डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

नवीन फीचर राउंडअप: जागा मोकळी करा, एकाहून अधिक खाती, क्रॉस-प्लॅटफॉर्म ट्रान्सफर आणि आणखी बरेच काही

कालांतराने, आपली चॅट महत्त्वाच्या क्षणांचे रेकॉर्ड बनतात: कुटुंबासोबतची संभाषणे, मित्रमैत्रिणींसोबतचे हास्यविनोद आणि असे फोटो व व्हिडिओ जे आपण शेअर केल्याशिवाय राहू शकत नव्हतो. तुम्हाला या सर्वांचा पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी, आम्ही WhatsApp वापरण्यास आणखी सोपे बनवणारे नवीन मार्ग सादर करत आहोत — जेथे तुम्ही गोष्टी संगतवार लावलेल्या असतील, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांदरम्यान स्विच करत असाल किंवा प्रत्येक चॅटमधून आणखी गोष्टी मिळवत असाल.

जागा मोकळी करा, महत्त्वाच्या गोष्टी ठेवा: तुमची चॅट जसजशी भरतात, तसा पसारादेखील वाढू शकतो. आता तुम्ही कोणत्याही चॅटमधूनच मोठ्या फाइल शोधून हटवू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचे संपूर्ण संभाषण न पुसता अनावश्यक गोष्टी काढून टाकू शकता. फक्त चॅटच्या नावावर टॅप करा आणि 'स्टोरेज व्यवस्थापित करा' निवडा. तुम्ही चॅट पुसताना फक्त मीडिया फाइस पुसणे देखील निवडू शकता – ज्यामुळे तुमचा चॅट इतिहास जसाच्या तसा राहील.

क्रॉस-प्लॅटफॉर्म चॅट ट्रान्सफर सोपे झाले आहे: आमचेचॅट ट्रान्सफर फीचर आता एकाच प्लॅटफॉर्ममध्ये चॅट इतिहास ट्रान्सफर करण्याव्यतिरिक्त, iOS वरून Android वर देखील तुमचा चॅट इतिहास ट्रान्सफर करण्यास सपोर्ट करते. फोन बदलणे क्लिष्ट नसावे. आता, फक्त काही टॅपसह, तुमची संभाषणे, फोटो आणि व्हिडिओ सहजपणे तुमच्यासोबत येतात.

दोन खाती, एक फोन – आता iOS वर: तुम्ही आता iOS वर एकाच वेळी दोन WhatsApp खात्यांमध्ये लॉग इन करू शकता—अगदी Android प्रमाणे. आता काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवण्यासाठी दोन फोन बाळगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्या खात्यामध्ये आहात हे तुम्हाला नेहमी कळेल, कारण आता तुमचा प्रोफाइल फोटो खालच्या टॅबमध्ये दिसेल.

तुमच्या मूडशी जुळणारे स्टिकर: स्टिकर तुमच्या चॅटमध्ये अधिक मोठे आणि ठळकपणे भाव व्यक्त करू शकतात—आणि आता तुम्ही इमोजी टाइप करत असताना WhatsApp ते सुचवून त्यांचा वापर करणे अधिक सोपे करणार आहे. फक्त एका टॅपने, तुम्ही इमोजी बदलून तुमच्या अचूक भावना व्यक्त करणारा स्टिकर लावू शकता.

Meta AI सह फोटो टच-अप: आता तुम्ही फोटो पाठवण्यापूर्वी थेट तुमच्या चॅटमध्ये Meta AI वापरून फोटो टच-अप करू शकता, ज्यामुळे लक्ष विचलित करणारी एखादी गोष्ट काढून टाकणे, नवीन बॅकग्राउंडने सद्य बॅकग्राउंड बदलणे किंवा एखादी मजेदार शैली लागू करणे सोपे होते. Meta AI फीचर सर्व वापरकर्त्यांसाठी कदाचित उपलब्ध नसतील.

AI लेखनासंबंधित मदत आता अधिक उपयुक्त आहे: लेखनासंबंधित मदत आता तुमच्या संभाषणावर आधारित एक सुचवलेला प्रतिसाद तयार करू शकते, जेणेकरून तुम्ही तुमचा मेसेज अगदी योग्य प्रकारे पोहोचवू शकाल – आणि हे सर्व करताना तुमची चॅट पूर्णपणे खाजगी राहतील.

ही फीचर आता रोल आउट होत आहेत आणि लवकरच प्रत्येकासाठी उपलब्ध होतील. आम्हाला आशा आहे, की यामुळे तुमचे WhatsApp वापरणे आणखी सोपे होईल.

२६ मार्च २०२६

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप