डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

WhatsApp स्टेटसचा आनंद घेण्याचे नवीन मार्ग

WhatsApp वर मित्र आणि जिवलग संपर्क यांच्यासोबत क्षणिक अपडेट शेअर करण्‍याचा स्टेटस हा एक लोकप्रिय मार्ग आहे. ते २४ तासांमध्‍ये नाहीसे होतात आणि त्यात फोटो, व्हिडिओ, GIF, मजकूर आणि बरेच काही असते. तुमच्या वैयक्तिक चॅट आणि कॉलप्रमाणे, तुमचे WhatsApp स्टेटस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात त्यामुळे तुम्ही खाजगीपणे आणि सुरक्षितपणे शेअर करू शकता.

आम्हाला नवीन वैशिष्‍ट्‍यांचा एक संच WhatsApp वरील स्टेटसवर जोडताना आनंद होत आहे ज्यामुळे तुम्ही स्वत:स सहजपणे व्यक्त करू शकता आणि इतरांसोबत कनेक्ट करू शकता.

खाजगी प्रेक्षक निवडकर्ता

तुम्ही शेअर करता ते स्टेटस तुमच्या सर्व संपर्कांसाठी नेहमीच कदाचित योग्य असू शकत नाही. आम्ही तुम्हाला स्टेटसनुसार तुमच्या गोपनीयता सेटिंग्ज अपडेट करण्‍याची सुविधा प्रदान करत आहोत त्यामुळे तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट करता तेव्हा प्रत्येकवेळी ते कोण पाहते ते तुम्ही निवडू शकता. तुमचा सर्वात अलीकडील प्रेक्षक विभाग सेव्ह केला जाईल आणि तुमच्या पुढील स्टेटससाठी डीफॉल्ट म्हणून वापरला जाईल.

व्हॉइस स्टेटस

आम्ही WhatsApp स्टेटसवर सुमारे 30 सेकंदांचे व्हॉइस मेसेज रेकॉर्ड आणि शेअर करण्‍याची क्षमता सादर करत आहोत. विशेषत: तुम्हाला व्यक्त होण्यासाठी टाईप करण्‍यापेक्षा बोलणे अधिक सोयीस्कर वाटत असल्यास, व्हॉइस स्टेटस आणखी वैयक्तिक अपडेट पाठवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

स्टेटस प्रतिक्रिया

तुमच्या मित्रांकडील आणि जिवलग संपर्कांकडील स्टेटस अपडेटना प्रतिक्रिया देण्यासाठी एक जलद आणि सोपा मार्ग प्रदान करण्‍याकरिता आम्ही स्टेटस प्रतिक्रिया जोडत आहोत. गेल्या वर्षी प्रतिक्रिया लॉंच केल्यानंतर युजरना हवे असलेले हे #1 वैशिष्‍ट्‍य होते. तुम्ही आता वर स्वाइप करून आठ इमोजींपैकी एकावर टॅप करून जलदपणे कोणत्याही स्टेटसला रिप्लाय देऊ शकता. तुम्ही अर्थातच अद्यापही कोणत्याही स्टेटसला मजकूर, व्हॉइस मेसेज, स्टिकर आणि बर्‍याच पद्धतींने रिप्लाय देऊ शकता.

नवीन अपडेटसाठी स्टेटस प्रोफाइल रिंग

नवीन प्रोफाइल स्टेटस रिंगद्वारे तुम्ही कधीही जिवलग व्यक्तीकडील स्टेटस मिस करणार नाही. तुमचा संपर्क जेव्हाही स्टेटस अपडेट शेअर करेल तेव्हा ही रिंग तुमच्या संपर्काच्या प्रोफाइल फोटोच्या आसपास दिसेल. ती चॅट लिस्ट, ग्रुप सहभागी यादी आणि संपर्क माहितीमध्‍ये दिसेल.

स्टेटसवरील लिंक प्रीव्ह्यू

आता तुम्ही तुमच्या स्टेटसवर एक लिंक पोस्ट करता तेव्हा, तुम्हाला लिंक कंटेंटचा एक व्हिज्युअल प्रीव्ह्‍यू तुम्ही मेसेज पाठवताना दिसतो तसाच स्वयंचलितपणे दिसेल. व्हिज्युअल प्रीव्ह्यूमुळे तुमचे स्टेटस अधिक चांगले दिसतात आणि तुमच्या संपर्कांनी क्लिक करण्‍यापूर्वीच लिंक कशाबद्दल आहे याची अधिक चांगली कल्पना देखील त्यांना मिळते.

हे अपडेट जगभरातील वापरकर्त्यांसाठी आणले जात आहेत आणि ते येत्या काही आठवड्यांमध्‍ये प्रत्येकजणासाठी उपलब्ध असतील. लोक लवकरच या नवीन स्टेटस वैशिष्ट्‍यांचा आनंद घेतील याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.

७ फेब्रुवारी, २०२३

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप