डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

अॅनिमेटेड स्टिकर, QR कोड आणि बरेच काही सादर करतो आहोत

जगभरात वापरल्या जाणाऱ्या WhatsApp ला अब्जावधी लोकांचे प्रेम लाभले आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा साधासोपा, विश्वसनीय व खाजगी प्लॅटफॉर्म देऊ करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. असे असले तरी, या ॲपची उपयुक्तता आणखी वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करत राहणार आहोत.

आज आम्हाला याचे पुष्टीकरण करताना आनंद होत आहे की पुढील काही आठवड्यांमध्ये काही नवीन फीचर्स घेऊन येत आहोत:

  • अॅनिमेटेड स्टिकर: स्टिकर्स हे WhatsApp वर लोक संवाद करण्‍याच्‍या जलद वाढणार्‍या मार्गांपैकी एक आहेत, दररोज अब्जावधी पाठवले जातात. आम्ही येत्या काळात आणखी मजेदार आणि व्यक्त करणारे नवीन अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स पॅक लॉंच करणार आहोत.
  • QR कोड: आम्ही नवीन संपर्क जोडण्यासाठी कधीही नव्हते तेवढे सोपे करत आहोत. तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता तेव्हा लवकरच, तुम्हाला त्या व्यक्तीचा संपर्क त्यांचा QR कोड स्कॅन करून जोडता येईल. आता संपर्क जोडण्यासाठी नंबर्स दाबत बसायला नको.
  • WhatsApp वेब आणि डेस्कटॉपसाठी डार्क मोड: सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली डार्क मोड थीम आता तुमच्या कॉम्प्यूटरवरही उपलब्ध होईल.
  • ग्रुप व्हिडिओ कॉल्समधील सुधारणा: व्हिडिओ कॉल्समध्ये आता ८ लोकांना समाविष्ट करता येते. अशा वेळी, तुम्हाला ज्या सहभागी व्यक्तीवर लक्ष केंद्रित करायचे आहे त्या व्यक्तीच्या व्हिडिओवर प्रेस करून दाबून धरल्याने त्या व्यक्तीचा व्हिडिओ फुल स्क्रीनवर दिसायला लागतो. ८ किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असलेल्या ग्रुप चॅटमध्ये आता आम्ही व्हिडिओ आयकॉन देखील समाविष्ट केले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये व्हिडिओ कॉल सहजपणे सुरु करू शकता.
  • आता KaiOS वर स्टेटस उपलब्ध होणार: KaiOS वापरकर्ते आता लोकप्रिय फीचरचा अनुभव घेऊ शकतात जे तुम्हाला २४ तासांनंतर नाहीसे होणारे अपडेट शेअर करू देतात.

वापरकर्त्यांना ही फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये WhatsApp च्या नवीन आवृत्तीमध्ये पाहायला मिळतील.

१ जुलै २०२०

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप