१९ जुलै, २०२१
आपल्यापैकी अनेकजण सध्या एकमेकांपासून दूर असताना ग्रुप कॉलवर मित्र आणि कुटुंबासोबत एकत्र येण्यासारखे दुसरे काहीच चांगले नाही, आणि असा एखादा खास क्षण मिस होणे यापेक्षा वाईट काही नाही.
ग्रुप कॉल अधिकाधिक लोकप्रिय होत असताना, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनची सुरक्षा आणि गोपनीयता कायम राखून आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी हा अनुभव सुधारण्यावर काम करत आहोत.
आज आम्ही घेऊन आलो आहोत ग्रुप कॉल सुरू झाल्यावर देखील त्यात सामील होण्याची क्षमता. हे फीचर ग्रुप कॉल सुरु झाल्यानंतर त्यात सामील होण्याचे काम कमी करून WhatsApp वरील ग्रुप कॉलिंगला प्रत्यक्षात भेटण्यासारखे उत्स्फूर्त आणि सोपे बनवते.
काही सर्वोत्तम संवाद अनपेक्षितपणेच घडतात. आता, जर तुमच्या ग्रुपमधल्या एखाद्या व्यक्तीकडून फोन वाजल्यानंतर कॉल मिस झाला तर ते नंतर त्यांना हवे तेव्हा त्या कॉलमध्ये सामील होऊ शकतात. तुम्ही कॉल सुरू असेपर्यंत त्यातून बाहेर पडू शकता आणि पुन्हा सामील ही होऊ शकता.
आम्ही एक कॉल माहिती स्क्रीन देखील तयार केला आहे जेणेकरून कॉलमध्ये कोण सामील झाले आहे, तसेच कोणाला आमंत्रण दिले गेले आहे पण अजून सामील झालेले नाहीत, हे तुम्हाला पाहता येईल. आणि जर तुम्ही 'दुर्लक्ष करा' निवडले तर नंतर WhatsApp मधील कॉल्स टॅबमधून तुम्ही सामील होऊ शकता.
सामील होण्यायोग्य कॉल्स आजपासून उपलब्ध होणार असून लोक या नवीन अनुभवाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील अशी आम्ही आशा करतो.
हे कसे वापरू पहायचे याबद्दल तुम्ही येथे अधिक वाचू शकता.