डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

सादर करत आहोत Meta AI सह इनकॉग्निटो चॅट: AI सोबत चॅट करण्याचा पूर्णपणे खाजगी मार्ग

AI सोबत चॅट करणे हा, लोक माहिती कशी मिळवतात आणि महत्त्वाचे प्रश्न कसे विचारतात, याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग वेगाने बनला आहे. आणि यातील अनेक प्रश्न अतिशय संवेदनशील असू शकतात किंवा अशा परिस्थितींचा समावेश असू शकतो ज्यात लोक त्यांच्या प्रश्नांसोबत खाजगी आर्थिक, वैयक्तिक, आरोग्य किंवा कामाचा डेटा समाविष्ट करतात.

दहा वर्षांपूर्वी आम्ही जगासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्‍शन आणले आणि आता आम्ही ही गोपनीयता Meta AI सोबतच्या चॅटपर्यंत विस्तारित करत आहोत.

आज आम्ही Meta AI सह इनकॉग्निटो चॅट लाँच करत आहोत, हा AI सोबत पूर्णपणे खाजगी संभाषणे करण्याचा नवीन मार्ग आहे. आमच्या खाजगी प्रक्रिया तंत्रज्ञान च्या आधारे बनवलेले, इनकॉग्निटो चॅट हे तुम्हाला Meta AI शी अशा प्रकारे बोलू देते जे इतर कोणालाही दृश्यमान नसते.

इतर ॲपनी इनकॉग्निटो-स्टाइल मोड सादर केले आहेत, पण ती तरीही विचारले जाणारे प्रश्न आणि दिली जाणारी उत्तरे पाहू शकतात. Meta AI सोबत इनकॉग्निटो चॅट खरोखरच खाजगी आहे — कोणीही तुमचे संभाषण वाचू शकत नाही, अगदी आम्हीदेखील नाही.

आम्ही WhatsApp वर AI आणण्याचा विचार करण्यास सुरुवात केल्यापासून, आम्ही ही क्षमता खाजगीरीत्या जागतिक स्तरावर कशी डिलिव्हर करायची यावर लक्ष केंद्रित केले आहे.

तुम्ही Meta AI सोबत इनकॉग्निटो चॅट सुरू करता, तेव्हा तुम्ही खाजगी, तात्पुरते संभाषण तयार करता जे फक्त तुम्ही पाहू शकता. तुमच्या मेसेजवर सुरक्षित वातावरणात प्रक्रिया केली जाते, जे Meta देखील ॲक्सेस करू शकत नाही. तुमची संभाषणे सेव्ह केली जात नाहीत आणि बाय डीफॉल्ट तुमचे मेसेज दिसेनासे होतात — त्यामुळे तुम्हाला कोणाच्याही नजरेविना विचार करण्यासाठी आणि कल्पना एक्सप्लोर करण्यासाठी जागा मिळते.

आमचा विश्वास आहे, की चॅट करण्याच्या या खाजगी पद्धतीमध्ये लोक WhatsApp वर AI सोबत चॅट करतात त्या अनेक पद्धतींचा भाग बनण्याची क्षमता आहे. येत्या काही महिन्यांमध्ये, आम्ही खाजगी प्रक्रियेद्वारे संरक्षित साइड चॅटदेखील सादर करू. Meta AI सोबतच्या साइड चॅटमुळे मुख्‍य संभाषणात व्यत्यय न येता तुम्हाला कोणत्याही चॅटबाबत खाजगी मदत मिळेल, काय चर्चा केली जात आहे याचा संदर्भ मिळेल.

आम्ही जगासाठी गोपनीयता डिलिव्हर करण्याकरिता वचनबद्ध आहोत. Meta AI सह इनकॉग्निटो चॅट हे येत्या काही महिन्यांत WhatsApp आणि Meta AI ॲपवर रोल आउट होत आहे. Meta AI सोबत इनकॉग्निटो चॅट कसे काम करते याबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता.

१३ मे २०२६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप