२२ जुलै २०२६

तुमची सर्वात महत्त्वाची संभाषणे आता केवळ तुमच्या फोनवरच नसतात. तुम्ही तुमच्या iPad वर सोफ्यावर बसून मित्रांबरोबर बोलता, घरी परतताना कुटुंबियांची विचारपूस करता आणि तुमचे काम व दिवस व्यवस्थापित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ॲपदरम्यान स्विच करता.
तुम्ही जिथे काम करता तिथे WhatsApp वापरता यायला हवे. म्हणूनच तुम्ही वापरत असलेल्या इतर ॲपसह आणि तुमच्या डिव्हाइसवर अखंडपणे काम करण्यासाठी आम्ही भागीदारांसोबत काम करत आहोत – जेणेकरून WhatsApp तुमच्या प्रत्यक्ष जीवनाशी जुळवून घेऊ शकेल.
तुमच्या iPad वरून WhatsApp साठी साइन अप करा: आम्ही मागील वर्षी iPad साठी WhatsApp ची घोषणा केल्यापासून, लोकांकडून आम्ही ऐकलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या फोनशी लिंक न करता थेट त्यांच्या iPad वर WhatsApp खाते तयार करायचे आहे. आता तुम्ही ते करू शकता. थेट iPad ॲपवर WhatsApp साठी नोंदणी करा, तुमचे खाते सेट करा आणि तुम्ही तयार आहात.
CarPlay आणि Android Auto सुधारित केले: आम्ही दोन्हीवरील अनुभव पूर्णपणे रिफ्रेश केला आहे. आता तुम्ही मेसेज ऐकू शकता आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकता, कॉल करू शकता, तुमचा कॉल इतिहास पाहू शकता आणि तुमच्या आवडीच्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकता – हँड्स-फ्री आणि थेट तुमच्या कारच्या स्क्रीनवरून.
PDF अपग्रेड केले: तुम्ही आता PDF थेट WhatsApp मध्ये डाउनलोड न करता उघडू शकता, त्यानंतर थेट चॅटमध्ये हायलाइट करणे आणि भाष्य करणे यांसारखी सोपी संपादने करू शकता. वेब आणि डेस्कटॉपवर उपलब्ध, Adobe Acrobat द्वारे समर्थित.
तुम्ही काय ऐकत आहात ते शेअर करा: संगीत शेअर करणे हा स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे आणि आता तुम्ही तुमच्या WhatsApp स्टेटसवर Apple Music किंवा Spotify वरून थेट गाणे सहज शेअर करू शकता. फक्त काही टॅप करून, तुमचे मित्र तुम्ही सध्या काय करत आहात ते पाहू शकतात, ज्यामुळे तुमचे स्टेटस अधिकच युनिक बनते.
ही फीचर आता रोल आउट केली जात आहेत. आम्हाला आशा आहे, की यांमुळे तुमच्या जीवनातील गोष्टी सांभाळणे पूर्वीपेक्षा सोपे झाले असेल.