आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

नवीन सुरक्षा विषयक वैशिष्ट्ये: खाते संरक्षण, डिव्हाइस पडताळणी, स्वयंचलित सुरक्षा कोड

WhatsApp वर, आम्हाला वाटते की तुमचे मेसेज खाजगी असायला हवेत आणि वैयक्तिक संभाषणात असतात तितके सुरक्षित असायला हवेत. तुमच्या वैयक्तिक मेसेजना डीफॉल्ट एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केले याद्वारे संरक्षण देणे हा त्या सुरक्षेचा पाया आहा आणि तुम्हालाअतिरिक्त गोपनीयतेचे स्तर आणि तुमच्या मेसेजवर आणखी नियंत्रण देण्‍यासाठी आम्ही नवीन वैशिष्‍ट्‍ये बनवणे कधीही थांबवणार नाही.

पडद्यामागे हे पुष्कळ कार्य होत असून तुम्हाला काहीही करण्‍याची गरज नसते. आम्ही येणार्‍या महिन्यांमध्‍ये जोडणार आहोत त्या काही अतिरिक्त सुरक्षा वैशिष्‍ट्यांबद्दल, आज तुम्हाला सांगण्यात आम्हाला आनंद होत आहे.

खाते संरक्षण: तुम्हाला तुमचे WhatsApp खाते एका नवीन डिव्हाईसवर स्विच करण्‍याची गरज असल्यास – ही व्यक्ती खरोखर तुम्हीच आहात याची आम्ही दोनदा तपासणी करू इच्छित आहोत. यापासून पुढे, आम्ही तुम्हाला तुमच्या जुन्या डिव्हाईसवर तुम्ही ही स्टेप अतिरिक्त सुरक्षा तपासणी म्हणून घेऊ इच्छिता याची पडताळणी करण्‍यास सांगू शकतो. है वैशिष्‍ट्‍य तुम्हाला तुमचे खाते अन्य डिव्हाईसवर हलवण्‍यासाठी अनधिकृत प्रयत्नाबाबत अलर्ट करण्‍यासाठी मदत करू शकते.

डिव्हाईस पडताळणी:मोबाईल डिव्हाईस मालवेअर ही आज लोकांच्या गोपनीयतेस आणि सुरक्षेस असलेल्‍या सर्वाधिक मोठ्‍या धमकींपैकी एक आहे कारण यामुळे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या फोनचा ॲडव्हांटेज घेतला जाऊ शकतो आणि अवांछित मेसेज पाठवण्‍यासाठी तुमच्या WhatsApp चा वापर केला जाऊ शकतो. हे प्रतिबंधित करण्‍यात मदत करण्‍यासाठी, आम्ही तुमचे खाते प्रमाणित करण्‍यात मदत करण्यासाठी तपासण्‍या जोडल्‍या आहेत - यात तुम्हाला कोणतीही कृती करण्याची गरज नाही - आणि यामुळे तुमचे डिव्हाईस बळकावले गेल्यास तुमचे अधिक चांगले संरक्षण होते. यामुळे तुम्हाला WhatsApp अखंडपणे वापरणे चालू ठेवता येते. येथे तंत्रज्ञानावर सखोल विचार करा.

स्वयंचलित सुरक्षा कोड: सुरक्षेबाबत सर्वाधिक जाणीव असलेले आमचे वापरकर्ता नेहमीच आमच्या पडताळणी वैशिष्‍ट्‍य सुरक्षा कोडचा ॲडव्हांटेज घेतात, जे तुम्ही योग्य प्राप्तकर्त्यासोबत चॅट करत आहात याची खात्री करण्‍यात मदत करते. तुम्ही हे संपर्काची माहिती याखालील एनक्रिप्शनवर मॅन्युअली जाऊन तपासू शकता. ही प्रक्रिया अधिक सोपी आणि आणखी ॲक्सेसिबल बनवण्‍यासाठी, आम्ही “की ट्रान्सपरन्सी” नावाच्या प्रक्रियेवर आधारित असलेल्या एका सुरक्षा वैशिष्‍ट्‍याचा प्रारंभ करत आहोत ज्यामुळे तुम्ही स्वयंचलितपणे पडताळणी करू शकता की तुमच्याकडे एक सुरक्षित कनेक्शन आहे. तुमच्यासाठी याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही एनक्रिप्शन टॅबवर क्लिक करता तेव्हा, तुमचे वैयक्तिक संभाषण सुरक्षित केले आहे याची तुम्ही लगेच पडताळणी करू शकाल. तंत्रज्ञानामध्ये सखोलपणे विचार करणाऱ्यालोकांसाठी, येथे क्लिक करा.

आम्ही तुमचे खाते सुरक्षित करण्‍यात मदत करण्‍याचे हे तीन अतिरिक्त मार्ग आहेत. आम्ही प्रत्येकजणासाठी सुरक्षा सुलभ बनवण्‍यासाठी करू शकतो अशा बर्‍याच गोष्टी असताना, अशी दोन वैशिष्‍ट्‍ये आहेत जी केवळ तुम्हीच चालू करू शकता: टू-स्टेप व्हेरिफिकेशन आणि एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन बॅकअप चा वापर. तुम्ही आधीपासून दोन्ही वापरत असल्यास, कृपया तुमच्या मित्रांना त्याबद्दल सांगा जेणेकरून अधिक लोकांना देखील या सुरक्षेच्या स्तरांचा लाभ मिळू शकतो.

आम्हाला आशा आहे की लोक या वाढीव सुरक्षा वैशिष्‍ट्‍यांच्या ऑफरचा लाभ घेत आहेत आणि आम्ही आणखी अपडेटबाबत लवकरच घोषणा करण्यास उत्सुक आहोत.


13 एप्रिल, 2023

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप