  • lietuvių
  • magyar
  • Melayu
  • Nederlands
  • norsk bokmål
  • o‘zbek
  • polski
  • Português (Brasil)
  • Português (Portugal)
  • română
  • shqip
  • slovenčina
  • slovenščina
  • suomi
  • svenska
  • Tiếng Việt
  • Türkçe
  • Ελληνικά
  • български
  • қазақ тілі
  • македонски
  • русский
  • српски
  • українська
  • עברית
  • اردو
  • العربية
  • فارسی
  • ไทย
  • 한국어
  • 日本語
  • 简体中文
  • 繁體中文(台灣)
  • 繁體中文(香港)