28 जुलै 2026

तुम्ही तुमच्या फोनवर असाल, तुमच्या डेस्कवर असाल किंवा दोन्हींदरम्यान स्विच करत असाल, WhatsApp वर कॉल करणे खाजगीरीत्या आणि सहजपणे काम करते. आज, तुम्ही कुठेही असा किंवा कोणतेही डिव्हाइस वापरत असा, ते अधिक सोपे करण्यासाठी आम्ही नवीन फीचर घेऊन आलो आहोत.
वेब कॉलिंग: तुम्ही आता थेट WhatsApp वेबवरून एकमेकांना आणि ग्रुपमध्ये ऑडिओ व व्हिडिओ कॉल करू शकता व प्राप्त करू शकता. कोणतेही ॲप डाउनलोड करणे आवश्यक नाही.
तुम्ही शेअर केलेला काॅम्प्युटर वापरणारे महाविद्यालयीन विद्यार्थी असाल, ॲप डाउनलोड करण्याची अनुमती नसलेला ऑफिसचा लॅपटॉप वापरत असाल किंवा तुमचे ब्राउझर वापरण्यास प्राधान्य देत असाल, तर तुम्ही आधीपासून असलेला ब्राउझर न सोडता कॉलवर जाऊ शकता. तुमच्या इतर डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या फीचरचा तुम्हाला ॲक्सेस असेल, ज्यामध्ये स्क्रीन शेअरिंग, प्रतिक्रिया आणि तुमचा संपूर्ण कॉल इतिहास व फेव्हरेट यांसह समर्पित कॉल टॅब यांचा समावेश आहे, हे सर्व तुमच्या ब्राउझरमधून.
तुमचे वेबवरील कॉल एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात — कोणत्याही वेळ मर्यादा नसतात आणि कोणतेही शुल्क नसते. तुम्ही WhatsApp कडून अपेक्षा करता तोच हा खाजगी अनुभव आहे.
कॉल ट्रान्सफर: सुरू असलेला ग्रुप कॉल बंद न करता एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर हलवा. तुम्ही फिरतीवर असताना तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर किंवा टॅबलेटवर कॉल सुरू करता त्या क्षणांसाठी, तुम्ही घरी आल्यावर मोठ्या स्क्रीनवर सहयोग करण्यासाठी तो कॉल तुम्ही WhatsApp वेब किंवा डेस्कटॉपवर अखंडपणे ट्रान्सफर करू शकता – किंवा त्याउलटही करू शकता.
वेटिंग रूम: तुमच्या ग्रुप कॉलमध्ये कोण आणि कधी सामील होते यावर तुम्हाला अधिक नियंत्रण हवे असते, तेव्हासाठी आम्ही वेटिंग रूम सादर केली आहे. तुम्ही "सामील होण्यासाठी मंजुरी आवश्यक आहे" सुरू केलेली WhatsApp कॉल लिंक तयार करता, तेव्हा सहभागींना तुम्ही त्यांना सामील होण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत ते वेटिंग रूममध्ये प्रवेश करतील.
QuickHD: आम्ही कॉलच्या सुरुवातीला व्हिडिओ अनुभवामध्ये सुधारणा करत आहोत. QuickHD सह, तुम्ही आता कॉलच्या पहिल्या काही सेकंदांमध्ये हाय-डेफिनिशन व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.
नॉइझ सप्रेशन: तुमच्या आसपासचा आवाज काढण्यासाठी आम्ही नॉइझ सप्रेशन लाँच केले आहे, जेणेकरून तुम्ही कॉल करत असलेल्या व्यक्तीला तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू जाईल – अगदी मोठ्या आवाजात किंवा व्यस्त वातावरणातदेखील. तुमच्या कॉलमधील सेटिंग्जमधून हे कधीही व्यवस्थापित केले जाऊ शकते.
ही फीचर हळूहळू रोल आउट होत आहेत आणि लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होतील. आम्हाला आशा आहे, की यामुळे तुमचे WhatsApp कॉलिंग वापरणे आणखी सोपे होईल.